मंत्रिमंडळ

2019-2020 साठी उत्पादकतेशी निगडीत आणि उत्पादकतेशी निगडीत नसलेल्या बोनसला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

Posted On: 21 OCT 2020 4:31PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 21 ऑक्टोबर 2020

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज  झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत, 2019-2020 या वर्षासाठी, रेल्वे, टपाल, संरक्षण, ईपीएफओ, ईएसआयसी यासारख्या वाणिज्यिक आस्थापनांच्या 16.97 लाख अराजपत्रित कर्मचाऱ्यांना उत्पादकतेशी निगडीत बोनस द्यायला मंजुरी देण्यात आली. यासाठी सरकारी तिजोरीवर 2,791कोटी रुपयांचा भार पडणार आहे.

उत्पादकतेशी निगडीत नसणारा बोनस अराजपत्रित केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिला जातो. 13.70 लाख कर्मचाऱ्यांना याचा लाभ होणार असून यासाठी  946 कोटी रुपये खर्च येणार आहे.

बोनसच्या घोषणेचा एकूण 30.67 लाख कर्मचाऱ्यांना लाभ होणार असून सरकारी तिजोरीवर एकूण 3,737 कोटी रुपयांचा भार पडणार आहे.

अराजपत्रित कर्मचाऱ्यांना, मागील वर्षातल्या कामगिरीसाठीचा बोनस साधारणतः दुर्गा पूजा/ दसऱ्यापूर्वी दिला जातो.

अराजपत्रित कर्मचाऱ्यांना, उत्पादकतेशी निगडीत असलेला आणि उत्पादकतेशी निगडीत नसलेला बोनस लगेच दिला जाईल असे सरकारने जाहीर केले आहे.

 

M.Chopade/N.Chitale/P.Malandkar

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1666420) Visitor Counter : 215