आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

मोठ्या प्रमाणावरील रोगमुक्तीमुळे भारतात रुग्ण बरे होण्याचा दर जवळपास 75 %


सक्रीय रुग्णांपेक्षा रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 16 लाखांहून अधिक

जागतिक स्तरावर सर्वांत कमी दर असणाऱ्या काही देशांमध्ये भारताचा समावेश, भारतातील मृत्यू दर आणखी कमी होत आहे

Posted On: 23 AUG 2020 4:58PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 23 ऑगस्‍ट 2020

 

रोगमुक्त होण्याचे प्रमाण सातत्याने वाढत असल्यामुळे भारतात कोविड – 19 रुग्णांचा बरे होण्याचा दर जवळपास 75 % वर पोहोचला आहे.

गेल्या 24 तासात 57,989 रुग्ण बरे झाल्यामुळे, ही रुग्ण बरे होण्याची संख्या आज 22,80,566 वर पोहोचली आहे. 

भारतातील रुग्ण बरे होण्याची संख्या आता सक्रीय रुग्णांपेक्षा (7,07,668) 16 लाखांनी (1,572,898) वाढली आहे.

आलेखामध्ये दर्शविल्यानुसार, रुग्ण बरे होण्याची दैनंदिन सरासरी संख्या 15,018 (1 ते 7 जुलै 2020) ते 60,557(19 ते 23 ऑगस्ट या आठवड्यात) सातत्याने वाढत आहे.

रुग्ण बरे होण्याच्या संख्येत निरंतर वाढ होत असल्यामुळे हे निश्चित झाले आहे की, देशातील वास्तविक सक्रीय  रुग्णांची संख्या आता कमी होत आहे आणि एकूण सक्रीय रुग्णांपैकी केवळ 23.24 %  रुग्णांचा सध्या समावेश आहे. यामुळे देखील हळूहळू मृत्यूदर कमी होत आहे. सध्याचा भारतातील रुग्णांचा 1.86% हा मृत्यू दर (सीएफआर) जगातील सर्वांत कमी दर असणाऱ्यांपैकी एक आहे. चाचणीची आक्रमकपणे यशस्वी अंमलबजावणी करणे, उपाययोजनांचा व्यापकतेने संपूर्णपणे आढावा घेणे आणि चाचणी करणे, यामुळे रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण देखील सातत्याने वाढते राहिले आहे.

 कोविड रुग्णांचे बरे होण्याचे मोठे प्रमाण आणि घटते मृत्यू दर यामुळे सिद्ध झाले आहे की भारताची श्रेणीबद्ध आणि समर्थक कार्यनीती प्रत्यक्ष परिणाम दाखवित  आहे.

कोविड-19 संदर्भात कुठलीही अधिकृत आणि ताजी आकडेवारी/माहिती हवी असल्यास, तसेच काही मार्गदर्शक तत्वे अथवा सूचना बघायच्या असल्यास, कृपया खालील संकेतस्थळाला भेट द्यावी : https://www.mohfw.gov.in/ आणि  @MoHFW_INDIA.

तांत्रिक गोष्टींच्या माहितीसाठी संपर्क साधायचा असल्यास, या ईमेल आय डी वर साधावा: technicalquery.covid19[at]gov[dot]in आणि इतर शंका/समस्यांसाठी ईमेल आयडी- ncov2019[at]gov[dot]in

कोविड19 संदर्भात इतर माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक (हेल्पलाईन): +91-11-23978046 किंवा 1075 (Toll-free). सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या हेल्पलाईन्सची यादी सोबत जोडली आहे. https://www.mohfw.gov.in/pdf/coronvavirushelplinenumber.pdf

 

* * *

B.Gokhale/S.Shaikh/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1648061) Visitor Counter : 173