पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांनी अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील विजयाबद्दल जो बायडन यांचे केले अभिनंदन

प्रविष्टि तिथि: 08 NOV 2020 1:30PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 8 नोव्हेंबर 2020

पंतप्रधान, नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेतील अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजयी झाल्याबद्दल जो बायडन यांचे अभिनंदन केले आहे.

जो बायडन, आपल्या नेत्रदीपक यशाबद्दल आपले विशेष अभिनंदन!  उपाध्यक्ष म्हणून, भारत–अमेरिका संबंध दृढ करण्यात आपले योगदान महत्त्वपूर्ण आणि अमूल्य होते. भारत–अमेरिका संबंधांना आणखी उंचीवर नेण्यासाठी पुन्हा एकदा एकत्र काम करण्याची मी आशा करतो, असे  पंतप्रधान म्हणाले.

 

M.Chopade/S.Shaikh/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1671201) आगंतुक पटल : 252
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali , Assamese , Manipuri , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam