पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान 4 डिसेंबर रोजी आयआयटी 2020 ग्लोबल समिटला संबोधित करणार
Posted On:
03 DEC 2020 10:54PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी 4 डिसेंबर 2020 रोजी रात्री साडेनऊ वाजता PanIIT यूएसए आयोजित आयआयटी -2020 ग्लोबल समिटला संबोधित करणार आहेत.
या वर्षाच्या शिखर परिषदेची संकल्पना ‘द फ्युचर इज नाऊ’ अशी आहे. या परिषदेत जागतिक अर्थव्यवस्था, तंत्रज्ञान, नाविन्यपूर्ण संशोधन, आरोग्य, अधिवास संवर्धन आणि सार्वत्रिक शिक्षण या विषयांवर भर देण्यात येणार आहे.
पॅनआयआयटी यूएसए ही 20 वर्षांपेक्षा जुनी एक संस्था आहे. 2003 पासून पॅनआयआयटी यूएसएने ही परिषद आयोजित करत आहे आणि उद्योग, शैक्षणिक संस्था आणि सरकारसह विविध क्षेत्रांतील वक्त्यांना आमंत्रित केले आहे. पॅनआयआयटी यूएसए ही संस्था आयआयटीच्या माजी विद्यार्थ्यांच्या स्वयंसेवक टीमद्वारे चालवली जाते.
M.Chopade/S.Kane/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1678296)
Visitor Counter : 162
Read this release in:
Assamese
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam