PIB Headquarters

पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित दैनंदिन बातमीपत्र

Posted On: 12 JUL 2020 7:27PM by PIB Mumbai

 

(कोविड-19 संबंधी पत्र सूचना कार्यालयाद्वारे जारी बातम्‍या आणि सत्‍यता पडताळणी बातम्‍या समाविष्‍ट)

दिल्‍ली-मुंबई, 12 जुलै 2020

 

उपराष्ट्रपती एम वेंकय्या नायडू यांनी, कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर मागील काही महिन्यांपासून सुरु असलेल्या टाळेबंदीच्या काळातील जीवनावर आत्मनिरीक्षण करण्याचे आणि या सगळ्यापासून काही योग्य धडे शिकलो आहोत की नाही याचे मुल्यांकन करण्याचे तसेच अशा प्रकारच्या अनिश्चिततांचा सामना करण्यासाठी स्वतःला सुसज्ज केले आहे का, हे समजून घेण्याचे आवाहन केले.

आत्मनिर्भर भारत पॅकेज: आजवरची प्रगती

 • कोविड-19 साथरोगाविरोधात लढा देण्यासाठी, माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 12 मे 2020 रोजी 20 लाख कोटी रुपयांच्या एका विशेष पॅकेजची घोषणा केली.
 • 200 कोटी रुपयांपर्यंतच्या सरकारी खरेदीसाठी जागतिक पातळीवरील निविदांची गरज रद्द केली
 • रेल्वे, रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालय, आणि केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभाग अशा सर्व केंद्रीय संस्था कंत्राटविषयक अटींच्या पूर्ततेसाठी, 6 महिन्यांपर्यंतची मुदतवाढ देतील.
 • वर्ष 2020-21 करिता राज्यांची उधारीची मर्यादा 3% वरून वाढवून 5% करण्यात आली.
 • राज्यांना 4.28 लाख कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी मिळणार.
 • खेळत्या भांडवलासाठी अतिरिक्त पतपुरवठा म्हणून, 29 फेब्रुवारी 2020 रोजी देय बाकी असलेल्या कर्जाच्या 20% रक्कम, सवलतीच्या व्याजदरात मुदत कर्जाच्या स्वरूपात देण्यात येणार.
 • 25 कोटी रुपयांपर्यंत थकबाकी आणि 100 कोटी रुपयांपर्यंत उलाढाल असणाऱ्या व्यवसायांना ही सुविधा उपलब्ध
 • 26.05.2020 रोजी, तातडीच्या पतपुरवठ्यासाठी हमी देणाऱ्या योजनेचा (ECLGS) निधी स्थापित केला.
 • सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग हेरणे, त्यांना मंजुरी देणे व त्यांना कर्जे वितरित करणे- यामध्ये लक्षणीय प्रगती दिसत आहे
 • एनबीएफसी साठी 45,000 कोटी अंशतः पतपुरवठा योजना 2.0-  अंशतः पतपुरवठा योजनेला (PCGS) ला केंद्रीय मंत्रिमंडळाने 20 मे 2020 रोजी मंजुरी दिली. केंद्र सरकार सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना पहिल्या नुकसानभरपाईपोटी 20 % सार्वभौम पतहमी देणार
 • नाबार्डच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अतिरिक्त 30,000 कोटी आपत्कालीन खेळते भांडवल
 • टीडीएस/टीसीएस चे दर कमी करुन, 50,000 कोटी रुपयांची तरलता उपलब्ध
 • केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने 20.44 लाख करदात्यांना 62,361कोटी  रुपयांपर्यंतचे कर परतावे जारी केले.
 • IBC-नादारी आणि दिवाळखोरी कायदा 2016 च्या कलम 4 अंतर्गत कर्ज परत न करु शकण्याची मर्यादा सध्याच्या 1 लाखांवरुन 1 कोटी रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे.
 • NBFC/HFC/MFI यांच्यासाठी 30,000 कोटी रुपयांची विशेष तरलता योजना

 

आरोग्य मंत्रालयाची कोविड-19  घडामोडींवरील माहिती  

कोविड-19 ची लक्षणे दिसू लागताच जर वेळेवर निदान झाले आणि संबंधित रूग्णावर तातडीने उपचार केले तर रूग्ण बरे होण्याचे प्रमाण चांगले आहे, हे लक्षात घेवून सरकारने याच दृष्टिकोनातून सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या सहकार्याने कोविड-19 बरोबर लढा देण्यासाठी प्रभावी वैद्यकीय व्यवस्थापन करण्यावर भर दिला आहे. चाचणी आणि त्वरित निदान करणे यांच्यामध्ये समन्वय साधून पावले उचलली जात असल्यामुळे रूग्णांचे बरे होण्याचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. गेल्या 24 तासांमध्ये कोविड-19 चे एकूण 19,235 रूग्ण बरे झाले. याचा परिणाम म्हणजे कोविड-19 च्या बरे झालेल्या रूग्णांच्या एकत्रित आकडेवारीमध्ये वाढ झाली आहे. देशामध्ये आत्तापर्यंत बरे झालेल्या रूग्णांची संख्या आज 5,34,620 झाली आहे. रूग्ण बरे होण्याची टक्केवारी आता 62.93 झाली आहे.

कोविडचे रूग्ण बरे व्हावेत, यासाठी सर्व स्तरावरून प्रयत्न केले जात आहेत त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या सक्रिय रूग्णांपेक्षा 2,42,362 ने जास्त आहे. तर कोरोनामुळे आजारी असलेल्या 2,92,258 सक्रिय रूग्णांना सर्वतोपरी वैद्यकीय सेवा दिली जात आहे.

कोविडबाधित व्यक्तींना वैद्यकीय सेवा पुरविण्यासाठी कोविड समर्पित आरोग्यविषयक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. एकूण 1370 कोविड समर्पित रूग्णालये (डीसीएच), 3062 कोविड समर्पित आरोग्य केंद्रे (डीसीएचसी) आणि 10334 कोविड दक्षता केंद्र (सीसीसी) यांचा समावेश आहे.

या कोविड समर्पित वैद्यकीय केंद्राना सुयोग्य पद्धतीने कार्य करता यावे, यासाठी केंद्र सरकारकडून आत्तापर्यंत 122.36 लाख पीपीई संच, 223.33 एन95 मास्क, आणि 21,685 व्हेंटिलेटर्सची उपलब्धता सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना करून देण्यात आली आहे.

कोविड-19ची चाचणी करण्यामध्ये येणारे सर्व अडथळे आता सरकारने दूर केले आहेत. तसेच राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना चाचणी करण्यासाठी व्यापक सुविधा देण्यात आली आहे. राज्यांना सर्वत्र कोविड-19 चाचणी करणे शक्य व्हावे यासाठी ही प्रक्रिया आता सक्षम करण्यात आली आहे. त्यामुळे सर्व राज्यांमध्ये नेमक्या किती चाचणी केल्या जातात, यांच्या आकडेवारीत नियमित वाढ होत आहे. गेल्या 24 तासांमध्ये 2,80,151 नमुन्यांची चाचणी घेण्यात आली. आत्तापर्यंत देशात झालेल्या चाचण्यांचा एकत्रित आकडा पाहिला तर देशात 1,15,87,153 चाचण्या झाल्याचे स्पष्ट होत आहे. या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणजेच भारतामध्ये प्रति दक्षलक्ष 8396.4 या प्रमाणात जनतेच्या कोविड-19 चाचण्या घेण्यात आल्या आहेत.

कोविडच्या चाचणी संख्येमध्ये निरंतर वाढ होण्यासाठी कारणीभूत ठरलेला महत्वाचा घटक म्हणजे, संपूर्ण देशामध्ये तपासणी आणि निदान प्रयोगशाळांचे जाळे विस्तारित करण्यात आले आहे. त्यामुळे आता सकारी क्षेत्रामध्ये 850 प्रयोगशाळा आणि खासगी क्षेत्रातल्या 344 प्रयोगशाळा म्हणजेच दोन्ही मिळून 1194 प्रयोगशाळांमधून कोविड-19 ची चाचणी, परीक्षण केले जात आहे. यामध्ये पुढील गोष्टींचा समावेश आहे.

 • रिअल टाइम, जलद - आरटी पीसीआर आधारित चाचणी प्रयोगशाळा: 624 (सरकारी -388 अधिक खासगी 236)
 • ट्रूनॅट आधारित चाचणी प्रयोगशाळा: 472 (सरकारी -427 अधिक खासगी 45)
 • सीबीएनएएटी आधारित चाचणी प्रयोगशाळा: 98 (सरकारी - 35 अधिक खासगी 63).

 

इतर

 

महाराष्ट्र अपडेट्स

गेले पंचवीस दिवस महाराष्ट्रात कोविड-19  मुळे होणारे मृत्यू दर पाचव्या दिवशी 1 हजाराचा टप्पा गाठत आहेत. 10,116 मृत्यूंसह राज्यात झालेले मृत्यू हे कित्येक देशांपेक्षा जास्त आहेत गेल्या 24 तासात 8,139 नवीन केसेस नोंद झाल्या यामुळे राज्यातील रुग्ण संख्या 2,46,600 झाली. सक्रीय रुग्णसंख्या 91,457 आहे. मुंबई महानगरपालिकेच्या कोरोना नियंत्रणासाठीच्या  धारावी मॉडेलची जागतिक आरोग्य संघटनेकडून प्रशंसा झाली आहे.

 

* * *

MC/SP/DR

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai@gmail.com(Release ID: 1638199) Visitor Counter : 32