पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान उद्या ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत उच्च शिक्षणातील परिवर्तनात्मक सुधारणांवरील परिषदेत ’ उद्घाटनपर भाषण करणार
Posted On:
06 AUG 2020 5:30PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या, 7 ऑगस्ट 2020 रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत उच्च शिक्षणातील परिवर्तनात्मक सुधारणांवरील परिषदेत ' उद्घाटनपर भाषण करणार आहेत.
मनुष्यबळ विकास मंत्रालय आणि विद्यापीठ अनुदान आयोगाद्वारे या परिषदेचे आयोजन करण्यात येत आहे.
या परिषदेत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, 2020 अंतर्गत समग्र, बहु-शाखात्मक आणि भविष्यातील शिक्षण, दर्जेदार संशोधन, आणि शिक्षण सर्वदूर पोहोचण्यासाठी तंत्रज्ञानाचा न्याय्य वापर यासारख्या शिक्षणाच्या महत्त्वपूर्ण पैलूंसाठी समर्पित सत्रे असतील.
केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक , केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री संजय धोत्रे हे देखील या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या विविध पैलूंवर राष्ट्रीय शिक्षण धोरण मसुदा समितीचे अध्यक्ष आणि सभासद, तसेच प्रख्यात शैशिक्षणतज्ञ / वैज्ञानिक यांच्यासह अनेक मान्यवर आपले विचार मांडतील.
या कार्यक्रमात विद्यापीठांचे कुलगुरू, संस्थांचे संचालक आणि महाविद्यालयाचे प्राचार्य आणि इतर हितधारक सहभागी होतील.
हा कार्यक्रम पुढील माध्यमातून थेट प्रसारित केला जाईल.
MHRD Facebook Page: https://www.facebook.com/HRDMinistry/
UGC YouTube Channel, PIB YouTube Channel,
UGC Twitter Handle (@ugc_india) : https://twitter.com/ugc_india?s=12
हा कार्यक्रम डीडी न्यूजवरही प्रसारित केला जाईल.
M.Copade/S.Kane/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1643822)
Visitor Counter : 229
Read this release in:
Tamil
,
Kannada
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Telugu
,
Malayalam