पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय
फरिदाबादमधील इंडियन ऑईलच्या संशोधन आणि विकास परिसराचे धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते उद्घाटन
संशोधन आणि विकास ही आत्मनिर्भर भारताची गुरूकिल्ली, असे प्रतिपादन
हरियाणाला भारतातील प्रमुख संशोधन आणि विकास केंद्र बनवण्यासाठी वचनबद्ध
Posted On:
29 JUN 2020 8:02PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 29 जून 2020
पेट्रोलिम आणि नैसर्गीक वायू तसेच स्टील उद्योगमंत्री धर्मेंद्र प्रधान आणि हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी इंडियन ऑईलच्या अत्याधुनिक तांत्रिक विकास आणि उपयोजन केंद्राची म्हणजेच फरिदाबाद येथील दुसऱ्या संशोधन आणि विकास प्रांगणासाठी IMT, सेक्टर-67 इथे कोनशीला बसवली. या 29 एकरांवर पसरलेल्या नव्या केंद्रासाठी 2282 कोटी रुपये एवढी गुंतवणूक झाली आहे. या नव्या परिसरात इंडियन ऑईल संशोधन आणि विकास यांनी विकसित केलेल्या अनेक तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक आणि उपयोजन यावर विशेषकरून काम केले जाईल. तसेच हे फरिदाबादच्याच सेक्टर-13 येथे असलेल्या केंद्रांशी सुसंगत असेल.
या प्रांगणातील संशोधनासंबधीत मुलभूत सुविधांमध्ये अत्याधुनिक प्रयोगशाळा तसेच नवीकरणीय आणि पर्यायी उर्जेवरील मोठे प्रकल्प आहेत. इंधन सेल, हायड्रोजन, वायूनिर्मिती आणि सौरउर्जा संशोधन, नॅनो मटेरिअल उत्पादन केंद्र, आणि पेट्रोरसायनांशी संबधित भरारी घेतलेले वा नवनिर्मित पेट्रोकेमिकल प्रकल्प, जैवतंत्रज्ञान यांचा समावेश आहे. इंडियन ऑईलच्या संशोधन आणि विकास केंद्रात पारंपारिक उर्जा स्रोतांसोबतच अपारंपारिक उर्जा स्रोतांवर लक्ष केंद्रीत करेल. या नव्या केंद्राचा उद्देश बऱ्याच आघाडीच्या आणि पेट्रोरसायने, बॅटरी वा उर्जा उत्प्रेरके आणि हरितगृह वायू (CO2) साठवण, उत्प्रेरके आणि इंधन सेलसाठी नवीन नॅनो मटेरियल, हायड्रोजन उत्पादनाचे मार्ग आणि गमनशील आणि स्थिर उपयोजनासाठी इंधन सेल यासारख्या उद्योगांच्या स्वदेशीकरणाचे उद्दीष्ट साध्य करेल.
यावेळी बोलताना धर्मेंद्र प्रधान म्हणाले की इंडियन ऑइलचे हे संशोधन आणि विकास केंद्र काही वर्षातच पेट्रोलियम संशोधन आणि विकासासाठीची अत्याधुनिक विकास संस्था म्हणून विकास पावेल. तसेच ते भारतीय परिप्रेक्षात सुसंगत असे स्वदेशी तंत्रज्ञान आणि कृती यावर लक्ष केंद्रित करेल. इंडियन ऑइलच्या संशोधन आणि विकास केंद्राने पंतप्रधानांच्या ‘आत्मनिर्भर भारत’ या स्वप्नाला हातभार लावला आहे. हे संशोधन आणि विकास केंद्र पर्यायी स्वच्छ आणि स्वदेशी ऊर्जा साधनांची प्रयोगशाळा बनेल आणि भारताला ऊर्जाक्षेत्रात स्वावलंबी बनवण्याच्या उद्दिष्टाकडे वाटचाल करत पंतप्रधानांचा आत्मनिर्भर भारताचे स्वप्न पूर्ण करेल, असे ते म्हणाले.
हरियाणा सरकारने केलेल्या सहकार्याबद्दल त्यांना धन्यवाद देताना या राज्यातील पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू या क्षेत्रात उत्तम कामगिरी करून राज्याला केरोसिन मुक्त राज्य बनवल्याबद्दल केंद्रीय मंत्र्यांनी हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन केले. कृषी अवशिष्टांचे स्वच्छ ऊर्जेत रूपांतर करण्यात हे राज्य महत्त्वाची भूमिका बजावेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सामाजिक आर्थिक क्षेत्रात तसेच विकासाच्या विविध पातळीवर मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांच्या नेतृत्वाखाली हरियाणाने प्रचंड प्रगती केली असल्याचेही ते म्हणाले की हरियाणाला देशातील प्रगत संशोधन आणि विकास केंद्र बनवण्यास आम्ही वचनबद्ध आहोत. संशोधन आणि विकास ही आत्मनिर्भर भारताची गुरुकिल्ली असल्याचे अधोरेखित करत त्यांनी सांगितले की इंडियन ऑइलने अवशिष्ट ऊर्जेच्या कार्यक्रमांना राज्यात चालना द्यायला हवी तसेच राज्याला पर्यायी ऊर्जा स्त्रोतांचे जागतिक स्तरावरील प्रारुप बनवण्यावर भर द्यायला हवा. कचऱ्याचे वर्गीकरण आणि त्याचे ऊर्जेत रूपांतर याचे सार्वजनिक प्रयत्नांवर बेतलेले उदाहरण म्हणजे सर्वांसाठीच अनुकूल असेल ते म्हणाले. पर्यायी ऊर्जेच्या क्षेत्रात आघाडी घेण्याची क्षमता या राज्याकडे असल्याचेही ते म्हणाले.
कोरोना संकटाच्या काळात भारताने जगाला औषधे पुरवण्याच्या बाबतीत महत्त्वाची कामगिरी केल्याचा उल्लेख त्यांनी केला देशाची पेट्रो-रसायनांची गरज वाढत आहे तसेच आपण पेट्रोलियम उत्पादनांची आयात कमी केली आहे. भारताला पेट्रोल रसायन केंद्र बनवण्यावर आणि देशाला आत्मनिर्भर बनवण्यावर उद्योगक्षेत्राने भर देणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.
हरियाणाचे मुख्यमंत्री आपल्या संबोधनात म्हणाले की कोरोना महामारीच्या संकटाचा राज्याने यशस्वी सामना केला तसेच त्याचा परिणाम भोगाव्या लागलेल्या कामगारांसाठी मदत उपलब्ध करून दिली. इंडियन ऑइलच्या नवीन संशोधन केंद्रांसाठी हरियाणाची निवड केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी इंडियन ऑईलचे आभार मानले. आपले राज्य फक्त शेती-क्षेत्रातच नव्हे तर क्रीडाक्षेत्र आणि वाहन निर्मिती क्षेत्रातही मुख्य केंद्र म्हणून उदयास येत आहे असे नमूद केले.
राज्याला केरोसिनमुक्त बनवण्यात सरकारने महत्वाची भूमिका बजावल्याचे ते म्हणाले. केरोसिनचा उपयोग भेसळीसाठी होत असल्यामुळे हे गरजेचे होते आणि त्याला विरोध झाला नाही असेही ते म्हणाले. सर्व घरांना एलपीजी जोडण्या मिळाल्याचेही त्यांनी सांगितले. राज्य शेती आणि कृषी व्यवसायासाठीचे केंद्र बनण्याच्या दृष्टीने प्रगती करत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
S.Thakur/V.Sahjrao/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1635190)
Visitor Counter : 249