PIB Headquarters

पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित दैनंदिन बातमीपत्र

Posted On: 13 AUG 2020 7:40PM by PIB Mumbai

दिल्ली-मुंबई, 13 ऑगस्ट 2020

(कोविड-19 संबंधी पत्र सूचना कार्यालयाद्वारे जारी बातम्‍या आणि सत्‍यता पडताळणी बातम्‍या समाविष्‍ट)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज पारदर्शक करप्रणाली – प्रामाणिकतेचा सन्मान मंचाचे व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून उद्‌घाटन करण्यात आले. याप्रसंगी बोलताना पंतप्रधान म्हणाले, देशातील संरचनात्मक सुधारणांच्या प्रक्रियेने आज नवी उंची गाठली आहे. पंतप्रधान म्हणाले, पारदर्शक करप्रणाली – प्रामाणिकतेचा सन्मान, या मंचाचा आरंभ 21 व्या शतकाच्या करप्रणालीच्या आवश्यकता पूर्ण करण्याच्या उद्देशाने करण्यात आला आहे. त्यांनी याविषयी तपशीलवार माहिती देताना सांगितले की, या प्लॅटफॉर्मवर फेसलेस  मूल्यांकन, फेसलेस अपील आणि करदात्यांची सनद अशा मोठ्या सुधारणा करण्यात आल्या आहेत.

आरोग्य मंत्रालयाची कोविड-19घडामोडींवरील माहिती :

भारतात एका दिवसात सर्वाधिक 56,383 रुग्ण बरे होण्याच्या आणखी एका विक्रमाची नोंद झाली आहे. या आकड्यासह, कोविड-19 च्या बरे झालेल्या रुग्णांचा आकडा आज जवळपास 17 लाखावर (16,95,982) पोहोचला आहे.

केंद्र आणि राज्य / केंद्रशासित प्रदेश सरकारच्या एकत्रित, केंद्रित आणि सहयोगी प्रयत्नांसह लाखो आघाडीच्या कर्मचाऱ्यांच्या सहाय्यामुळे, केंद्र सरकारच्या सल्ल्यानुसार स्टँडर्ड ऑफ केअरच्या माध्यमातून गंभीर स्वरूपाच्या रुग्णांचे प्रभावी क्लिनिकल व्यवस्थापन, गृह अलगीकरण यासारख्या उपाययोजनांच्या माध्यमातून चाचणी करणे, पाठपुरावा करणे आणि प्रभावी उपचारांची यशस्वी अंमलबजावणी सुनिश्चित केली आहे. रुग्ण बरे होण्याच्या संख्येत सतत होणाऱ्या वृद्धीमुळे रुग्ण बरे होण्याच्या दराने 70 % चा टप्पा पार केला आहे, कोविड-19 रुग्णांचे मृत्यूचे प्रमाण कमी होऊन मृत्यू दर 1.96% वर आला आहे आणि यात सतत घसरण होत आहे.

रुग्ण बरे होण्याच्या विक्रमी नोंदीमुळे हे सुनिश्चित झाले आहे की देशातील कोविडच्या सक्रीय रुग्णांचे प्रमाण कमी झाले आहे आणि सध्या देशात एकूण रुग्णांपैकी 27.27 % सक्रीय  कोविड-रुग्ण आहेत. सक्रीय रुग्णांपेक्षा (6,53,622) बरे झालेल्या रुग्णांची संख्या 10 लाखांहून अधिक आहे.

इतर अपडेट्स:

महाराष्ट्र अपडेट्स :

महाराष्ट्रात बुधवारी 12,712 नवीन रुग्णांची नोंद झाली तर 13,804 रुग्ण बरे झाले. राज्यात 1.47 लाख सक्रिय रुग्ण आहेत. महाराष्ट्रात कोविडमुळे सर्वाधिक 18,650 मृत्यू झाले असले तरी 3.81 लाखांहून अधिक रुग्ण बरे झाले आहेत.  कोविड -19 रुग्णालय शुल्काबाबतच्या अधिसूचनेचा महाराष्ट्र सरकारने आढावा घ्यावा, असे आवाहन आयएमए अर्थात भारतीय वैद्यकीय संघटनेने केले आहे. महात्मा फुले जन आरोग्य योजनेत ऑक्सिजन बेड, व्हेंटीलेटर नसलेले अतिदक्षता विभाग आणि व्हेंटीलेटरसह अतिदक्षता विभाग यासाठी असलेले प्रतिदिन 4000 ते 9000 दरम्यानचे दर गंभीर कोविड रुग्णांच्या उपचारासाठी पुरेसे नाहीत, असे आयएमएच्या महाराष्ट्र युनिटचे म्हणणे आहे.

 

 

BG/ST/PM

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1645579) Visitor Counter : 179