रेल्वे मंत्रालय

रेल्वे कर्मचाऱ्यांचा ई-पास बनवण्यासाठी आणि तिकिटांच्या आरक्षणासाठी सीआरआयएसव्दारे विकसित केलेल्या ई-पास मोड्यूलचा रेल्वे मंडळाच्या अध्यक्षांच्या हस्ते प्रारंभ


या मोड्यूलच्या माध्यमातून रेल्वे कर्मचारी ऑनलाइन अर्जाव्दारे कुठूनही ई-पास मिळवू शकणार

कार्यालयीन कामासाठी रेल्वे अधिकारी वर्गाला लांब पल्ल्याचा प्रवास करावा लागतो, ई-पासमुळे कार्यक्षमता वाढीला मदत मिळू शकणार

प्रविष्टि तिथि: 13 AUG 2020 12:48PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 13 ऑगस्ट 2020

 

रेल्वे कर्मचाऱ्यांना ऑनलाइन ई-पास बनविणे आणि तिकिटांच्या आरक्षणासाठी सीआरआयएसच्याव्दारे ‘एचआरएमएस’ म्हणजेच मनुष्यबळ विकास कार्यप्रणालीतून  विकसित केलेल्या ई-पास मोड्यूलचा रेल्वे मंडळाच्या अध्यक्षांच्या हस्ते आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून प्रारंभ करण्यात आला.  याप्रसंगी रेल्वे मंडळाचे सर्व सदस्य, आयआरसीटीसीचे अध्यक्ष, सहव्यवस्थापकीय संचालक, सीआरआयएसचे व्यवस्थापकीय संचालक, सर्व महा व्यवस्थापक, डीआरएम उपस्थित होते.

या नवीन ई-पास मोड्यूलचे कामकाज कशा पद्धतीने करण्यात येणार आहे, याची प्रत्येक टप्प्यानुसार माहिती मनुष्यबळ विकास विभागाच्या महासंचालकांनी दिली.

आत्तापर्यंत रेल्वे कर्मचारी वर्गाला प्रवास पास देण्याचे काम मानवी पद्धतीने केले जात होते. तसेच रेल्वे कर्मचाऱ्यांना ऑनलाइन तिकीट आरक्षित करण्याची कोणतीही सुविधा देण्यात आली नव्हती.

या ई-पास मोड्यूलची निर्मिती एचआरएमएसच्या अंतर्गत सीआरआयएसच्यावतीने करण्यात आली आहे. ही पद्धतीनुसार टप्प्याटप्प्याने संपूर्ण देशभरातल्या रेल्वे कर्मचारी बांधवांना जोडण्यात येणार आहे. या नवीन सुविधेमुळे आता रेल्वे कर्मचा-यांना पास काढण्यासाठी अर्ज करावा लागणार नाही तसेच त्यासाठी कार्यालयात जावे लागणार नाही, त्याचबरोबर पास मिळावा, यासाठी तिष्ठावेही लागणार नाही. कर्मचारी कोठूनही आपला अर्ज ऑनलाइन सादर करून संबंधित प्रक्रिया पूर्ण करून पास मिळवू शकतो. विशेष म्हणजे ही संपूर्ण प्रक्रिया मोबाईल फोनवरही उपलब्ध असणार आहे. या माध्यमातून पहिल्याप्रमाणे पीआरएस /यूटीएस खिडकी तिकीट आरक्षण सुविधेशिवाय पासच्या माध्यमातून तिकीट आरक्षित करण्याची सुविधा आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर उपलब्ध असणार आहे.

आज सुरू झालेल्या सुविधेमुळे रेल्वे कर्मचारी बांधवांना रेल्वे पास सुकरतेने मिळू शकण्यास मदत होणार आहे. त्याच बरोबर रेल्वे पास जारी करण्याचे काम करणाऱ्या अधिकारी वर्गाचे कामही सोपे होणार आहे.

भारतीय रेल्वेच्या सर्व कार्यप्रणालीचे डिजिटायझेशन करण्याचा महत्वाकांक्षी आणि व्यापक प्रकल्प एचआरएमएसच्या माध्यमातून करण्यात येत आहे. आत्तापर्यंत एचआरएमएसची  एकूण 21 मोड्यूल बनवण्यात येतील. जवळपास 97 टक्के रेल्वे कर्मचारी बांधवांची माहिती ‘बेसिक डाटा एंट्री’ च्या ‘कर्मचारी मास्टर’ आणि ई-सर्व्हिस रेकॉर्ड मोड्यूलमध्ये पूर्णपणे भरण्यात आली आहे.

सीआरआयएसच्यावतीने लवकरच आता एचआरएमएसचे ऑफिस ऑर्डर मोड्यूल आणि सेटलमेंट मोड्यूलही जारी करण्यात येणार आहे.

 

M.Chopade/S.Bedekar/P.Malandkar

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1645518) आगंतुक पटल : 227
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Punjabi , Assamese , English , Urdu , हिन्दी , Bengali , Manipuri , Odia , Tamil , Telugu , Malayalam