आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
भारताने पार केला महत्वाचा टप्पा- 140 दिवसानंतर सक्रीय रुग्ण संख्या 4 लाखापेक्षा कमी
भारतात दहा लाख लोकसंख्येमागे असलेली रुग्णसंख्या आणि मृत्यू जगातील सर्वात कमी संख्येपैकी एक
मृतांची दैनंदिन संख्या 157 दिवसानंतर 400 च्या खाली
Posted On:
07 DEC 2020 12:50PM by PIB Mumbai
भारताने आज महत्वाचा टप्पा साध्य केला आहे. भारताची एकूण सक्रीय रुग्ण संख्या आज 4 लाखापेक्षा कमी म्हणजे 3,96,729 नोंदवली गेली आहे.ही संख्या एकूण रुग्ण संख्येच्या केवळ 4.1% आहे.140 दिवसानंतरची ही सर्वात कमी संख्या आहे. 20 जुलै 2020 ला एकूण सक्रीय रुग्ण संख्या 3,90,459 होती.
गेल्या दहा दिवसातला कल कायम राखत गेल्या 24 तासात भारतात दररोजच्या नव्या रुग्णांच्या संख्येपेक्षा जास्त रुग्ण कोरोनातून बरे झाले.
गेल्या 24 तासात देशात 32,981 नव्या रुग्णांची नोंद झाली तर 39,109 रुग्ण कोरोनातून बरे झाले.
भारतात गेल्या सात दिवसात प्रती दशलक्ष लोकसंख्येमागे नोंदली गेलेली नव्या रुग्णांची संख्या ही जगातल्या सर्वात कमी संख्येपैकी एक आहे.गेल्या सात दिवसासाठी ही संख्या 182 आहे.
प्रती दशलक्ष लोकसंख्येमागे असलेली रुग्ण संख्या भारतात अतिशय कमी आहे.प्रती दशलक्ष लोकसंख्येमागे भारतातली रुग्ण संख्या 6,988 आहे तर जगातली ही सरासरी संख्या 8,438 आहे.
नव्या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त असल्याने बरे होण्याचा दर सुधारून आज 94.45% झाला आहे.
आतापर्यंत एकूण 91,39,901रुग्ण कोरोनातून मुक्त झाले आहेत.बरे झालेले आणि सक्रीय रुग्ण यांच्यातले अंतर आज 87 लाख (87,43,172) आहे.
नव्या रुग्णापैकी 81.20% रुग्ण 10 राज्ये/केंद्रशासित प्रदेशातले आहेत.
बरे झालेल्यांची एका दिवसातली सर्वाधिक संख्या महाराष्ट्रात नोंदवली गेली असून इथे एका दिवसात 7,486 रुग्ण बरे झाले. केरळमध्ये ही संख्या 5,217 तर दिल्लीमध्ये ही संख्या 4,622 होती.
नव्या रुग्णांपैकी 76.20% रुग्ण 10 राज्य/ केंद्र शासित प्रदेशात आहेत.
दैनंदिन रुग्णसंख्येत केरळमध्ये सर्वात जास्त म्हणजे 4,777 नवे रुग्ण आढळले. त्यानंतर महाराष्ट्रात 4,757 आणि पश्चिम बंगाल मध्ये 3,143 नव्या दैनंदिन रुग्णांची नोंद झाली.
गेल्या 24 तासात 391 मृत्यूंची नोंद झाली.
या पैकी सुमारे 75.07% मृत्यू 10 राज्य/ केंद्र शासित प्रदेशातले आहेत.
दिल्लीमध्ये सर्वात जास्त (69) मृत्यू झाले. पश्चिम बंगाल मध्ये 46 आणि महाराष्ट्रात 40 मृत्यूंची नोंद झाली.
भारतात गेल्या आठवड्यात दशलक्ष लोकसंख्येमागे दररोज होणाऱ्या मृत्यू संख्येची जगाशी तुलना करता, दहा लाखात सर्वात कमी मृत्यू असणाऱ्या देशांमध्ये भारत कायम आहे.
U.Ujgare/N.Chitale/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1678786)
Visitor Counter : 282
Read this release in:
Tamil
,
Telugu
,
Malayalam
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Kannada