आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

केंद्र सरकारने राज्यांना तीन कोटींपेक्षा जास्त एन-95 मास्क वितरित करण्याचा महत्वपूर्ण टप्पा गाठला


केंद्र सरकारच्या वतीने 1.28 कोटीपेक्षा जास्त पीपीई संच आणि 10 कोटी एचसीक्यू यांचे विनामूल्य वितरण केले

Posted On: 13 AUG 2020 1:00PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 13 ऑगस्ट 2020

संपूर्ण देशभर कोविड-19 महामारीचा झालेला उद्रेक लक्षात घेवून त्याच्या नियंत्रणासाठी आणि व्यवस्थापनासाठी केंद्र सरकारच्या वतीने सर्वतोपरी उपाययोजना केल्या जात आहेत तसेच अथक परिश्रम घेण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणजे केंद्र सरकारच्यावतीने सर्व राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांना कोविडसाठी आवश्यक साधनांचा पुरवठा केला जात आहे. तसेच आरोग्यविषयक पायाभूत सुविधा मजबूत केल्या जात आहेत.

केंद्र सरकार सर्व राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांना कोविड-19 विषयक सामुग्रीचा मोफत पुरवठा करीत आहे. संपूर्ण देशभरामध्ये साथीचा प्रसार झालेला असल्यामुळे आणि प्रारंभीच्या काळामध्ये देशामध्ये या सर्व  साहित्याचे  उत्पादन होत नव्हते. त्यामुळे बाहेरून मागवून ते पुरवणे अवघड जात होते. कोविड-19 साठी आवश्यक असलेले वैद्यकीय मास्क, पीपीईसंच तसेच एचसीक्यू यांना सर्व भागातून अगदी संपूर्ण जगातूनही असलेली प्रचंड मागणी आणि त्यांच्या उपलब्धतेचे प्रमाण पाहता ही साधने मिळणे अवघड होते. मात्र आता तसे राहिलेले नाही, परिस्थिती पूर्ण बदलली आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय तसेच वस्त्रोद्योग मंत्रालय, उद्योग आणि अंतर्गत व्यापार संवर्धन विभाग, संरक्षण संशोधन आणि विकास संस्था यांच्या संयुक्त प्रयत्नांनी देशांतर्गत उद्योजकांनाच या काळामध्ये एन-95 मास्क आणि पीपीई, व्हँटिलेटर असे आवश्यक वैद्यकीय उपकरणे उत्पादित करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात आले. त्यासाठी योग्य त्या सुविधा प्रदान करण्यात आल्या. ‘आत्मनिर्भर भारत’ आणि ‘मेक इन इंडिया’ या संकल्पांना बळकटी देण्यासाठी केंद्र सरकारने या सर्व उत्पादनांची देशांतर्गत निर्मिती सुरू करण्यात आली.

केंद्र सरकारने दि. 11 मार्च, 2020 पासून सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना 3.04 कोटी एन-95मास्कचा, 1.28 कोटी पीपीईसंचाचा पुरवठा केला आहे. तसेच देशभरामध्ये 10.83 कोटी एचसीक्यू गोळ्यांचे वितरण केले आहे.

या व्यतिरिक्त 22,533 ‘मेक इन इंडिया‘ व्हँटिलेटर्स विविध राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पोहोचवले असून त्यांची स्थापना करून कार्यान्वयन सुरू करण्यात येत  आहेत.

कोविड-19 संबंधित सर्व तांत्रिक माहिती, मार्गदर्शक तत्वे आणि सल्ला, नियमन जाणून घेण्यासाठी सर्वांनी https://www.mohfw.gov.in/ आणि @MoHFW_INDIA.या संकेतस्थळाला भेट द्यावी.

कोविड-19 शी संबंधित तांत्रिक शंका, तांत्रिक प्रश्न / तांत्रिक माहिती technicalquery.covid19[at]gov[dot]in येथे मिळू  शकेल; इतर प्रश्‍नांची उत्तरे ncov2019[at]gov[dot]in आणि @CovidIndiaSeva  येथे मिळतील.

कोविड-19 विषयी काही प्रश्न असल्यास, कृपया आरोग्यआणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा: +91-11-23978046 किंवा 104675 (टोल फ्री) कोविड-19 साठी सर्व राज्ये / केंद्रशासित प्रदेशांच्या हेल्पलाइन क्रमांकाची यादी https://www.mohfw.gov.in/pdf/coronvavirushelplinenumber.pdf .  येथे देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे.

 

U.Ujgare/S.Bedekar/P.Malandkar

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1645463) Visitor Counter : 185