आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

भारतात सक्रीय कोविड बाधितांची संख्या सातत्याने कमी होण्याचा कल कायम


एका महिन्यानंतर प्रथमच सक्रीय रुग्णांची संख्या 9लाखापेक्षा कमी

सलग तिसऱ्या आठवड्यात नव्याने रोगमुक्त झालेल्यांची संख्या नव्या बाधित रुग्णांपेक्षा जास्त

Posted On: 09 OCT 2020 12:56PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 9 ऑक्‍टोबर 2020


भारतामध्ये सक्रीय कोविड बाधितांची संख्या सातत्याने कमी होण्याचा कल कायम राहिलेला दिसत आहे. एका महिन्यानंतर प्रथमच 9लाखापेक्षा कमी सक्रीय रुग्णांची नोंद झाली आहे. देशात आज 8.93लाख सक्रीय रुग्ण आहेत तर काल ही संख्या 8.97 लाख इतकी होती.

आजमितीला देशातील एकूण सक्रीय कोविड बाधितांची संख्या 8,93,592 इतकी असून एकूण रुग्णसंख्येच्या ती फक्त 12.94%च आहे.

WhatsApp Image 2020-10-09 at 10.16.49 AM.jpeg

सक्रीय कोविड बाधितांच्या दरात सातत्याने घसरण नोंदली जात आहे आणि त्याच प्रमाणात रोगमुक्त होणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. देशातकोविड संसर्गातून रोगमुक्त झालेले एकूण 59,06,069 रुग्ण आहेत.सध्या देशातील बरे झालेले रुग्ण आणि सक्रीय रुग्ण यांच्या एकूणसंख्येतील तफावतीने 50 लाखाचा आकडा पार केला आहे. सध्या ही तफावत 50,12,477 इतकी आहे. मोठ्या संख्येने रुग्ण बरे होत असून हीतफावत सतत वाढताना दिसत आहे.

अधिकाधिक कोविड रुग्ण रोगमुक्त होत असल्यामुळे राष्ट्रीय रोगमुक्तता दर वाढून आता 85.52% झाला आहे.गेल्या चोवीस तासांत रोगमुक्तझालेल्या 78,365 जणांना रुग्णालयातून घरी पाठवण्यात आले असून, याकालावधीत 70,496 नव्या कोविड बाधितांची नोंद झाली आहे.

देशात नव्याने रोगमुक्त झालेल्यांची संख्या नव्या बाधित रुग्णांपेक्षा जास्त असण्याचा कल सलग तिसऱ्या आठवड्यात कायम राहिला आहे.

सार्वत्रिक तपासणी, बाधितांचा शोध, त्वरित रुग्णालयामध्ये उपचाराची सुरुवात तसेच प्रमाणित उपचारपद्धतीचा अवलंब यामुळे सरकारी आणिखासगी रुग्णालयांमध्ये तसेच घरी उपचार घेणाऱ्या सर्व रुग्णांना एकच विशिष्ट आरोग्य सेवा खात्रीलायकपणे उपलब्ध करून देणे या केंद्रसरकारने आखून दिलेल्या मार्गाचा अवलंब करीत सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी एकत्रितपणे केलेल्या प्रयत्नांचे हे फळ आहे.

Image

नव्याने रोगमुक्त झालेल्यांपैकी 75 टक्के रुग्ण देशातील महाराष्ट्र,कर्नाटक, केरळ,आंध्रप्रदेश,तामीळनाडू, उत्तर प्रदेश, ओडिशा, पश्चिमबंगाल, दिल्ली आणि मध्यप्रदेश या 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील आहेत.

देशभरात महाराष्ट्र हे एकमेव असे राज्य आहे जिथे एका दिवसात सर्वात जास्त म्हणजे सुमारे 15,000 कोविडबाधित रोगमुक्त झाले आहेत.

WhatsApp Image 2020-10-09 at 10.16.43 AM.jpeg

गेल्या 24 तासांत 70,496 नव्या कोविडबाधितांची नोंद झाली आहे.

नव्याने बाधित रुग्णांपैकी 78 टक्के रुग्ण 10 राज्ये आणि केंद्रशासितप्रदेशांमधील आहेत. यापैकी महाराष्ट्रात सर्वात जास्त नव्या रुग्णांची नोंद झाली असून या कालावधीत 13,000 पेक्षा जास्त नव्या रुग्णांची नोंद झाली, त्याखालोखाल कर्नाटक राज्यात 10,000 पेक्षा जास्त नव्या रुग्णांची नोंद झाली.

WhatsApp Image 2020-10-09 at 10.16.42 AM.jpeg

गेल्या 24 तासांत 964 कोविड बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

त्यापैकी सुमारे 82 टक्के रुग्ण देशातील 10 राज्ये आणि केंद्रशासितप्रदेशांमध्ये एकवटले आहेत.

मृत्युमुखी पडलेल्या एकूण रुग्णांपैकी महाराष्ट्रात 37 टक्क्याहून जास्त म्हणजे 358 रुग्णांचे मृत्यू झाले आहेत.

WhatsApp Image 2020-10-09 at 10.16.41 AM.jpeg

बगीचे आणि तत्सम मनोरंजनाच्या ठिकाणी आराम करण्यासाठी आणि मनोरंजनासाठी मोठ्या प्रमाणावर लोकांची गर्दी होते. अशा परिस्थितीतकोविड -19 संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी केंद्र सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने बगीचे आणि मनोरंजनाच्या इतरठिकाणी घ्यायच्या सावधगिरीच्या उपाययोजनांची प्रमाणित कार्य पद्धती जारी केली आहे. त्याविषयी सविस्तर माहिती खालीलसंकेतस्थळावर मिळू शकेल:

https://www.mohfw.gov.in/pdf/SOPonpreventivemeasurestobefollowedinEntertainmentParksandsimilarplacestocontainspreadofCOVID19.pdf


* * *

U.Ujgare/S.Chitnis/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1663004) Visitor Counter : 201