आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
भारतात सलग 44 व्या दिवशी दैनिक नवीन रोगमुक्तांची संख्या दैनिक नवीन बाधितांहून जास्त
उपचाराधीन रुग्ण संख्या 4.65 लाखांपर्यंत घटली
Posted On:
16 NOV 2020 1:52PM by PIB Mumbai
भारताने सलग 44 व्या दिवशी दैनिक रोगमुक्तांची संख्या दैनिक बाधितांच्या संख्येपेक्षा जास्त ठेवण्याचा आपला शिरस्ता कायम राखला आहे.
गेल्या 24 तासात 43 ,851 कोविड-19 रुग्ण बरे झाले तर फक्त 30,548 रुग्णांची नव्याने भर पडली. त्यामुळे उपचाराधीन रुग्णांची संख्या 13,303ने घटली आणि 4,65,478 झाली आहे.
युरोप आणि अमेरिकेत दैनिक नवीन बाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर सातत्याने वाढ होत असताना भारतात नवीन कोविड बाधितांची दैनिक संख्या 30,548 या अभूतपूर्व नीचांकावर आहे.
निदान चाचण्यांची संख्या वाढवण्यासाठी सरकारने केलेल्या प्रयत्नांमुळे बाधितांची संख्या सलग निचांकावर येत असल्याचे दिसत आहे.
रुग्ण बरे होण्याचा दर आज 93.26 टक्के एवढा सुधारला. एकूण 82,49,579 रुग्ण बरे झाले.
गेल्या 24 तासात बरे झालेल्यांच्या एकूण संख्येपैकी 78.59% हे दहा राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधील होते.
दिल्लीत रोगमुक्तांची संख्या सर्वाधिक होती. तेथे 7,606 बाधित कोविडमधून बरे झाले. केरळात 6,684 दैनिक रोगमुक्त त्यांची संख्या होती तर त्यामागोमाग पश्चिम बंगालने नव्याने बरे झालेल्यांची संख्या 4,480 एवढी नोंदवली.
नव्याने बाधित झालेल्यांपैकी 76.63% बाधित दहा राज्य/केंद्रशासित प्रदेशातील आहेत.
केरळमध्ये 4,581 नव्या केसेस नोंदवला गेल्या. गेल्या काही दिवसात दिल्लीत नवीन केसेस मध्ये अचानक वाढ दिसून येत आहेत काल दिल्लीत 3,235 नवीन रुग्ण नोंदवले गेले. त्यामागोमाग पश्चिम बंगाल मध्ये 3,053 रुग्णसंख्या नोंदवली गेली.
नव्याने 435 जणांचा covid-19 ने मृत्यू झाले त्यापैकी 78.85% हे दहा राज्य/केंद्रशासित प्रदेशातील होते.
नवी दिल्लीत 95 जण मृत्यू पावले. मृत्यू पावलेल्यांच्या एकूण संख्येच्या तुलनेत दिल्लीतील मृत्यूंची संख्या ही 21.5% आहे. याबाबतीत एकूण मृत्यूच्या 13.79 % म्हणजेच साठ मृत्यू नोंदवणाऱ्या महाराष्ट्राहून दिल्लीची संख्या जास्त आहे.
राष्ट्रीय स्तरावर दर दहा लाखांमागील मृत्यूचा सरासरी दर 94 आहे.
14 राज्ये/केंद्रशासित प्रदेशातील दर दहा लाखामागील मृत्यूचा सरासरी दर हा राष्ट्रीय सरासरीहून जास्त आहे.
13 राज्ये/केंद्रशासित प्रदेशातील मृत्यूदर हा राष्ट्रीय सरासरीहून जास्त आहे.
ही राज्ये /केंद्रशासित प्रदेशातील आयसीयूमधील गंभीर रुग्णांच्या बाबतीतील आरोग्य व्यवस्थापन सुधारण्यासाठी केंद्रशासन काळजीपूर्वक तयार केलेल्या मानक उपचार पद्धती राबवून प्रयत्न करत आहे. खाजगी तसेच सरकारी रुग्णालयात ही पद्धती लागू आहे.
याशिवाय होम आयसोलेशन व रुग्णालयातील रुग्णांसाठीच्या नियमावलींचे काटेकोरपणे पालन केले जात आहे. तज्ञांची केंद्रीय पथके राज्ये/केंद्रशासित प्रदेशात कोविड व्यवस्थापनासाठी ठेवली आहेत.
राज्ये /केंद्रशासित प्रदेशातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी वरिष्ठ पातळीवर सतत बैठकांचे सत्र सुरू आहे.
U.Ujgare/V.Sahajrao /P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1673137)
Visitor Counter : 208
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam