आयुष मंत्रालय
आयुष मंत्रालयाकडून औषधी वनस्पती क्षेत्रासाठी पुण्यात प्रादेशिक सुविधा केंद्र स्थापन
Posted On:
01 OCT 2020 3:01PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 1 ऑक्टोबर 2020
आयुष मंत्रालयाचे सचिव वैद्य राजेश कोटेचा यांनी, आयुष मंत्रालयाअंतर्गत राष्ट्रीय औषधी वनस्पती मंडळाच्या पश्चिम विभाग, प्रादेशिक आणि सुविधा केंद्राचे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात 29 सप्टेंबर 2020 ला व्हर्च्युअल माध्यमातून उद्घाटन केले. पद्मभूषण, बिहारमधल्या नालंदा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ विजय भटकर, पश्चिम विभाग, प्रादेशिक आणि सुविधा केंद्राचे समन्वयक आणि वनस्पतीशास्त्र विभागाचे प्रमुख,प्राध्यापक, डॉ, ए बी अडे, राष्ट्रीय औषधी वनस्पती मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ जे एल शास्त्री या कार्यक्रमाला उपस्थित होते.
औषधी वनस्पती लागवडी बाबत राष्ट्रीय औषधी वनस्पती मंडळाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रादेशिक सुविधा केंद्राच्या भूमिकेवर कोटेचा यांनी भर दिला. आत्मनिर्भर भारत अंतर्गत येणाऱ्या प्रकल्पात वनौषधीच्या लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी आयुष मंत्रालयाचे प्रयत्न त्यांनी विशद केले.
देशाच्या विविध भागात औषधी वनस्पतीवर काम करणाऱ्या मान्यवर संस्था आणि विद्यापीठात, 2017-18 पासून मंडळाने सहा प्रादेशिक आणि सुविधा केंद्रांची स्थापना केली आहे. मंडळाच्या विविध योजना राज्य औषधी वनस्पती मंडळ, राज्य वने, कृषी, विभाग यांच्यासह राज्य स्तरावर राबवण्यासाठी ही केंद्रे उपयुक्त ठरणार आहेत.
पुण्यातले हे नवे सुविधा केंद्र, गोवा, गुजरात, महाराष्ट्र, राजस्थान, दादरा आणि नगर हवेली, दमण आणि दीव मध्ये, मंडळाच्या उपक्रमांची अंमलबजावणी आणि समन्वय ठेवणार आहे. आयुष औषधालयामार्फत बाजारपेठेशी जोडण्यासह जतन आणि लागवड उपक्रम हे केंद्र राबवणार आहे.
* * *
M.Chopade/N.Chitale/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1660597)
Visitor Counter : 269