आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

19 राज्ये/केंद्र शासित प्रदेशांमध्ये 63.13 टक्क्याहून अधिक रुग्ण बरे होण्याच्या दराची नोंद

Posted On: 22 JUL 2020 2:25PM by PIB Mumbai

 

एकाच दिवसात सर्वाधिक म्हणजे 28 हजार 472 रुग्ण बरे झाल्याची नोंद झाली आहे. शिवाय गेल्या 24 तासात बरे झालेल्या/ घरी सोडण्यात आलेल्या कोविड-19 रुग्णांची ही सर्वाधिक संख्या आहे. यासह, बरे झालेल्या रूग्णांची संख्या आता 7 लाख 53 हजार 49 इतकी आहे. यामुळे कोविड-19 रूग्णांमधील बरे होण्याचा दर 63.13 टक्क्यांपर्यंत वाढला आहे.

रुग्ण बरे होण्याच्या संख्येत झालेल्या वाढीमुळे सक्रिय रुग्ण संख्येत (4 लाख 11 हजार 133 आजची संख्या) 3 लाख 41 हजार 916 पर्यंत फरक पडला आहे. हा फरक उतरोत्तर वाढत जाणाऱ्या प्रगतीचे निदर्शक आहे.

राष्ट्रीय पातळीवर रुग्ण बरे होण्याचा दर सुधारला असताना 19 राज्ये/ केंद्र शासित प्रदेशामधील हाच दर राष्ट्रीय सरासरीपेक्षा जास्त आहे.

 

राज्ये/केंद्र शासित प्रदेश

रुग्ण बरे होण्याचा दर

दिल्ली

84.83%

लडाख (केंद्र शासित प्रदेश)

84.31%

तेलंगणा

78.37%

हरियाणा

76.29%

अंदमान-निकोबर बेटे

75.00%

राजस्थान

72.50%

गुजरात

72.30%

छत्तीसगड

71.81%

आसाम

71.05%

ओदिशा

70.96%

तामिळनाडू

70.12%

मणीपुर

69.48%

चंदीगढ

68.97%

उत्तराखंड

67.99%

पंजाब

67.86%

मध्यप्रदेश

67.47%

दादरा-नगर हवेली, दीव-दमण

65.67%

हिमाचल प्रदेश

64.72%

बिहार

63.95%

 

बरे झालेल्या रुग्णांची सातत्याने वाढती संख्या, तसेच सक्रिय व बरे झालेल्या रूग्णांमधील वाढता फरक, या गोष्टीची साक्ष देतात, की केंद्राने अवलंबलेली व राज्य/ केंद्र शासित प्रदेश सरकारांनी राबवलेली धोरणे इच्छित परिणाम साधत आहेत. घरोघरी केलेले सर्वेक्षण, देखरेख ठेवणे, प्रभावी नियंत्रण योजना, असुरक्षित लोकांची तपासणी व विस्तारीत प्रसार-चाचणी यांच्या माध्यमातून बाधित रुग्ण लवकरात लवकर शोधण्यावर प्राथमिक लक्ष केंद्रित केले गेले आहे. तीन-स्तरीय आरोग्य पायाभूत सुविधा व उत्तम प्रकारे अंमलात आणलेल्या काळजी घेण्याच्या नियमावलीने रुग्णालय तसेच गृह-विलगीकरण यांच्याद्वारे प्रभावी उपचारांना मदत झाली आहे.

एम्स, नवी दिल्लीने, राज्ये/ केंद्र शासित प्रदेशांमधील उत्कृष्ट केंद्रांच्या सहाय्याने अति दक्षता विभागामधील रूग्णांचे उपचार करण्यास व काळजी घेण्यास मदत केली आहे; ज्यायोगे भारतात कोविड रुग्णांचे प्रमाण कमी राखणे शक्य झाले आहे. एम्स, नवी दिल्लीचा ‘ई-आयसीयू’ कार्यक्रम केंद्र-राज्य सहकार्याचा आणखी एक मार्ग आहे, ज्याचा उद्देश मृत्युदर कमी करण्याचा आहे. आठवड्यातून दोनदा आयोजित या ‘टेलि-कन्सल्टेशन’ सत्रांमुळे अति दक्षता विभागातील रूग्णांच्या व्यवस्थापनातील तज्ज्ञांच्यासमान अनुभव व तांत्रिक सल्ल्याद्वारे राज्यातील मोठ्या कोविड-19रुग्णालयांना मार्गदर्शन व आधार मिळत आहे. आरोग्य सेवा कर्मचार्‍यांच्या समर्पित प्रयत्नांमुळे रुग्ण बरे होण्याचा दर सुधारत आहे व मृत्यू प्रकरणांची संख्या सतत कमी होत आहे, जी सध्या 2.41% आहे.

कोविड-19 संबंधित तांत्रिक मुद्दे, मार्गदर्शक तत्त्वे व सल्लागारांच्या अद्ययावत माहितीसाठी कृपया नियमितपणे https://www.mohfw.gov.in/, तसेच @MOHFW_INDIA. येथे भेट द्या.

कोविड-19शी संबंधित तांत्रिक प्रश्न technicalquery.covid19[at]gov[dot]in व इतर प्रश्न ncov2019[at]gov[dot]in, तसेच @CovidIndiaSeva येथे विचारू शकता.

कोविड-19 बाबत काही प्रश्न असल्यास कृपया आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या मदत क्रमांकावर संपर्क साधा: +91-11-23978046 or 1075 (मोफत).

कोविड-19 वरील राज्ये /केंद्र शासित प्रदेशांच्या मदत क्रमांकाची यादी https://www.mohfw.gov.in/pdf/coronvavirushelplinenumber.pdf वर देखील उपलब्ध आहे.

****

U.Ujgare/S.Pophale/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1640374) Visitor Counter : 255