आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
भारतात एका दिवसात 56,383 रुग्ण बरे होण्याचा विक्रम
एकूण बरे झालेल्या रुग्णांचा आकडा जवळपास 17 लाख
सतत होणाऱ्या घसरणीमुळे, मृत्यू दरात 1.96% पर्यंत सुधारणा
Posted On:
13 AUG 2020 4:10PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 13 ऑगस्ट 2020
भारतात एका दिवसात सर्वाधिक 56,383 रुग्ण बरे होण्याच्या आणखी एका विक्रमाची नोंद झाली आहे. या आकड्यासह, कोविड-19 च्या बरे झालेल्या रुग्णांचा आकडा आज जवळपास 17 लाखावर (16,95,982) पोहोचला आहे.
केंद्र आणि राज्य / केंद्रशासित प्रदेश सरकारच्या एकत्रित, केंद्रित आणि सहयोगी प्रयत्नांसह लाखो आघाडीच्या कर्मचाऱ्यांच्या सहाय्यामुळे, केंद्र सरकारच्या सल्ल्यानुसार स्टँडर्ड ऑफ केअरच्या माध्यमातून गंभीर स्वरूपाच्या रुग्णांचे प्रभावी क्लिनिकल व्यवस्थापन, गृह अलगीकरण यासारख्या उपाययोजनांच्या माध्यमातून चाचणी करणे, पाठपुरावा करणे आणि प्रभावी उपचारांची यशस्वी अंमलबजावणी सुनिश्चित केली आहे. रुग्ण बरे होण्याच्या संख्येत सतत होणाऱ्या वृद्धीमुळे रुग्ण बरे होण्याच्या दराने 70 % चा टप्पा पार केला आहे, कोविड-19 रुग्णांचे मृत्यूचे प्रमाण कमी होऊन मृत्यू दर 1.96% वर आला आहे आणि यात सतत घसरण होत आहे.
रुग्ण बरे होण्याच्या विक्रमी नोंदीमुळे हे सुनिश्चित झाले आहे की देशातील कोविडच्या सक्रीय रुग्णांचे प्रमाण कमी झाले आहे आणि सध्या देशात एकूण रुग्णांपैकी 27.27 % सक्रीय कोविड-रुग्ण आहेत. सक्रीय रुग्णांपेक्षा (6,53,622) बरे झालेल्या रुग्णांची संख्या 10 लाखांहून अधिक आहे.
कोविड-19 संदर्भात कुठलीही अधिकृत आणि ताजी आकडेवारी/माहिती हवी असल्यास, तसेच काही मार्गदर्शक तत्वे अथवा सूचना पाहायच्या असल्यास, कृपया खालील संकेतस्थळाला भेट द्यावी : https://www.mohfw.gov.in/आणि @MoHFW_INDIA.
तांत्रिक गोष्टींच्या माहितीसाठी संपर्क साधायचा असल्यास, या ईमेल आय डी वर साधावा: technicalquery.covid19[at]gov[dot]in आणि इतर शंका/समस्यांसाठी ईमेल आयडी- ncov2019[at]gov[dot]in आणि @CovidIndiaSeva .
कोविड-19 संदर्भात इतर माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक (हेल्पलाईन): +91-11-23978046 or 1075 (Toll-free). सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या हेल्पलाईन्सची यादी सोबत जोडली आहे. https://www.mohfw.gov.in/pdf/coronvavirushelplinenumber.pdf
M.Chopade/S.Mhatre/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1645501)
Visitor Counter : 162
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam