आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

भारतातील कोविड-19 चे रुग्ण बरे होण्याचा दर 67.62 % वर पोहोचला, बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 13.2 लाखांहून अधिक


मृत्यू दरात निरंतर घट होऊन तो 2.07 टक्के झाला

Posted On: 06 AUG 2020 6:25PM by PIB Mumbai

 

गेल्या 24 तासात कोविड-19 च्या 46,121 बरे झालेल्या रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी दिल्यानंतर कोविड-19 च्या बरे झालेल्या एकूण रुग्णांचा आकडा 13,28,336 वर पोहोचला आहे. रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात सातत्याने वाढ झाल्याने, बरे झालेले रूग्ण आणि सक्रिय कोविड-19 च्या रुग्णांमधील प्रकरणांमधील अंतर 7,32,835 वर पोहोचले आहे.

रुग्ण बरे होण्याची संख्या सतत वाढत असल्यामुळे कोविड-19 चे रुग्ण बरे होण्याच्या दर 67.62 टक्क्यांची वाढ होत अजून एक नवीन विक्रम स्थापित केला आहे.

WhatsApp Image 2020-08-06 at 11.02.54.jpeg

देशातील वास्तविक रुग्णसंख्या ही सक्रीय रुग्ण संख्या आहे (5,95,501) जी कोविड बाधित रुग्ण संख्येच्या 30.31 % आहे. ते एकतर रुग्णालयात उपचार घेत आहेत किंवा मग गृह अलगीकरणात आहेत.

WhatsApp Image 2020-08-06 at 11.02.53.jpeg

24 जुलै 2020 रोजी असलेल्या 34.17 % सक्रीय रुग्णांच्या टक्केवारीत लक्षणीय घट होऊन आज ती 30.31 % झाली आहे.

‘होल ऑफ गव्हर्नमेंट’ दृष्टीकोना अंतर्गत, कोविड-19 प्रतिसाद आणि व्यवस्थापनासाठी सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील संसाधने एकत्रितपणे केंद्रीय-नेतृत्त्वाच्या धोरणानुसार एकत्रित कार्य करीत आहेत. केंद्र आणि राज्य / केंद्रशासित प्रदेश सरकारच्या “टेस्ट ट्रॅक ट्रीट” नीतीची अंमलबजावणीमुळे, रुग्णालयाची पायाभूत सुविधा व चाचणी सुविधांमध्ये वृद्धी झाली असून केंद्राच्या स्टँडर्ड ऑफ केअर प्रोटोकॉलच्या सल्ल्यानुसार रुग्णालयात दाखल झालेल्या रूग्णांवर प्रभावीपणे उपचार करण्यावर भर देण्यात आल्याने कोविड-19 च्या रुग्णांच्या मृत्यू दरात घट सुनिश्चित झाली आहे. याचाच परिणाम म्हणजे, जागतिक परिस्थितीच्या तुलनेत भारतातील मृत्यू दर कमी असून यात निरंतर घट होत आहे. आज चा मृत्यू दर 2.07% आहे.

कोविड19 संदर्भात कुठलीही अधिकृत आणि ताजी आकडेवारी/माहिती हवी असल्यास, तसेच काही मार्गदर्शक तत्वे अथवा सूचना बघायच्या असल्यास, कृपया खालील संकेतस्थळाला भेट द्यावी : https://www.mohfw.gov.in/ आणि @MoHFW_INDIA

 

तांत्रिक गोष्टींच्या माहितीसाठी संपर्क साधायचा असल्यास, या ईमेल आय डी वर साधावा: technicalquery.covid19@gov.in आणि इतर शंका/समस्यांसाठी ईमेल आयडी- ncov2019@gov.in आणि @CovidIndiaSeva .

कोविड19 संदर्भात इतर माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक (हेल्पलाईन): +91-11-23978046 किंवा 1075 (Toll-free). सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या हेल्पलाईन्सची यादी सोबत जोडली आहे https://www.mohfw.gov.in/pdf/coronvavirushelplinenumber.pdf .

 

M.Chopade/ /P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1643842) Visitor Counter : 218