PIB Headquarters

पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित दैनंदिन बातमीपत्र

Posted On: 30 JUN 2020 7:15PM by PIB Mumbai

Description: Coat of arms of India PNG images free download 

(कोविड-19 संबंधी पत्र सूचना कार्यालयाद्वारे जारी बातम्‍या आणि सत्‍यता पडताळणी बातम्‍या समाविष्‍ट)

दिल्‍ली-मुंबई, 30 जून 2020

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशाला उद्देशून भाषण केले आणि त्यात, प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेला नोव्हेंबर महिना अखेरपर्यंत मुदतवाढ देत असल्याची घोषणा केली. या पाच महिन्यांच्या काळात, 80 कोटींपेक्षा जास्त गरीब लोकांना, दरमहा, कुटुंबातल्या प्रत्येक सदस्याला पाच किलो गहू किंवा तांदूळ मोफत दिले जातील. त्यासोबतच,प्रत्येक कुटुंबाला दरमहा एक किलो चणाडाळ देखील मोफत दिली जाईल.पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेच्या या विस्तारासाठी सरकार, 90 हजार कोटींपेक्षा जास्त रुपये खर्च करणार आहे, अशी माहिती पंतप्रधानांनी दिली.

गेल्या तीन महिन्यांत 20 कोटी गरीब कुटुंबांच्या जनधन खात्यात थेट 31 हजार कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत, असे पंतप्रधान म्हणाले. 9 कोटींपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यात,18 हजार कोटी रुपये जमा करण्यात आले. त्यासोबतच, श्रमिकांना रोजगाराच्या संधी देण्यासाठी, प्रधानमंत्री गरीब कल्याण रोजगार अभियान जलद गतीने राबवण्याची सुरुवात झाली असून, त्यावर सरकारने, 50 हजार कोटी रुपये खर्च केले आहेत.

कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेचे नियोजन आणि तयारीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज एक बैठक घेण्यात आली. या बैठकीत आढाव्यासोबतच लस कधी तयार होऊ शकेल, यावरही चर्चा झाली. भारतासारख्या विशाल आणि विविधांगी लोकसंख्येच्या देशासाठी लसीकरण करण्यासाठी अनेक मुद्दे विचारात घ्यावे लागतील. यात, वैद्यकीय पुरवठा साखळीचे व्यवस्थापन, जास्त धोका असलेल्या लोकांना प्राधान्यक्रम, या प्रक्रियेशी संबंधित असलेल्या सर्व संस्थांमधील समन्वय तसेच, खाजगी क्षेत्रांची आणि नागरी समाजाची भूमिका अशा सर्व गोष्टींचा विचार करावा लागेल. या राष्ट्रीय प्रयत्नांची पायाभरणी तयार करणारी महत्वाची मार्गदर्शक तत्वे पंतप्रधान मोदी यांनी यावेळी सांगितली.

 

आरोग्य मंत्रालयाची कोविड-19  घडामोडींवरील माहिती  

कोविड-19 चे व्यवस्थापन आणि नियंत्रण यासाठी केंद्र सरकार सर्व राज्ये / केंद्रशासित प्रदेशांच्या मदतीने करत असलेल्या एकत्रित आणि केंद्रित प्रयत्नांमुळे कोविडचे रुग्ण बरे होण्याचा दर आता वेगाने 60 टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे.

आजपर्यंत, सक्रीय रूग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या, 1,19,696 इतकी जास्त झाली आहे.

तसेच, 2,15,125 सक्रिय रुग्णांवर वैद्यकीय उपचार सुरु असून, तर 3,34,821 रूग्ण बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. कोविड-19 च्या रुग्णांचा बरे होण्याचा दर, 59.07 टक्के इतका झाला आहे.

गेल्या 24 तासांत, एकूण 13,099 कोविड-19 रुग्ण बरे झाले आहेत.

चाचणी प्रयोगशाळांची संख्या सतत वाढत आहे. भारतात सध्या कोविड-19 साठी समर्पित 1049 निदान प्रयोगशाळा आहेत. यामध्ये शासकीय क्षेत्रातील 761 प्रयोगशाळा आणि 288 खासगी प्रयोगशाळांचा समावेश आहे.

या प्रयोगशाळांची सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे :--

  • रियल टाईम –RT PCR आधारित चाचणी प्रयोगशाळा: 571 (सरकारी: 362 + खासगी: 209)
  • TrueNat आधारित चाचणी प्रयोगशाळा: 393 (सरकारी :367 + खासगी: 26)
  • CBNAAT आधारित चाचणी प्रयोगशाळा: 85 (सरकारी: 32 + खासगी: 53)

नमुना चाचणी देखील जोरात सुरु आहे. गेल्या 24 तासांत तब्बल 2,10,292 नमुन्यांची चाचणी घेण्यात आली. आतापर्यंत चाचणी केलेल्या नमुन्यांची एकूण संख्या 86,08,654 आहे.

आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालया अंतर्गत राष्ट्रीय रक्त संक्रामण/संचरण परिषदेने कोविड-19 साथीच्या आजाराच्या काळात संक्रामण सेवा सुरक्षितपणे आयोजित करण्यासाठी द्वितीय अंतरिम मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत.

 

इतर

  • देशातील कोविड-19 च्या रुग्णांमध्ये होणारी वाढ आणि हॉटस्पॉट भागात परप्रांतीय लोकांची संख्या वाढल्याने उत्तर प्रदेश (यूपी) मधील एक प्रमुख आव्हान म्हणजे परत आलेल्या नागरिकांच्या आरोग्यविषयक सेवांची गरज भागवणे आणि ग्रामीण लोकसंख्येतील प्रसार रोखणे. या संकटाच्या वेळी उत्तर प्रदेशच्या कोविड -19 व्यवस्थापनास सहाय्य करण्यासाठी आशांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. उत्तर प्रदेशात प्रचंड मोठ्या प्रमाणावर राबविण्यात आलेल्या या मोहिमेत दोन टप्प्यांत 30.43 लाख स्थलांतरितांचा 1.6 लाख आशा सेविकांकडून शोध घेण्यात आला, पहिल्या टप्प्यात 11.24 लाख आणि दुसऱ्या टप्प्यात 19.19 लाख स्थलांतरितांचा शोध घेण्यात आला. त्यांनी संपर्कित व्यक्तींचा शोध तसेच  समुदाय पातळीवर सर्वेक्षण करण्यात मदत केली आहे.
  • लखनऊ येथील राष्ट्रीय वनस्पती संशोधन संस्थेने (एनबीआरआय) कोविड-19 चाचणीसाठी प्रगत जीवरेणुशास्त्र प्रयोगशाळा (व्हायरलॉजीस्थापन केली आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर), जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) आणि आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्वांच्या आधारे ही सुविधा विकसित करण्यात आली आहे. ही जैव सुरक्षा स्तर (बीएसएल) 3 स्तरावरील सुविधा आहे.  जैवसुरक्षा स्तर ज्या रोगाशी संबंधित आहे त्या आधारे ही सुविधा चालवली जाईल.  आयसीएमआरच्या  मार्गदर्शक तत्त्वांनुसार, कोविड-19 साठी बीएसएल 2 स्तराच्या सुविधेची शिफारस करण्यात आली आहे परंतु ही एक प्रगत आवृत्ती आहे,” असे एनबीआरआयचे वरिष्ठ प्रधान वैज्ञानिक डॉ. समीर सावंत म्हणाले.
  • तामिळनाडू राज्यातल्या कमी उत्पन्न गटातील व्यक्तींना मदत मिळावी, त्यांना वाजवी दरात घरे मिळावीत, यासाठी, केंद्र सरकार, तामिळनाडू सरकार आणि जागतिक बँक यांच्यात काल एक कायदेशीर करार करण्यात आला. हे कायदेशीर करार दोन प्रकल्पांसाठी करण्यात आले आहेत- तामिळनाडू राज्यात गृहनिर्माण क्षेत्र सशक्तीकरण कार्यक्रमसाठीच्या पहिल्या प्रकल्पासाठी 200 दशलक्ष डॉलर्सचा करार व तामिळनाडू गृहनिर्माण व आवास विकास प्रकल्पासाठी 50 दशलक्ष डॉलर्सचा करार राज्यातील गृहनिर्माण क्षेत्र धोरण संस्था व नियमन अधिक मजबूत करण्यासाठी करण्यात आला.  कोविड-19च्या संकटामुळे, नागरी भागातील गरिबांमध्ये भीषण गरिबीचा धोका, मानवी भांडवल, संपत्ती व जीवनमान या सगळ्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. विशेषतः अति गरिबांना त्याची अधिक झळ पोहचेल. या प्रकल्पामुळे गरीब व दुर्बल घटकांना सुरक्षित घरे वाजवी किमतीत मिळणार आहेत, असे जुनैद अहमद यांनी सांगितले.
  • केंद्रीय गृहमंत्रालयाने काल अनलॉक-2 साठीच्या नव्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या. या अनलॉक-2 मध्ये प्रतिबंधित क्षेत्रांच्या बाहेर अनेक कामांसाठी परवानगी देण्यात आली आहे. नव्या मार्गदर्शक सूचना 1 जुलै 2020 पासून लागू होणार आहेत, या ही टप्प्यात, अनेक गोष्टी हळूहळू सुरु करण्याची प्रक्रिया पुढे नेली जाणार आहे.आज जारी झालेल्या नव्या मार्गदर्शक सूचना या, सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांकडून आलेल्या सूचना आणि प्रतिसादानुसार, तसेच विविध केंद्रीय मंत्रालये आणि विभागांशी सविस्तर सल्लामसलत केल्यानंतर तयार करण्यात आल्या आहेत.
  • केंद्रीय ईशान्य प्रदेश विकास , पंतप्रधान कार्यालय, कार्मिक , सार्वजनिक तक्रारी, निवृत्ती वेतन, अणु उर्जा आणि अंतराळ राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) डॉ जितेंद्र सिंह यांनी नवी दिल्ली येथे सांगितले की, भारताच्यागगनयानया पहिल्या मानवी अंतराळ मोहिमेच्या प्रक्षेपणावर कोविड महामारीचा परिणाम होणार नाही आणि याची तयारी योग्य दिशेने सुरू आहे.
  • पेट्रोलिम आणि नैसर्गीक वायू तसेच स्टील उद्योगमंत्री धर्मेंद्र प्रधान आणि हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी इंडियन ऑईलच्या अत्याधुनिक तांत्रिक विकास आणि उपयोजन केंद्राची म्हणजेच फरिदाबाद येथील दुसऱ्या संशोधन आणि विकास प्रांगणासाठी IMT, सेक्टर-67 इथे कोनशीला बसवली. या 29 एकरांवर पसरलेल्या नव्या केंद्रासाठी 2282 कोटी रुपये एवढी गुंतवणूक झाली आहे. या नव्या परिसरात इंडियन ऑईल संशोधन आणि विकास यांनी विकसित केलेल्या अनेक तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक आणि उपयोजन यावर विशेषकरून काम केले जाईल. तसेच हे फरिदाबादच्याच सेक्टर-13 येथे असलेल्या केंद्रांशी सुसंगत असेल.
  • अभूतपूर्व अशा कोविड-19 च्या महामारीच्या संकटामुळे देशातील समाजाच्या सर्व स्तरांना प्रभावित केले आहे.ह्या कसोटीच्या काळात, गरीब आणि उपेक्षित समूहांवर याचा परिणाम जास्त झाला असून, आदिवासी जमातींना त्याचा फार मोठा फटका बसला आहे. या संकट काळात आदिवासी कारागिरांचे ओझे कमी करण्याच्या उद्देशाने,आणि त्यांच्या मंदगतीत सापडलेल्या आर्थिक अवस्थेला नवचैतन्य देण्यासाठी आणि त्यांच्या उपजिविकेला वाढवून आधार देण्यासाठी आदिवासी कल्याण मंत्रालयाच्या ट्रायफेड विभागाने अनेक उपक्रम सुरू केले आहेत.

 

महाराष्ट्र अपडेट्स

राज्यातील रुग्ण संख्या सध्या 1,69,883 आहे गेल्या 24 तासात 5,257 नवीन रुग्ण नोंद झाले. बरे झालेल्या रुग्णांची संख्या 88,960 झाली आहे. तर सक्रिय रुग्ण 73,298 आहेत. बृहन्मुंबई भागामध्ये 1247 नवीन रुग्ण आढळून आले तर 391 रुग्ण बरे झाले आणि 21 मृत्यूची सोमवारी नोंद झाली. एकूण संक्रमित रुग्णांची संख्या 76,294 झाली आहे. या दरम्यान महाराष्ट्र सरकारने विविध केंद्रीय कर्मचारी, उच्च न्यायालय तसेच सरकारी बँकांच्या कर्मचाऱ्यांना उपनगरीय रेल्वेने प्रवास करण्याची परवानगी देण्याची विनंती रेल्वेकडे केली आहे.

FACTCHECK

* * *

RT/MC/SP/DR

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai@gmail.com(Release ID: 1635412) Visitor Counter : 66