PIB Headquarters

पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित दैनंदिन बातमीपत्र

Posted On: 01 OCT 2020 8:10PM by PIB Mumbai

 

(कोविड-19 संबंधी पत्र सूचना कार्यालयाद्वारे जारी बातम्‍या आणि सत्‍यता पडताळणी बातम्‍या समाविष्‍ट)

दिल्ली-मुंबई, 1 ऑक्टोबर 2020

 

राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी गांधी जयंतीच्या पूर्वसंध्येला राष्ट्राला उद्देशून संदेश दिला आहे.

आपल्या संदेशात राष्ट्रपती म्हणतात, आपले राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 151 व्या जयंतीनिमित्त, मी आपल्या कृतज्ञ राष्ट्राच्या वतीने त्यांना आदरांजली वाहतो.    

राष्ट्रपतींचा संपूर्ण संदेश वाचण्यासाठी इथे क्लिक करा.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रोहतांग येथे दि. 3 ऑक्टोबर, 2020 रोजी अटल बोगद्याचे उद्घाटन करण्यात येणार आहे. महामार्गावरील जगातील सर्वात जास्त लांबीचा हा अटल बोगदा आहे. मनाली ते लाहौल -स्पिती यांना जोडणा-या या बोगद्याची लांबी 9.02 किलोमीटर आहे. लाहौल स्पितीच्या संपूर्ण खो-यामध्ये हा बोगदा तयार करण्यात आला आहे. या भागामध्ये होणा-या हिमवर्षावामुळे लाहौल स्पितीच्या पुढच्या भूप्रदेशाला जवळपास सहा महिने उर्वरित देशाबरोबर संपर्क साधणे शक्य होत नव्हते.

 

आरोग्य मंत्रालयाची कोविड-19घडामोडींवरील माहिती :

सक्रीय रुग्ण संख्या 10 लाखाच्या खाली राखण्याचा कल भारताने कायम राखला आहे. सलग दहाव्या दिवशी, सक्रीय रुग्ण 10 लाखापेक्षा कमी आहेत. प्रत्येक दिवशी कोरोना रुग्ण यातून मोठ्या संख्येने बरे होत असल्याने दररोज बरे होणाऱ्यांची मोठी संख्या नोंदवण्याचा कलही जारी राहिला आहे. देशात गेल्या 24 तासात 85,376 रुग्ण कोरोनातून बरे झाले.

भारतात आतापर्यंत 52,73,201 जण कोरोना मुक्त झाले आहेत. दर दिवशी मोठ्या संख्येने रुग्ण बरे होत असल्याने यासाठीच्या राष्ट्रीय दरातही सातत्याने वाढ होत असून  सध्या हा दर  83.53% आहे.

बरे झालेल्यांच्या एकूण संख्येतही मोठी वाढ होत असून कोरोना मुक्त झालेल्यांच्या संख्येत शेवटच्या 10 लाखाची भर केवळ 12 दिवसात झाली आहे. कोरोनातून बरे झालेल्यापैकी 77%  लोक दहा राज्ये/ केंद्र शासित प्रदेशातले आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण बरे झाले असून त्यानंतर आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू ही राज्ये आहेत. भारतात 9,40,705 सक्रीय रुग्ण आहेत. सक्रीय रुग्णांपैकी 76 % रुग्ण दहा राज्य/ केंद्र शासित प्रदेशात आहेत. देशात पॉझीटीव्ह रुग्णांच्या 14.90% सक्रीय रुग्ण आहेत. देशात गेल्या 24 तासात 86,821 नव्या रुग्णांची नोंद झाली. यापैकी 76% रुग्ण  दहा राज्यात असून महाराष्ट्रात 18,000 पेक्षा जास्त रुग्णांची नोंद झाली आहे. कर्नाटक आणि केरळ या दोन्ही राज्यात  8000 पेक्षा जास्त रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या 24 तासात 1,181 मृत्यूंची नोंद झाली आहे. यापैकी 82% मृत्यू 10 राज्ये/ केंद्र शासित प्रदेशात झाले आहेत. काल नोंद झालेल्या मृत्यूपैकी 40% मृत्यू   महाराष्ट्रात झाले असून या राज्यात 481 जणांच्या तर कर्नाटकमध्ये 87 मृत्यूंची नोंद झाली.  


इतर अपडेट्स: 

 

महाराष्ट्र अपडेट्स :

कोरोना विषाणू (कोविड 19) च्या प्रसाराला आळा घालण्यासाठी लागू करण्यात आलेला लॉक डाउन महाराष्ट्र सरकारने 31 ऑक्टोबर पर्यंत वाढवला आहे. तथापि, हॉटेल, फूड कोर्ट, रेस्टॉरंट्स आणि बार 5 ऑक्टोबरपासून 50 टक्के क्षमतेसह चालू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. मुंबईत विविध ठिकाणी कामाला असलेल्या लोकांना जेवणाचा डबा पोहचवणाऱ्या मुंबईच्या डबेवाल्यांना मुंबईच्या लोकलमधून प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

FACT CHECK

* * *

B.Gokhale/S.Tupe/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1660793) Visitor Counter : 221