PIB Headquarters
पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित दैनंदिन बातमीपत्र
प्रविष्टि तिथि:
07 SEP 2020 7:10PM by PIB Mumbai

(कोविड-19 संबंधी पत्र सूचना कार्यालयाद्वारे जारी बातम्या आणि सत्यता पडताळणी बातम्या समाविष्ट)



दिल्ली-मुंबई, 7 सप्टेंबर 2020
राज्यपालांच्या ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020’ वरील परिषदेचे राष्ट्रपती कोविंद यांच्या हस्ते उद्घाटन. ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020’ विषयी राज्यपालांच्या एक दिवसीय आभासी परिषदेचे आज आयोजन करण्यात आले होते. नवीन शैक्षणिक धोरण म्हणजे काही केवळ कागदी दस्तऐवज नाही तर देशाच्या आशा आकांक्षांची पूर्ती कशी होऊ शकेल, याचा त्यामध्ये विचार करण्यात आला आहे, यावर राष्ट्रपती राम नाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल ‘निशंक’, विविध राज्यांचे राज्यपाल, केंद्रशासित प्रदेशांचे नायब राज्यपाल यांचे एकमत झाले.
कोविड -19 महामारीच्या पार्श्वभूमीवर कुक्कुटपालन व दुग्धशाळा क्षेत्राचे संरक्षण करण्यासाठी घेतलेल्या उपायांची माहिती उपराष्ट्रपतींना दिली. मुलांची पोषण पातळी सुधारण्यासाठी नाश्ता किंवा माध्यान्न भोजनात दूध दिले जाऊ शकते अशी सूचना उपराष्ट्रपती एम. वेंकैय्या नायडू यांनी आज केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय शिक्षण धोरणावरील राज्यपालांच्या परिषदेच्या उद्घाटन सत्राला संबोधित केले. यावेळी बोलताना पंतप्रधान म्हणाले की, शिक्षण धोरण आणि शिक्षण व्यवस्था देशाच्या आकांक्षा पूर्ण करण्याची महत्त्वपूर्ण साधने आहेत.
आरोग्य मंत्रालयाची कोविड-19घडामोडींवरील माहिती :
रूग्णालयात नेण्यासाठी रुग्णवाहिकांची तत्पर सेवा आणि प्रत्येक टप्प्यावरील सुव्यवस्थापनामुळे कोविड -19 बाधीत रुग्ण मोठ्या प्रमाणावर बरे होऊन त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले. यामुळे मृत्यूदरातही घट होऊन तो 1.70% पर्यंत कमी झाला आहे. घरे आणि सुविधा केंद्रांमध्ये देखरेखीखाली विलगीकरण, तसेच खबरदारीच्या उपाययोजनांचा अवलंब केल्यामुळे सौम्य आणि मध्यम लक्षणे असणारे रूग्ण लवकर बरे होऊ शकले आहेत.
देशातील एकूण रूग्णांपैकी 60% रूग्ण पाच राज्यांमध्ये आहेत. महाराष्ट्रात सर्वात जास्त 21.6%, आंध्र प्रदेशमध्ये 11.8%, तामिळनाडूमध्ये 11.0%, कर्नाटकमध्ये 9.5% तर उत्तर प्रदेशमध्ये 6.3% रूग्ण आहेत.
देशातील एकूण सक्रिय रूग्णांपैकी 26.76% रूग्ण महाराष्ट्रातले आहेत. त्यापाठोपाठ आंध्र प्रदेशमध्ये 11.30%, कर्नाटकमध्ये 11.25%, उत्तर प्रदेशमध्ये 6.98% आणि तामीळनाडूमध्ये 5.83% सक्रिय रूग्ण आहेत. देशातील एकूण सक्रिय रूग्णांपैकी 62% रूग्ण या पाच राज्यांमध्ये आहेत.
- सर्वाधिक चाचण्या करणाऱ्या देशांपैकी भारत आहे. दैनंदिन चाचणी क्षमता 11.70 लाखांहून अधिक झाली आहे. देशात आतापर्यंत एकूण चाचण्यांची संख्या सुमारे 5 कोटी (4,95,51,507) आहे, गेल्या 24 तासांत 7,20,362 चाचण्या करण्यात आल्या आहेत.देशभरात वाढवण्यात आलेल्या चाचण्यांचा परिणाम म्हणून देशात गेल्या दोन आठवड्यात 1,33,33,904 चाचण्या करण्यात आल्या आहेत.
- केंद्रीय आरोग्य मंत्रालय कोविड महामारीच्या प्रसारावर कृतीशीलपणे लक्ष ठेवून आहे आणि ज्या जिल्ह्यातील सक्रिय कोविड रूग्णांची संख्या आणि मृत्यु दर वाढत आहे अशा सर्व संबंधित राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील अधिकाऱ्यांशी प्रभावीपणे संवाद साधत असून त्यांना या संकटाचे व्यवस्थापन करण्यासाठी मार्गदर्शन करत आहे.या संदर्भात केंद्रीय आरोग्य सचिवांनी महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, गुजरात, पुडूचेरी ,झारखंड आणि दिल्ली या राज्यांतील आरोग्य सचिवांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेऊन संवाद साधला आणि त्यांच्या अधिपत्याखाली येणाऱ्या 33 जिल्ह्यांतील प्रतिबंधात्मक योजना आणि कोविड व्यवस्थापनाचा आढावा घेतला. यात महाराष्ट्रातील पुणे, नागपूर, ठाणे, मुंबई, मुंबई उपनगरे,कोल्हापूर, सांगली,नाशिक, अहमदनगर ,रायगड, जळगाव, सोलापूर, सातारा, पालघर, औरंगाबाद, धुळे आणि नांदेड या जिल्ह्यांचा समावेश आहे.
इतर अपडेट्स:
महाराष्ट्र अपडेट्स :
महाष्ट्रात कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. गेल्या सात दिवसांत 126,523 रुग्ण आणि 2,205 मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यात सध्या एकूण 235,857 सक्रीय रुग्ण आहेत, ही संख्या देशातील रुग्णांच्या एक-चतुर्थांश एवढी आहे. कोरोना रुग्णांची संख्या कमी करण्याच्या उद्देशाने राज्य सरकार टेलि-आयसीयु प्रकल्पाचा विस्तार करण्यासंदर्भात विचार करत आहे. टेलि-आयसीयू सेटअपमध्ये एक क्रिटीकल केअर टीम असते जी ग्रामीण भागातील रूग्णांवर उपचार करणार्या आणि दुर्गम भागातील रुग्णालयांना मार्गदर्शन करण्यासाठी माहिती-तंत्रज्ञान आणि दळणवळण साधनांचा वापर करते. या माध्यमातून राज्यातील वैद्यकीय तज्ज्ञांच्या कमतरतेची पूर्तता करणे, गंभीर आजारी रूग्णांना उपचार उपलब्ध करून देणे आणि मृत्यु दर कमी करणे अपेक्षित आहे.
FACTCHECK


* * *
M.Chopade/S.Thakur/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1652076)
आगंतुक पटल : 273