पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय

या, भारतात संशोधन करा, धर्मेंद्र प्रधान यांचे जगभरातील भारतीय विद्यार्थ्यांना आवाहन

Posted On: 12 JUL 2020 3:05PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 12 जुलै 2020

 

पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू आणि पोलाद मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी विविध अव्वल  जागतिक विद्यापीठांमधील भारतीय विद्यार्थ्यांना भारतात येऊन नाविन्यपूर्ण संशोधन करण्याचे आणि  नव्या संधींचा शोध घेण्याचे आवाहन केले आहे. भारतात शेवटच्या घटकापर्यंत ऊर्जा पोहचवण्याबाबत ते काल परदेशातील भारतीय विद्वान, विद्यार्थी आणि मित्र  गटाशी संवाद साधत होते. प्रिन्सटन विद्यापीठाच्या लीड इंडिया ग्रुप, थिंक इंडिया परड्यू, डेव्हलप एम्पॉवर आणि सिनर्झाइज इंडिया ग्रुप यांनी मेरीलँड विद्यापीठात ई-बैठक आयोजित केली होती.

भारताच्या उर्जा  दृष्टीकोनाबाबत  भाष्य करताना प्रधान म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या उर्जा भविष्यासाठी एका स्पष्ट रुपरेषेची कल्पना केली आहे,  जी उर्जा उपलब्धता आणि सर्वांसाठी सुगम्यता, गोरगरीबांना परवडेल असा दर, ऊर्जा वापरात  कार्यक्षमता, एक जबाबदार जागतिक नागरिक म्हणून हवामान बदलांचा प्रतिकार करण्यासाठी उर्जा टिकाऊपणा आणि जागतिक अनिश्चितता कमी करण्यासाठी ऊर्जा सुरक्षा या पाच मुख्य घटकांवर आधारित आहे. "

तेल आणि वायू  क्षेत्रातील स्वयंपूर्णतेबाबत प्रधान म्हणाले, “पंतप्रधान मोदी यांनी 2022 पर्यंत उर्जा आयातीवरील अवलंबित्व  दहा टक्क्यांनी कमी करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. या संदर्भात  देशांतर्गत तेल आणि वायू उत्पादन वाढवण्यासाठी आणि देशाच्या ऊर्जेची गरज भागविण्यासाठी आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी सरकारने अनेक धोरणात्मक तसेच  प्रशासकीय उपाययोजना केल्या आहेत. ”

त्यांनी भारताच्या ऊर्जा मुत्सद्दीपणाविषयीही सांगितले. ते म्हणाले, “जागतिक उर्जा नकाशावर भारताने आपले अस्तित्व दाखवून दिले आहे. पंतप्रधान  मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत किफायतशीर आणि रास्त दराच्या ऊर्जेसाठी मागणी करणाऱ्या देशांचे  नेतृत्व करत आहे. आपण ओपेक, आयईए, आयईएफ आणि जागतिक उर्जेच्या इतर सर्व प्रमुख चर्चांमध्ये सहभागी होत आहोत. पुरवठा स्रोतांच्या विविधीकरणाच्या धोरणाअंतर्गत भारत अमेरिका, रशिया, सौदी अरेबिया, युएई आणि सर्व प्रमुख उर्जा उत्पादकांबरोबर सहभागी झाला आहे. ”

वायू -आधारित अर्थव्यवस्थेकडे भारताच्या संक्रमणाबद्दल बोलताना ते म्हणाले, “कोविड -19 चे आव्हान असूनही, भारत आशिया खंडातील वायू  मागणीतील वाढीच्या प्रमुख चालकांपैकी एक  म्हणून उदयाला आला आहे. आज, भारतातील उर्जा मिश्रणात नैसर्गिक वायूचा वाटा सुमारे 6.3% आहे. 2030 पर्यंत नैसर्गिक वायूचा वाटा 15% पर्यंत वाढवण्याचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट आम्ही ठेवले आहे. ”

सध्याच्या महामारी बद्दल प्रधान म्हणाले, "आम्ही कोविड -19 प्रादुर्भावाच्या मधल्या टप्प्यात आहोत ज्याने आपल्या जीवनातील मूलभूत धारणाना आव्हान दिले आहे. याच्या  त्वरित आर्थिक परिणामामुळे आपली अर्थव्यवस्था मंदावू  शकते मात्र आपल्याला थोडा विराम घेऊन पुनर्विचार करून फेररचना करण्याची संधी यानिमित्ताने उपलब्ध करून दिली आहे. " असेही ते म्हणाले.

 

* * * 

B.Gokhale/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1638136) Visitor Counter : 147