ग्रामीण विकास मंत्रालय

गरीब कल्याण रोजगार अभियानांतर्गत (जीकेआरए) 6 आठवड्यात 17 कोटी मनुष्य-दिन रोजगारनिर्मिती आणि स्थलांतरीत मजुरांना 13,240 कोटी रुपये प्रदान

Posted On: 05 AUG 2020 10:26PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 5 ऑगस्ट 2020


सरकार गरीब कल्याण रोजगार अभियान (जीकेआरए) बिहार, झारखंड, मध्य प्रदेश, ओदिशा, राजस्थान आणि उत्तर प्रदेश राज्यांतील 116 जिल्ह्यांतील गावकऱ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन त्यांचे सबलीकरण करत आहे. जीकेआरएअंतर्गत स्थलांतरीत मजूर जे आपल्या जन्मगावी पोहचले आहेत त्यांच्यासाठी सरकार मिशन मोडवर कार्य करुन रोजगार पुरवत आहे. अवघ्या सहा आठवड्यांमध्येच, एकूण 17 कोटी मनुष्य-दिन रोजगारनिर्मिती झाली आहे आणि स्थलांतरीत मजुरांसाठी 13,240 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.

जीकेआरएअंतर्गत मोठ्या प्रमाणात बांधकामे करण्यात आली आहेत. यात 62,532 जल संवर्धनाची कामे आहेत. 1.74 लाख ग्रामीण घरे, 14,872 गुरांसाठी निवारे, 8,963 तळी आणि 2,222 सामुदायिक स्वच्छतागृहे, जिल्हा खनिज निधीतून 5,909 कामे हाती घेण्यात आली आहेत, 564 ग्रामपंचायतींना इंटरनेट जोडणी पुरवण्यात आली आहे आणि 16,124 विद्यार्थ्यांना अभियानांतर्गत कृषी विज्ञान केंद्रांच्या माध्यमातून कौशल्य प्रशिक्षण देण्यात आले आहे.

कोविड-19 च्या उद्रेकानंतर गावी परतणाऱ्या स्थलांतरीत कामगारांच्या आणि याचमुळे बाधित झालेल्या नागरिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन उपजिविकेला चालना देण्यासाठी हे अभियान सुरू केले आहे. 12 मंत्रालये / विभाग आणि राज्य सरकारांच्या स्थलांतरीत कामगार आणि ग्रामीण समुदायाला जास्त प्रमाणात लाभ देण्याच्या एकत्रित प्रयत्नांमुळे अभियानाला यश आले आहे. ज्यांना गावांमध्येच राहायचे आहे त्यांच्यासाठी रोजगार आणि उपजिवीकेच्या दीर्घकालीन संधी निर्माण करण्यासारखी स्थिती आहे.  

 
* * *

G.Chippalkatti/S.Thakur/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1643645) Visitor Counter : 154