आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोविड-19 चाचण्यात मोठी वाढ, भारताने केल्या 4.23 कोटीपेक्षा जास्त चाचण्या


नोंद झालेल्या एकूण रुग्णांपैकी 43% रुग्ण केवळ महाराष्ट्र, आंध्रप्रदेश आणि कर्नाटक या तीन राज्यात

Posted On: 31 AUG 2020 1:53PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 31 ऑगस्ट 2020

भारताने कोविड-19 चाचण्यात वाढ करण्याच्या ठाम निर्धाराचे दर्शन घडवल्याने या चाचण्यात वेगाने वाढ होत आहे. देशात कोविड-19 तपासणीचे काम सर्व प्रथम 20 जानेवारी 2020 ला पुण्यातल्या प्रयोगशाळेपासून सुरू झाले होते, ऑगस्ट महिन्यापर्यंत दररोज 10  लाखाहून अधिक चाचण्या करण्याची क्षमता आता झाली आहे.

आतापर्यंत झालेल्या एकूण चाचण्यांची संख्या आज 4.23 कोटीहून अधिक झाली आहे.  गेल्या चोवीस तासात 8,46,278 चाचण्या करण्यात आल्या.

गेल्या चोवीस तासात (रविवार, 30 ऑगस्ट 2020 ) भारतात  78,512 रुग्णांची नोंद झाली. म्हणजेच गेल्या 24 तासात सुमारे 80,000 रुग्णांची नोंद झाल्याच्या  काही माध्यमांनी दिलेल्या वृत्तामध्ये तथ्य नाही.

गेल्या 24 तासातल्या या नव्या रुग्णापैकी 70% रुग्ण सात राज्यातले आहेत. यापैकी महाराष्ट्रात सर्वात जास्त म्हणजे सुमारे 21% रुग्ण आहेत, त्याखालोखाल आंध्रप्रदेश(13.5%),कर्नाटक (11.27%) आणि तामिळनाडू 8.27% आहे. तर  उत्तर प्रदेश 8.27%,पश्चिम बंगाल 3.85% आणि ओदिशात 3.84% आहेत.

एकूण रुग्णापैकी 43% रुग्ण केवळ महाराष्ट्र, आंध्रप्रदेश आणि कर्नाटक या तीन राज्यात नोंदवले गेले आहेत. तर एकूण रुग्णापैकी तामिळनाडूत 11.66% रुग्ण आहेत.

गेल्या 24 तासात कोविड-19 मुळे झालेल्या मृत्यू पैकी सुमारे 50% मृत्यू महाराष्ट्र, आंध्रप्रदेश आणि कर्नाटक मध्ये झाले आहेत, यामध्ये महाराष्ट्राची टक्केवारी सर्वात जास्त म्हणजे  30.48%आहे.

रुग्ण संख्येत मोठी वाढ दर्शवणाऱ्या आणि मृत्यू दर जास्त असणाऱ्या राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांशी केंद्र सरकार नियमित संपर्कात आहे. मृत्यू दर कमी करण्यासाठी, मोठ्या प्रमाणात चाचण्या, प्रभावी वैद्यक व्यवस्थापन यांच्या बरोबरीने विविध स्तरावर प्रभावी देखरेख ठेवण्याच्या सूचनाही या राज्यांना आणि केंद्र शासित प्रदेशांना देण्यात आल्या आहेत. कोविड-19 शी संबंधित सर्व तांत्रिक मुद्दे, मार्गदर्शक तत्वे,आणि सल्ल्यासंबंधी अधिकृत आणि अद्ययावत माहितीसाठी कृपया येथे नियमितपणे भेट द्याः https://www.mohfw.gov.in/  आणि @MOHFW_INDIA.

कोविड-19 शी संबंधित तांत्रिक विचारणा  technicalquery.covid19[at]gov[dot]in यावर तर इतर मुद्दे  ncov2019[at]gov[dot]in आणि @CovidIndiaSeva यावर पाठवू शकता.

कोविड-19 संदर्भात काही शंका असल्यास कृपया आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या + 91-11-23978046 या हेल्पलाइनवर किंवा 1075 (टोल फ्री) क्रमांकावर संपर्क साधा. कोविड-19 वरील राज्ये/केंद्रशासित प्रदेशांच्या हेल्पलाइन क्रमांकाची यादी https://www.mohfw.gov.in/pdf/coronvavirushelplinenumber.pdf.वर उपलब्ध आहे.

 

U.Ujgare/N.Chitale/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1649968) Visitor Counter : 192