आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
दैनंदिन नवीन रुग्णसंख्येतील 69% रुग्णसंख्या ही महाराष्ट्र, दिल्ली, केरळ, पश्चिम बंगाल, राजस्थान, उत्तर प्रदेश, हरयाणा आणि छत्तीसगढ़ या आठ राज्यांमधील
प्रति दशलक्ष लोकसंख्येमागील निदान चाचण्यांच्या संख्य़ेने 1 लाखांचा टप्पा ओलांडला
23 राज्ये/केंद्रशासित प्रदेशातील प्रति दशलक्ष लोकसंख्येमागील चाचण्यांची संख्या राष्ट्रीय सरासरीहून जास्त
Posted On:
28 NOV 2020 2:32PM by PIB Mumbai
आज भारतातील उपचाराधीन (active) रुग्णांची संख्या 4,54,940 झाली आहे. भारताच्या एकूण रुग्णसंख्येत उपचाराधीन रुग्णसंख्येचे प्रमाण 4.87% आहे. गेल्या 24 तासात देशात 41,322 नवीन कोविड रुग्णसंख्या नोंदवली गेली.
दैनंदिन नवीन रुग्णसंख्येपैकी 69.04 टक्के रुग्ण आठ राज्ये/केंद्रशासित प्रदेशातील आहेत. ती राज्ये म्हणजे महाराष्ट्र, दिल्ली, केरळ, पश्चिम बंगाल, राजस्थान, उत्तर प्रदेश, हरयाणा व चंदीगढ़ .
महाराष्ट्रात सर्वाधिक 6,185 नवीन कोविड- रुग्ण आहेत, दिल्लीत 5,482 रुग्ण तर केरळमधील नवीन रुग्णसंख्या 3,966 एवढी आहे.
देशातील दर दशलक्ष लोकसंख्येमागील चाचण्यांनी 1 लाखांचा टप्पा ओलांडला. भारतात दर दशलक्ष लोकसंख्येमागे 100,159.7 चाचण्या केल्या गेल्या.
गेल्या 24 तासात 11,57,605 निदान चाचण्या केल्या गेल्या त्यामुळे एकूण निदान चाचण्यांची संख्या 13.82 कोटी (13,82,20,354) झाली आहे.
निदान चाचण्यांच्या संख्येतील ही वाढ म्हणजे निदान चाचणी करण्यासाठीच्या मुलभूत सुविधांमध्ये सतत होणारी संख्यात्मक आणि गुणात्मक वाढ याची निष्पत्ती आहे. देशभरात 1,175 सरकारी आणि 986 खाजगी अश्या एकूण 2,161 निदान-प्रयोगशाळा असून त्याच्यामुळे दैनंदिन चाचण्याची क्षमता मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.
आता राष्ट्रीय आकडेवारीवर दृष्टीक्षेप.
23 राज्ये/केंद्रशासित प्रदेशातील दर दशलक्ष लोकसंख्येमागील निदान चाचण्यांची संख्या राष्ट्रीय चाचण्यांच्या सरासरीहून जास्त आहे.
13 राज्ये/केंद्रशासित प्रदेशातील दर दशलक्ष लोकसंख्येमागील निदान चाचण्यांची संख्या राष्ट्रीय चाचण्यांच्या सरासरीहून कमी आहे.
भारतातील बरे झालेल्यांची एकूण संख्या 87.59 लाख (8,759,969) आहे, तर राष्ट्रीय रिकवरी दर आज 93.68 टक्के होता.
गेल्या चोविस तासात देशात बरे झालेल्यांची संख्या 41,452 नोंदवली गेली.
बरे झालेल्यांच्या ताज्या आकडेवारीपैकी 76.55 टक्के दहा राज्ये/केंद्रशासित प्रदेशातील आहेत.
रोगमुक्तांची दैनंदिन संख्या दिल्लीत सर्वाधिक असून 5,937 जणांना बरे झाल्याने रुग्णालयातून सुटी मिळाली आहे, त्याखालोखाल केरळातील रोगमुक्तांची संख्या 4,544 असून महाराष्ट्रात 4,089 जण बरे झाले आहेत.
गेल्या 24 तासातील 485 कोविड मृत्यूंपैकी 78.35% मृत्यू हे दहा राज्ये/ केंद्रशासित प्रदेशातील आहेत.
दिल्लीत नव्याने झालेले मृत्यू सर्वाधिक म्हणजे 98 नोंदवले गेले आहेत. महाराष्ट्रात 85 तर पश्चिम बंगालमध्ये त्या खालोखाल 46 मृत्यूंची नोंद झाली आहे.
S.Tupe/V.Sahajrao/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1676700)
Visitor Counter : 183
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam