संरक्षण मंत्रालय
हायपरसॉनिक तंत्रज्ञानाचे प्रदर्शन करणाऱ्या व्हेईकलची डीआरडीओ कडून यशस्वी चाचणी
Posted On:
07 SEP 2020 5:02PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 7 सप्टेंबर 2020
संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) ने आज ओदिशाच्या किनाऱ्यावरील व्हीलर बेटावरील डॉ. एपीजे अब्दुल कलाम लाँच कॉम्प्लेक्सवरून सकाळी 11वाजून 03 मिनिटांनी हायपरसॉनिक तंत्रज्ञानाचे प्रदर्शन करणाऱ्या व्हेईकलच्या (एचएसटीडीव्ही) उड्डाण चाचणीद्वारे हायपरसॉनिक एअर-ब्रीदिंग स्क्रॅमजेट तंत्रज्ञानाचे यशस्वीरित्या प्रदर्शन केले.
हायपरसॉनिक क्रूझ व्हेईकलचे एक घन रॉकेट मोटर वापरुन उड्डाण केले गेले होते, ज्याद्वारे ते 30 किलोमीटर (किमी) उंचीवर नेण्यात आले, जिथे एरोडायनामिक उष्णता कवच हायपरसॉनिक मॅक क्रमांकावर विभक्त केले गेले. क्रूझ वाहन प्रक्षेपण वाहनापासून विभक्त झाले आणि ठरल्यानुसार वायुद्वार उघडले. हायपरसोनिक ज्वलन सुरु राहून क्रूझ वाहन आपल्या इच्छित उड्डाण मार्गावर ध्वनीच्या गतीच्या सहा पट वेगाने म्हणजेच 02 किमी / सेकंद नुसार सुमारे 20 पेक्षा अधिक सेकंदासाठी त्याच्या इच्छित उड्डाण मार्गावर कार्यरत होते. इंधन आत सोडणे आणि स्क्रॅमजेटचे स्वयं प्रज्वलन यासारख्या महत्वपूर्ण घटनांद्वारे तांत्रिक परिपक्वता दिसून आली. एखाद्या पाठ्यपुस्तकानुसार स्क्रॅमजेट इंजिनने सादरीकरण केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारताचा दृष्टिकोन साकार करण्याच्या या महत्त्वपूर्ण कामगिरीबद्दल संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी डीआरडीओचे अभिनंदन केले. या प्रकल्पाशी संबंधित वैज्ञानिकांशीही त्यांनी संवाद साधला आणि या महान कामगिरीबद्दल त्यांचे अभिनंदन केले. भारताला त्यांचा अभिमान आहे, असेही ते म्हणाले.
या यशस्वी प्रात्यक्षिकानंतर देशाने प्रगत हायपरसॉनिक वाहनांसाठी हायपरसॉनिक दुनियेत प्रवेश केला आहे.
या यशस्वी प्रात्यक्षिकाचा व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा
* * *
M.Chopade/V.Joshi/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1652017)
Visitor Counter : 325