आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

गेल्या तीन दिवसांपासून भारताची उपचाराधीन रुग्णसंख्या एकूण संख्येच्या 10% पेक्षा कमी


गेले तीन दिवस दैनंदिन सकारात्मकता दर 5% च्या खाली कायम

Posted On: 22 OCT 2020 1:25PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 22 ऑक्‍टोबर 2020


देशात सक्रीय रुग्ण संख्येत सातत्याने घसरणीचा कल कायम  आहे. गेल्या तीन दिवसांपासून भारताची सक्रिय रुग्णांची संख्या एकूण संख्येच्या  10% पेक्षा  कमी असून त्यावरून असे सूचित होते की देशभरात 10  पैकी केवळ 1 सक्रिय कोविड-19 रुग्ण आहेत .

सध्या देशात एकूण बाधित रुग्णांपैकी केवळ 9.29 टक्केच सक्रिय रुग्ण असून ही संख्या 7,15,812 इतकी आहे.

http://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image0019UW6.jpg

आणखी एक महत्त्वाचा टप्पा नोंदवताना, रोजचा रुग्ण आढळण्याचा दरही गेले तीन दिवस  5% पेक्षा कमी कायम राहिला आहे. यावरून असे दिसून येते की केंद्र आणि राज्ये / केंद्रशासित प्रदेशांच्या  केंद्रित धोरणे आणि कृतीद्वारे संसर्गाचा  प्रसार प्रभावीपणे रोखणे शक्य झाले आहे. आज, दैनंदिन सकारात्मकता दर 3.8% नोंदला गेला आहे.

http://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image002PROU.jpg

रोजच्या सकारात्मक दरातील घट आणि एकूण सक्रिय रुग्णांची घटती संख्या यांची तुलना केली जाते. सक्रिय रुग्णांची संख्या 7.5 लाखाच्या (7,15,812) खाली आहे

भारतात बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या आज 69 लाखाजवळ (68,74,518) पोहचली आहे. सक्रिय रुग्ण आणि बरे झालेले रुग्ण यांच्यातील अंतर सातत्याने वाढत असून ते आज 61,58,706 इतके आहे.

गेल्या 24  तासांत,79,415  रूग्ण बरे झाले आहेत आणि त्यांना घरी सोडण्यात आले आहे, तर 55,839.नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. बरे होण्यासंदर्भातला राष्ट्रीय दर वाढून  89.20% वर गेला आहे.

http://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image003Z8UE.jpg

बरे झालेल्यांपैकी 81% व्यक्ति10 राज्ये/ केंद्रशासित प्रदेशातील आहेत.

एकाच दिवसात बरे झालेल्यांच्या संख्येत महाराष्ट्राचे 23,000 हून अधिक योगदान आहे. गेल्या 24 तासात 55,839  नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.

http://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image004NJ9M.jpg

यापैकी  78 % रुग्ण  10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील आहेत.  महाराष्ट्र आणि केरळमध्ये अद्याप नवीन रुग्णांची संख्या मोठी असून महाराष्ट्रात 8,000 हून अधिक तर कर्नाटकात 5,000 हून अधिक रुग्ण आढळले आहेत.

http://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image0051DMY.jpg

गेल्या 24 तासांत 702 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी जवळपास 82% दहा राज्ये / केंद्रशासित प्रदेशात आहेत.

25 % पेक्षा जास्त नवीन मृत्यू महाराष्ट्रातील आहेत (180  मृत्यू).

http://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image006IL3H.jpg
* * *

U.Ujgare/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1666724) Visitor Counter : 167