आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

एका दिवसात सुमारे 30,000 रुग्ण बरे झाले, एका दिवसात बरे होणाऱ्या रुग्णांचा हा आतापर्यंतचा सर्वात मोठा आकडा, एकूण बरे झालेले रुग्ण 7.82 लाखाहून अधिक

Posted On: 23 JUL 2020 5:40PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 23 जुलै 2020

सलग दुसऱ्या दिवशी बरे होणाऱ्या रुग्ण संख्येत लक्षणीय वाढ दिसून आली आहे.  गेल्या 24 तासात आतापर्यंत नोंद झालेल्या पैकी सर्वात जास्त म्हणजे 29,557 रुग्ण बरे होऊन घरी परतलेतर बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या आता 7,82,606 वर पोहोचली आहे. त्यामुळे बरे होणाऱ्या  रुग्णांचे प्रमाण वाढून ते 63.18 टक्के पर्यंत पोचले आहे.  बरे झालेले रुग्ण आणि सक्रिय रुग्णांच्या संख्येतील तफावत वाढून ती आता 3,56,439 झाली आहे.

या यशाचे श्रेय केंद्र सरकारच्या कोविड -19 व्यवस्थापन धोरणाला जाते. केंद्र सरकार व राज्य तसेच केंद्रशासित प्रदेशांच्या सरकारांनी एकत्रितपणे केलेल्या प्रयत्नांमुळे प्रभावी प्रतिबंध, आक्रमक पद्धतीने केलेल्या तपासण्या, आणि त्वरित व प्रभावी वैद्यकीय उपचार शक्य झाले आहेत. या सर्व धोरणासाठी केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या विषय तज्ञांच्या पथकाचे मार्गदर्शन मिळत आहे. त्यात संयुक्त निरीक्षक गट (JMG) तसेच नवी दिल्ली इथल्या अखिल भारतीय वैद्यक विज्ञान संस्थेचे(AIIMS) तंत्रज्ञविविध राज्य तसेच केंद्रशासित प्रदेशातील गुणवत्तापूर्ण वैद्यकीय केंद्रे, भारतीय वैद्यकीय संशोधन संस्था आणि एनसीडीसी यांचेही सहकार्य मिळाले आहे.  अधिक रुग्ण संख्या असलेल्या राज्यांमध्ये केंद्र सरकार तर्फे तज्ञांची पथके जाऊन सल्ला देत आहेत. तसेच केंद्र सरकारने   अखिल भारतीय वैद्यक विज्ञान संस्थेच्या(AIIMS) तज्ञांद्वारे कोविड संबंधात दूरध्वनीद्वारे वैद्यकीय सल्ला मिळण्याची सोय केली आहे.  या सर्वांचा परिणाम म्हणून कोविड मुळे होणाऱ्या मृत्यूचा दर कमी होत आता  2.41 टक्के इतका राहिला आहे.

यामुळे  रुग्णांचा आकडा ही कमी होत आता सक्रिय रुग्णसंख्या केवळ 4,26, 167 इतकी राहिली आहे.

कोविड-19 संबंधातल्या अधिकृत आणि अद्ययावत माहितीसाठी तसेच तांत्रिक अडचणी, मार्गदर्शन आणि सूचनांसाठी कृपया नियमितपणे खालील संकेतस्थळाला भेट द्या-

https://www.mohfw.gov.in/ आणि @MoHFW_INDIA.

कोविड-19 च्या संबंधात तांत्रिक शंकां निरसनासाठी technicalquery.covid19[at]gov[dot]in आणि इतर प्रश्नांसाठी ncov2019[at]gov[dot]in आणि @CovidIndiaSeva.इथे संपर्क करा.

कोविड-19 संबंधात कुठल्याही प्रश्नासाठी आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाला खालील हेल्पलाईन नंबर वर फोन करा-+91-11-2397804 किंवा 1075

कोविड-19 संबंधित माहितीसाठी सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांचे दूरध्वनी क्रमांक या संकेतस्थळावर मिळू शकतील: https://www.mohfw.gov.in/pdf/coronvavirushelplinenumber.pdf .

 

M.Chopade/U.Raikar/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1640698) Visitor Counter : 236