Posted On:
06 AUG 2020 7:45PM by PIB Mumbai
दिल्ली-मुंबई, 6 ऑगस्ट 2020

(कोविड-19 संबंधी पत्र सूचना कार्यालयाद्वारे जारी बातम्या आणि सत्यता पडताळणी बातम्या समाविष्ट)



पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या, 7 ऑगस्ट 2020 रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत उच्च शिक्षणातील परिवर्तनात्मक सुधारणांवरील परिषदेत ' उद्घाटनपर भाषण करणार आहेत. मनुष्यबळ विकास मंत्रालय आणि विद्यापीठ अनुदान आयोगाद्वारे या परिषदेचे आयोजन करण्यात येत आहे. या परिषदेत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, 2020 अंतर्गत समग्र, बहु-शाखात्मक आणि भविष्यातील शिक्षण, दर्जेदार संशोधन, आणि शिक्षण सर्वदूर पोहोचण्यासाठी तंत्रज्ञानाचा न्याय्य वापर यासारख्या शिक्षणाच्या महत्त्वपूर्ण पैलूंसाठी समर्पित सत्रे असतील.
आरोग्य मंत्रालयाची कोविड-19 घडामोडींवरील माहिती :
गेल्या 24 तासात कोविड-19 च्या 46,121 बरे झालेल्या रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी दिल्यानंतर कोविड-19 च्या बरे झालेल्या एकूण रुग्णांचा आकडा 13,28,336 वर पोहोचला आहे. रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात सातत्याने वाढ झाल्याने, बरे झालेले रूग्ण आणि सक्रिय कोविड-19 च्या रुग्णांमधील प्रकरणांमधील अंतर 7,32,835 वर पोहोचले आहे.
रुग्ण बरे होण्याची संख्या सतत वाढत असल्यामुळे कोविड-19 चे रुग्ण बरे होण्याच्या दरात 67.62 टक्क्यांची वाढ होत अजून एक नवीन विक्रम स्थापित केला आहे.
देशातील वास्तविक रुग्णसंख्या ही सक्रीय रुग्ण संख्या आहे (5,95,501) जी कोविड बाधित रुग्ण संख्येच्या 30.31 % आहे. ते एकतर रुग्णालयात उपचार घेत आहेत किंवा मग गृह अलगीकरणात आहेत.
24 जुलै 2020 रोजी असलेल्या 34.17 % सक्रीय रुग्णांच्या टक्केवारीत लक्षणीय घट होऊन आज ती 30.31 % झाली आहे.
‘संपूर्ण सरकार’ दृष्टीकोना अंतर्गत, कोविड-19 प्रतिसाद आणि व्यवस्थापनासाठी सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील संसाधने एकत्रितपणे केंद्रीय-नेतृत्त्वाच्या धोरणानुसार एकत्रित कार्य करीत आहेत. केंद्र आणि राज्य/केंद्रशासित प्रदेश सरकारच्या “टेस्ट ट्रॅक ट्रीट” नीतीची अंमलबजावणीमुळे, रुग्णालयाची पायाभूत सुविधा व चाचणी सुविधांमध्ये वृद्धी झाली असून केंद्राच्या स्टँडर्ड ऑफ केअर प्रोटोकॉलच्या सल्ल्यानुसार रुग्णालयात दाखल झालेल्या रूग्णांवर प्रभावीपणे उपचार करण्यावर भर देण्यात आल्याने कोविड-19 च्या रुग्णांच्या मृत्यू दरात घट सुनिश्चित झाली आहे. याचाच परिणाम म्हणजे, जागतिक परिस्थितीच्या तुलनेत भारतातील मृत्यू दर कमी असून यात निरंतर घट होत आहे. आज चा मृत्यू दर 2.07% आहे.
इतर अपडेट्स:
कोविड-19 साठी आपत्कालीन मदत आणि आरोग्य यंत्रणा सज्ज करण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने सर्व राज्ये/केंद्रशासीत प्रदेशांना जाहीर केलेल्या आर्थिक पैकेजचा दुसरा हप्ता म्हणून- 890.32 रुपयांचा निधी वितरीत करण्यात आला आहे. छत्तीसगड, झारखंड, मध्यप्रदेश, ओडिशा, राजस्थान, तेलंगणा, आंध्रप्रदेश, गोवा, गुजरात, कर्नाटक, केरळ, पंजाब, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, दादरा आणि नगर हवेली आणि दीव दमन, अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, मणिपूर, मिझोराम, नागालँड आणि सिक्कीम या राज्यांना हा निधी देण्यात आला आहे. राज्यांमध्ये कोविडचे एकूण रुग्ण किती आहेत, यानुसार या निधीचा वाटा देण्यात आला आहे.
भारतात आणि जगभरात कोविड-19 च्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय रिझर्व्ह बँकेने पैशांचा ओघ सुधारण्यासाठी आणि वित्तीय व्यवस्थेला अधिक सहाय्य पुरवण्यासाठी अतिरिक्त विकासात्मक आणि नियामक धोरण उपाययोजना आज जाहीर केल्या. गव्हर्नर शक्तीकांत दास म्हणाले की, "गेल्या 100 वर्षातील सर्वात भयानक अशा आरोग्य आणि आर्थिक संकटांमुळे" उद्भवलेला आर्थिक ताण कमी करण्यास या उपाययोजनांमुळे मदत होईल.
74 व्या स्वातंत्र्यदिन सोहळ्याचा भाग म्हणून, पूर्वी नौदल कमांडने कोरोना योद्ध्यांप्रती सन्मान म्हणून नौदलाच्या संगीत कार्यक्रमाचे बोजाना कोंडा हेरिटेज साइट विशाखापट्टणम, येथे 05 ऑगस्ट रोजी आयोजन केले होते. कमोडोर संजीव इस्सार, नौदल अधिकारी (आंध्र प्रदेश) यांनी अनकापल्ली लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ बेसेट्टी व्यंकट सत्यवती यांचे आणि जिल्हा प्रशासनाने नामनिर्देशात केलेल्या कोरोना योद्ध्यांचे स्वागत केले.
सरकार गरीब कल्याण रोजगार अभियान (जीकेआरए) बिहार, झारखंड, मध्य प्रदेश, ओदिशा, राजस्थान आणि उत्तर प्रदेश राज्यांतील 116 जिल्ह्यांतील गावकऱ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन त्यांचे सबलीकरण करत आहे. जीकेआरएअंतर्गत स्थलांतरीत मजूर जे आपल्या जन्मगावी पोहचले आहेत त्यांच्यासाठी सरकार मिशन मोडवर कार्य करुन रोजगार पुरवत आहे. अवघ्या सहा आठवड्यांमध्येच, एकूण 17 कोटी मनुष्य-दिन रोजगारनिर्मिती झाली आहे आणि स्थलांतरीत मजुरांसाठी 13,240 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. कोविड-19 च्या उद्रेकानंतर गावी परतणाऱ्या स्थलांतरीत कामगारांच्या आणि याचमुळे बाधित झालेल्या नागरिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन उपजिविकेला चालना देण्यासाठी हे अभियान सुरू केले आहे.
महाराष्ट्र अपडेट्स :
पुण्यात कोविड रुग्णांच्या संख्येने एक लाखाचा टप्पा पार केला असून शहरातील एकूण रुग्णसंख्या 1,01,262 वर पोहचली आहे. त्यामुळे रुग्णसंख्येच्या बाबतीत पुणेही आता दिल्ली, मुंबई आणि चेन्नई या शहरांच्या यादीत समाविष्ट झाले आहे. त्यामागोमाग ठाण्यातील कोविड रुग्णसंख्या 99,563 इतकी झाली आहे. आजमितीला महाराष्ट्रातील सक्रिय रुग्णसंख्या 1.45 लाख वर पोहचली आहे.


M.Chopade/S.Tupe/P.Kor