पंतप्रधान कार्यालय

जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त पंतप्रधान संबोधित करणार

Posted On: 14 JUL 2020 11:05PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 14 जुलै 2020

 

पंतप्रधान नरेन्द्र मोदी उद्या जागतिक युवा कौशल्य दिनाच्या निमित्ताने एक व्हिडीओ संदेश प्रसारित करणार आहेत. कौशल्य भारत मिशन सुरू करण्यात आल्याचा पाचवा वर्धापनदिन म्हणून हा दिवस साजरा होत आहे. कौशल्य विकास आणि नवउद्योजकता मंत्रालयातर्फे या दिवशी एका डिजिटल परिषदेचे आयोजन करण्यात येत आहे.

 

पार्श्वभूमी:

कौशल्य भारत मिशन ही भारत सरकारने सुरू केलेली योजना आहे. देशातील युवा वर्गाला अर्थार्जनाला उपयुक्त अशी कौशल्ये देऊन सक्षम करणे आणि त्यांच्या कामाच्या ठिकाणची त्यांची उत्पादकता अधिक वाढवणे हा यामागचा हेतू आहे. कौशल्य भारत अंतर्गत अनेकविध क्षेत्रातील अभ्यासक्रम दिले जातात. हे अभ्यासक्रम उद्योगविश्वाची मानके तसेच राष्ट्रीय  कौशल्य पात्रता संरचना अंतर्गत  सरकारने ठरवलेली मानके या दोन्हीशी सुसंगत आहेत. व्यावसायिक स्तराचे काम करण्यावर भर देता यावा आणि उमेदवाराची तंत्रज्ञान कुशलता वाढून कामाच्या प्रथम दिवसापासून त्याला उपयुक्त कामाचं उत्पादन देता येणं शक्य व्हावं, जेणेकरून कंपन्यांना त्याला कामासाठी कार्यकुशल करण्यावर होणारी गुंतवणूक वाचवता येईल या दृष्टीने हे अभ्यासक्रम उपयुक्त आहेत.

 

* * *

B.Gokhale/V.Sahajrao/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1638697) Visitor Counter : 166