राष्ट्रपती कार्यालय
गांधी जयंतीच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींचा संदेश
Posted On:
01 OCT 2020 6:30PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 1 ऑक्टोबर 2020
राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी गांधी जयंतीच्या पूर्वसंध्येला राष्ट्राला उद्देशून संदेश दिला आहे.
आपल्या संदेशात राष्ट्रपती म्हणतात, आपले राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 151 व्या जयंतीनिमित्त, मी आपल्या कृतज्ञ राष्ट्राच्या वतीने त्यांना आदरांजली वाहतो.
दरवर्षी 2 ऑक्टोबर रोजी केवळ भारतातच नाही तर जगभरात गांधीजींचे स्मरण केले जाते. सर्व मानवजातीसाठी ते प्रेरणेचा स्रोत आहेत. त्यांची जीवन-गाथा समाजातील दुर्बल घटकांचे सबलीकरण करुन त्यांना समर्थ बनवते. त्यांचा सत्य, अहिंसा आणि प्रेमाचा संदेश समाजात एकोपा आणि समानता आणून जगाच्या कल्याणाचा मार्ग दाखवतो. त्यांची मुल्ये पूर्वी जेवढी सुसंगत होती तेवढीच आज आहेत आणि भविष्यातही राहतील.
लोकांना आता कळले आहे की, गांधीजींनी सुचवलेल्या सद्भावना आणि सहिष्णुतेच्या मार्गाने सर्वात मोठ्या समस्येवर तोडगा निघू शकतो. गांधीजींचे स्वत: चे आयुष्य हे या मार्गावर जाण्याचे एक तेजस्वी उदाहरण आहे. त्यांची आपल्याला शिकवण होती की, जे आपले हितचिंतक नाहीत त्यांच्याशीसुद्धा चांगले वागले पाहिजे आणि सर्वांप्रती प्रेम, दयाळूपणा आणि क्षमा या भावनेने वागले पाहिजे. आपल्या विचारांमध्ये, शब्दांमध्ये आणि कृतीत समरसता असली पाहिजे.
गांधीजींनी आपल्या प्रयत्नांमधून नैतिकता आणि ध्येय आणि साधनांच्या सात्विकतेला खूप महत्त्व दिले. मला आनंद आहे की, सरकारच्या स्वच्छ भारत मिशन, महिला सबलीकरण, गरीब आणि दलित जनतेचे सक्षमीकरण, शेतकर्यांना मदत आणि खेड्यांमध्ये अत्यावश्यक सुविधा पुरविणे यासारख्या प्रयत्नांचा मुख्य आधार गांधीजींचे विचार आणि उपदेश आहेत.
गांधी जयंतीच्या या मंगल मुहूर्तावर आपण स्वत:ला देशाचे कल्याण आणि प्रगती याकडे वळविण्याचा, सत्य आणि अहिंसेच्या मंत्राचा अवलंब करण्याचा आणि स्वच्छ, सक्षम, मजबूत आणि समृद्ध भारत घडवण्याचा निर्धार करण्याचा आणि गांधीजींची स्वप्ने सत्यात उतरवण्याचा संकल्प करू.
राष्ट्रपतींचा संदेश हिंदीमध्ये वाचण्यासाठी इथे क्लिक करा.
* * *
M.Chopade/S.Thakur/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1660722)
Visitor Counter : 193