आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
सक्रीय रुग्ण संख्येचा स्तर सातत्याने कमी राखण्याचा भारताचा कल कायम
सलग दहाव्या दिवशी सक्रीय रुग्ण 10 लाखाच्या खाली
Posted On:
01 OCT 2020 1:50PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 1 ऑक्टोबर 2020
सक्रीय रुग्ण संख्या 10 लाखाच्या खाली राखण्याचा कल भारताने कायम राखला आहे.
सलग दहाव्या दिवशी, सक्रीय रुग्ण 10 लाखापेक्षा कमी आहेत.
प्रत्येक दिवशी कोरोना रुग्ण यातून मोठ्या संख्येने बरे होत असल्याने दररोज बरे होणाऱ्यांची मोठी संख्या नोंदवण्याचा कलही जारी राहिला आहे. देशात गेल्या 24 तासात 85,376 रुग्ण कोरोनातून बरे झाले.
भारतात आतापर्यंत 52,73,201 जण कोरोना मुक्त झाले आहेत. दर दिवशी मोठ्या संख्येने रुग्ण बरे होत असल्याने यासाठीच्या राष्ट्रीय दरातही सातत्याने वाढ होत असून सध्या हा दर 83.53% आहे.
बरे झालेल्यांच्या एकूण संख्येतही मोठी वाढ होत असून कोरोना मुक्त झालेल्यांच्या संख्येत शेवटच्या 10 लाखाची भर केवळ 12 दिवसात झाली आहे.
कोरोनातून बरे झालेल्यापैकी 77% जण दहा राज्ये/ केंद्र शासित प्रदेशातले आहेत.
महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण बरे झाले असून त्यानंतर आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू ही राज्ये आहेत.
भारतात 9,40,705 सक्रीय रुग्ण आहेत.
सक्रीय रुग्णांपैकी 76 % रुग्ण दहा राज्य/ केंद्र शासित प्रदेशात आहेत. देशात पॉझीटीव्ह रुग्णांच्या 14.90% सक्रीय रुग्ण आहेत.
देशात गेल्या 24 तासात 86,821 नव्या रुग्णांची नोंद झाली.
यापैकी 76% रुग्ण दहा राज्यात असून महाराष्ट्रात 18,000 पेक्षा जास्त रुग्णांची नोंद झाली आहे. कर्नाटक आणि केरळ या दोन्ही राज्यात 8000 पेक्षा जास्त रुग्णांची नोंद झाली आहे.
गेल्या 24 तासात 1,181 मृत्यूंची नोंद झाली आहे.
यापैकी 82% मृत्यू 10 राज्ये/ केंद्र शासित प्रदेशात झाले आहेत.
काल नोंद झालेल्या मृत्यूपैकी 40% मृत्यू महाराष्ट्रात झाले असून या राज्यात 481 जणांच्या तर कर्नाटकमध्ये 87 मृत्यूंची नोंद झाली.
* * *
U.Ujgare/N.Chitale/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1660574)
Visitor Counter : 239
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam