विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
जेएनसीएएसआरच्या उपकंपनीने (स्पिनऑफ) कोविड -19 चाचणी किटमध्ये वापरले जाणारे मॉलेक्युलर प्रोब्स केले सुरु
Posted On:
12 JUL 2020 6:13PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 12 जुलै 2020
विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाची एक स्वायत्त संस्था असलेल्या जवाहरलाल नेहरू प्रगत वैज्ञानिक संशोधन केंद्राच्या (जेएनसीएएसआर) व्हीएनआयआर बायोटेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड या उपकंपनीने (स्पिनऑफ) कोविड-19 चाचणी किटमध्ये वापरले जाणारे रिव्हर्स ट्रान्स्क्रिप्शन पॉलिमरेज चेन रिएक्शन डिटेक्शन या मॉलेक्युलर प्रोब्ससाठी स्वदेशी फ्लूरोसेंस प्रोब्स आणि पॉलिमरेस चेन रिएक्शन (पीसीआर) मिक्स सुरू केले आहे. कर्नाटक सरकारच्या बंगलोर बायो-इनोव्हेशन सेंटर (बीबीसी) मध्ये व्हीएनआयआर बायोटेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड स्थित आहे.
व्हीएनआयआरचे सह-संस्थापक प्रा. टी. गोविंदराजू आणि डॉ. मेहर प्रकाश यांनी आरटीपीसीआर शोधण्यासाठी फ्लॉरेन्स प्रोब्स आणि पीसीआर मिक्स विकसित केले आहे. हे मॉलेक्युलर प्रोब्स कोविड -19 चाचणी किटमध्ये वापरले जातात. साधारणपणे पीसीआर आधारित चाचणी किटमध्ये तीन महत्वपूर्ण घटक असतात (ऑलिगोस, एंजाइम्स, मॉलेक्युलर प्रोब्स). पहिले दोन भारतात अंशतः उपलब्ध आहेत आणि अंशतः आयात केले आहेत, तर कोविड-19 चाचण्यांमध्ये वापरलेले मॉलेक्युलर प्रोब्स केवळ आयात केले आहेत. मॉलेक्युलर प्रोब्सचा वापर पीसीआरमधील विस्तार वाढविण्यासाठी केला जातो. त्यांचा त्वरित वापर कोविड-19 चाचणीसाठी आहे, परंतु विविध रोगांच्या आण्विक निदान चाचण्यांसाठी ती साधारणपणे मॉलेक्युलर साधने आहेत.
व्हीएनआयआरने मॉलेक्युलर प्रोब्ससाठी सिंथेसिस प्रोटोकॉल विकसित केले आहेत, जे पीसीआर आधारित कोविड-19 चाचणीसाठी उपयुक्त ठरतील. व्हीएनआयआर त्याच्या प्रक्रियेच्या नाविन्यपूर्ण संशोधनाच्या संरक्षणासाठी ते आणणार आहे.
मॉलेक्युलर निदान चाचण्या केवळ प्रयोगशाळांकरिता किंवा मर्यादित उपयोगासाठी सीमित असायच्या. कोविड-19 ने एक विशिष्ट समस्या उत्पन्न केली आहे मॉलेक्युलर निदान चाचणीची सर्वोत्कृष्ट पातळी आवश्यक असल्यास संपूर्ण लोकसंख्येच्या पातळीवर घ्यावी लागेल. कोविड -19 साठी आवश्यक चाचण्यांचे प्रमाण पाहता, महत्वपूर्ण चाचणी किट घटकांसह आत्मनिर्भर होणे खूप महत्वाचे आहे. एन्झाईम आणि ऑलिगोच्या गरजा भारतीय उत्पादकांकडून अंशतः पूर्ण केल्या जातात आणि व्हीएनआयआर तिसऱ्या महत्वाच्या घटकाकडे लक्ष देण्याची कल्पना आखत आहेत.
आरटी-पीसीआर आधारित कोविड-19 चाचण्यासाठी विकसित केलेले प्रोब्स हे आतापर्यंत आयात केल्या जाणाऱ्या महत्वपूर्ण उत्पादनांच्या विकासासाठी आपल्या मूलभूत विज्ञान ज्ञानाचा उपयोग करण्याचे उत्कृष्ट उदाहरण आहे. हे ज्ञान केवळ एका विशिष्ट विषाणूपुरते मर्यादित नाही तर भविष्यात इतर विषाणूंसाठी देखील मोलेक्युलर निदान वेगाने विकसित होण्यास मदत होईल, असे डीएसटीचे सचिव प्रा. आशुतोष शर्मा यांनी सांगितले.
मॉलेक्युल, त्याचे लक्ष्य, रसायनांची उपलब्धता आणि सिंथेसिसच्या प्रत्येक टप्प्यावर प्रोटोकॉलच्या निवडीनुसार उत्पादन करून मॉलेक्युलर प्रोबचा विकास हा कृत्रिम सेंद्रीय रसायनशास्त्राचा एक परिणाम आहे. व्हीएनआयआर ने काल्पनिक कृत्रिम मार्गांचा वापर करून मॉलेक्युलर प्रोब विकसित करण्यासाठी मॉलेक्युलर प्रोब विकासामध्ये आपल्या महत्वपूर्ण सामर्थ्याचा उपयोग केला आहे.
मार्च 2020 मध्ये, उर्वरित जगाबरोबरच व्हीएनआयआर देखील काही काळ बंद होते. व्हीएनआयआर टीमने कोविड -19 समस्येचे निराकरण करण्यासाठी घरी राहण्याच्या संधीचा उपयोग करून घेतला.
* * *
B.Gokhale/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1638177)
Visitor Counter : 220