ग्रामीण विकास मंत्रालय
गरीब कल्याण रोजगार अभियानाच्या उद्दीष्टांसाठी आतापर्यंत सुमारे 30 कोटी मनुष्यदिन रोजगार उपलब्ध करुन देण्यात आला असून 27,000 कोटींपेक्षा अधिक खर्च करण्यात आला
1.14 लाख जलसंवर्धनाची कामे, सुमारे 3.65 लाख ग्रामीण गृहनिर्माण आणि 10,500 सामुदायिक स्वच्छता संकुलांची अभियानाच्या माध्यमातून उभारणी
Posted On:
30 SEP 2020 7:55PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 30 सप्टेंबर 2020
गरीब कल्याण रोजगार अभियानामार्फत बिहार, झारखंड, मध्य प्रदेश, ओदिशा, राजस्थान आणि उत्तर प्रदेश या सहा राज्यांतील स्थलांतरीत मजूरांना रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी मिशन मोडवर कार्य केले जात आहे. या अभियानाच्या माध्यमातून या राज्यांतील 116 जिल्ह्यांमध्ये उपजिविकेच्या संधी निर्माण करुन गावकऱ्यांचे सक्षमीकरण केले जात आहे.
या अभियानाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी 13 व्या आठवड्यात 30 कोटी मनुष्यदिन रोजगारनिर्मिती करण्यात आली आहे, त्यासाठी 27,003 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. या अभियानातून 1,14,344 जल संवर्धनाची कामे, 3,65,075 ग्रामीण गृहनिर्माण, 27,446 जनावरांसाठी निवारे, 19,527 शेततळी आणि 10,446 सामुदायिक स्वच्छता संकुलांची उभारणी करण्यात आली आहे.
6727 कामगारांना जिल्हा खनिज निधीतून रोजगार पुरवण्यात आला आहे, 1,662 ग्रामपंचायतींना इंटरनेट जोडणी पुरवण्यात आली आहे, घन आणि तरल कचरा व्यवस्थापनाशी संबंधित 17,508 कामे हाती घेण्यात आली आहेत आणि 54,455 उमेदवारांना कृषी विज्ञान केंद्रांमार्फत कौशल्य प्रशिक्षण देण्यात आले आहे.
या अभियानाचे यश 12 मंत्रालय/विभाग आणि राज्य सरकारांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे शक्य झाले आहे, ज्यात स्थलांतरीत मजूर आणि ग्रामीण समुदायांना जास्तीत जास्त लाभ देण्यात येत आहे.
गरीब कल्याण रोजगार अभियान कोविड-19 उद्रेकानंतर गावी परतणाऱ्या स्थलांतरीत मजूरांना रोजगारनिर्मिती आणि उपजिविकेच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी सुरु करण्यात आले. ज्यांनी गावी राहण्यास प्राधान्य दिले त्यांना रोजगार आणि उपजिविकेच्या संधी यातून दीर्घ कालीन लाभ मिळवून देण्यासाठी या अभियानाच्या माध्यमातून परिस्थिती निर्माण झाली आहे.
B.Gokhale/S.Thakur/ P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1660434)
Visitor Counter : 234