पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांनी आयसीसीआरने वस्त्रोद्योग परंपरा याविषयी आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय वेबिनारला संबोधित केले


वेबिनारच्या माध्यमातून कल्पानांची देवाणघेवाण आणि उत्तम बाबी सामायिक केल्यामुळे सहकार्याची नवी दालने खुली होतील-पंतप्रधान

Posted On: 03 OCT 2020 9:22PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 3 ऑक्टोबर 2020

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आयसीसीआरने आयोजित केलेल्या वस्त्रोद्योग परंपरांविषयीच्या आंतरराष्ट्रीय वेबिनारला संबोधित केले.

याप्रसंगी बोलताना पंतप्रधानांनी भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद आणि उत्तर प्रदेश डिझाईन इन्स्टिट्यूटचे विविध देशातील लोकांना ‘विव्हींग रिलेशन्स: टेक्सटाईल ट्रॅडिशन्स’ या संकल्पनेअंतर्गत एकत्र आणल्याबद्दल कौतुक केले. ते म्हणाले, वस्त्रोद्योग क्षेत्राचा इतिहास, विविधता आणि प्रचंड संधी या माध्यमातून दिसून येतील.

पंतप्रधान भारताच्या वस्त्रोद्योग परंपरेच्या उच्च परंपरांविषयी बोलले. ते म्हणाले, नैसर्गिक रंगाचे सूत आणि रेशीमविषयी भारताचा वैभवशाली इतिहास आहे. वस्रोद्योगातील विविधता आपल्या संस्कृतीचे वैभव दर्शवते. ते म्हणाले, वस्त्र परंपरेत प्रत्येक समुदाय, प्रत्येक गाव आणि प्रत्येक राज्यांचे आगळे वैशिष्ट्ये आहे. त्यांनी आदिवासी समुदायाच्या उच्च वस्त्र परंपरा अधोरेखित केल्या. ते म्हणाले, भारताच्या वस्त्र परंपरेत रंग, तजेलता आणि तपशीलासाठीची दृष्टी आहे.   

पंतप्रधान म्हणाले, वस्त्रोद्योग क्षेत्राने नेहमीच संधी उपलब्ध करुन दिल्या आहेत. स्थानिक पातळीवर, देशात रोजगार पुरवणाऱ्या आघाडीच्या क्षेत्रांमध्ये वस्त्रोद्योग आहे. ते म्हणाले, भारतीय वस्त्रांना जागतिक पातळीवर चांगली पसंती आहे आणि परंपरा, कौशल्य, उत्पादकता आणि तंत्रज्ञान समृद्धीची जाणीव आहे.

पंतप्रधान म्हणाले, हा कार्यक्रम गांधीजींच्या 150 व्या जयंतीनिमित्त आयोजित केला आहे. महात्मा गांधींनी वस्त्रोद्योग आणि सामाजिक सशक्तीकरण यांच्यातील जवळचा संबंध पाहिला आणि साधा चरखा भारताच्या स्वातंत्र्य चळवळीचे महत्त्वपूर्ण प्रतीक म्हणून परिवर्तीत केला. चरख्याने आपल्याला एक राष्ट्र या रुपाने जोडले.   

पंतप्रधान म्हणाले वस्त्रोद्योग क्षेत्र आत्मनिर्भर भारत किंवा स्वावलंबी भारताच्या उभारणीसाठी प्रमुख क्षेत्र आहे. ते म्हणाले सरकार कौशल्य अद्ययावत करणे, आर्थिक सहाय्य आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर यावर लक्ष केंद्रीत करत आहे. ते म्हणाले आपल्या कारागिरांना जागतिक दर्जाची उत्पादने तयार करण्यासाठी, आपण जागतिक कल आणि आपल्याकडील कल दोन्ही शिकले पाहिजे. या वेबिनारमध्ये कल्पनांची देवाणघेवाण आणि उत्तम बाबी सामायिक केल्यामुळे सहकार्याची नवी दालने खुली होतील.

पंतप्रधान म्हणाले, वस्त्रोद्योगाच्या माध्यमातून जगभर महिलांना अधिक रोजगार पुरवला जातो. अशाप्रकारे वस्त्रोद्योग महिलांच्या सबलीकरणाचे प्रयत्न आणखी मजबूत करेल. ते म्हणाले खडतर काळात आपल्याला भविष्यासाठी तयारी करावी लागेल. आपल्या वस्त्रोद्योग क्षेत्राने शक्तीशाली कल्पना आणि विविधता, अनुकूलता, स्वावलंबन, कौशल्य आणि नवोन्मेष ही तत्वे प्रदर्शित केली आहेत. ही तत्वे सध्याच्या काळाशी अधिक सुसंगत बनली आहेत. वेबिनार अशा कल्पनांना अधिक बळकटी आणि वस्त्रोद्योग क्षेत्रात अधिक योगदान देणारा ठरावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. 

 

 

B.Gokhale/S.Thakur/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1661449) Visitor Counter : 181