PIB Headquarters

पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित दैनंदिन बातमीपत्र

Posted On: 07 DEC 2020 7:10PM by PIB Mumbai

दिल्ली-मुंबई, 7 डिसेंबर 2020

Coat of arms of India PNG images free download  

(कोविड-19 संबंधी पत्र सूचना कार्यालयाद्वारे जारी बातम्‍या आणि सत्‍यता पडताळणी बातम्‍या समाविष्‍ट)

#Unite2FightCorona

#IndiaFightsCorona

 

Image

Image

Image

Image

आग्रा मेट्रो प्रकल्पाच्या बांधकामाच्या उदघाटनप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण:-

एका गोष्टीचे स्मरण मी जरूर करून देणार आहे. कोरोना लस येण्याची आपण सर्वजण वाट पाहतोय; आणि गेल्या काही दिवसांपूर्वीच मी लस निर्मिती प्रक्रियेतल्या संशोधकांची भेट घेतली, त्यावरून आता लस येण्यासाठी अवधी लागेल, असे वाटत नाही. लवकरच येईलही, मात्र कोरोना संक्रमणापासून बचाव करण्यासाठी आपण सर्वांनी सावधगिरी बाळगण्यात कोणतीही कमतरता ठेवू नये. मास्क आणि दोन गज म्हणजेच सहा फूट शारीरिक अंतर राखणे अतिशय गरजेचे आहे.

आरोग्य मंत्रालयाची कोविड-19 घडामोडींवरील माहिती :

भारताने पार केला महत्वाचा टप्पा- 140 दिवसानंतर सक्रीय रुग्ण संख्या 4 लाखापेक्षा कमी-

भारताने आज महत्वाचा टप्पा साध्य केला आहे. भारताची एकूण सक्रीय रुग्ण संख्या आज 4 लाखापेक्षा कमी म्हणजे 3,96,729 नोंदवली गेली आहे.ही संख्या एकूण रुग्ण संख्येच्या केवळ 4.1% आहे.140 दिवसानंतरची ही सर्वात कमी संख्या आहे. 20 जुलै 2020 ला एकूण सक्रीय रुग्ण संख्या 3,90,459 होती.

गेल्या दहा दिवसातला कल कायम राखत गेल्या 24 तासात भारतात दररोजच्या नव्या रुग्णांच्या संख्येपेक्षा जास्त रुग्ण कोरोनातून बरे झाले.

गेल्या 24 तासात देशात 32,981 नव्या रुग्णांची नोंद झाली तर 39,109 रुग्ण कोरोनातून बरे झाले.

भारतात गेल्या सात दिवसात प्रती दशलक्ष लोकसंख्येमागे नोंदली गेलेली नव्या रुग्णांची संख्या ही जगातल्या सर्वात कमी संख्येपैकी एक आहे. गेल्या सात दिवसासाठी ही संख्या 182 आहे.

 

इतर अपडेट्स:

वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय आणि आयुष मंत्रालय यांनी आयुष निर्यात संवर्धन परिषद स्थापन करण्याचा घेतला निर्णय- वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय आणि आयुष मंत्रालय यांनी मिळून आयुष निर्यातीला चालना देण्यासाठी निर्यात संवर्धन परिषद स्थापन करून एकत्रितपणे कार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयुष गोयल आणि आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांनी नुकत्याच घेतलेल्या आयुष व्यापार आणि उद्योग यांच्या संयुक्त आढावा बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

विज्ञान, तंत्रज्ञान आणि सर्व क्षेत्रातील नावीन्यपूर्ण गोष्टींचा वापर करून पुढील काही वर्षांत भारतीय अर्थव्यवस्था जगातील अव्वल अर्थव्यवस्थांमध्ये समाविष्ट होईल : उपाध्यक्ष, नीती आयोग- विज्ञान, तंत्रज्ञान आणि सर्व क्षेत्रातील नावीन्यपूर्ण गोष्टींचा वापर करून येत्या काही वर्षांत भारतीय अर्थव्यवस्था जगातील अव्वल अर्थव्यवस्थांमध्ये गणली जाईल यावर नीती आयोगाचे उपाध्यक्ष डॉ. राजीव कुमार यांनी भर दिला. नुकतेच विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाची (डीएसटी) 50 वर्षे साजरी करण्यासाठी आयोजित वेबिनारमध्ये ते बोलत होते.

भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सवासाठी प्रचार, उद्घाटन आणि विज्ञान यात्रांचे 35 ठिकाणी आयोजन

भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव 2020 यातील विविध उपक्रमांना देशभरात पोहोचवण्यासाठी आणि त्यांचा प्रसार करण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. विज्ञान मंत्रालय आणि विभागांच्या प्रयोगशाळा आणि संस्था भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव 2020 मधील उपक्रम लोकांपर्यंत पोहचावेत आणि त्यांचा प्रसार व्हावा यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करत आहेत.

 

महाराष्ट्र अपडेट्स:

बृहन्मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंग म्हणाले की, कोविड-19 पॉझिटीव्हीटी दर कमी होऊन आता फक्त 5 टक्क्यांवर आला आहे, जो संक्रमणाच्या गेल्या 10 महिन्यांच्या काळातील सर्वात कमी आहे. ते म्हणाले आजच्यासह गेल्या 10 दिवसांतील कोविड-19 चाचणी पॉझिटीव्हीटी दर समाधानकारक आहे. ते म्हणाले, मार्च महिन्यात जेंव्हा महाराष्ट्रात संक्रमणाचा भर होता, त्यावेळी पॉझिटीव्हीटी दर 35-36 टक्के होता.

 

FACT CHECK

 

Image

Image

*******

M.Chopade/S.Thakur/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1678895) Visitor Counter : 240