आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोविड-19 सद्यस्थिती - 1


भारतात सध्या कोविड-19 मधून बरे झालेल्यांची संख्या 2 लाखाहून अधिक

रुग्ण बरे होण्याचा दर 53.79% पर्यंत वाढला

Posted On: 19 JUN 2020 5:44PM by PIB Mumbai

 

गेल्या 24 तासात कोविड-19 चे 10,386 रुग्ण बरे झाल्यामुळे आत्तापर्यंत एकूण 2,04,710 रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचा दर सातत्याने वाढत असून तो 53.79%.पर्यंत पोहोचला आहे. सध्या 1,63,248 संक्रमित रुग्ण वैद्यकीय निरीक्षणाखाली आहेत.

दैनंदिन आकडेवारीचा कल हा रुग्ण बरे होण्याचे वाढते प्रमाण तसेच बाधित व्यक्ती आणि बरे झालेल्या व्यक्तींच्या संख्येतील वाढती तफावत दर्शवितो. कोविड -19 चे वेळेवर व्यवस्थापन करण्याच्या भारताच्या धोरणात्मक हालचालींमुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे.

टाळेबंदीची अंमलबजावणी, राज्य सरकार/केंद्रशासित प्रदेशांशी समन्वय साधून भारत सरकारकडून कोविड योग्य वर्तणुकीबाबत सर्वसामान्यांचे प्रबोधन, यासारख्या कृतीशील उपायांनी हा प्रसार महत्त्वपूर्णरित्या रोखला आहे. टाळेबंदीमुळे चाचणी सुविधा आणि आरोग्यविषयक पायाभूत सुविधा वाढविण्यासाठी सरकारला उसंत मिळाली. त्यामुळे कोविड -19 रुग्णांचा वेळेवर शोध आणि उपचार व्यवस्थापन करून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले. ही वाढती तफावत म्हणजे अशा प्रकारे कोविड-19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारचे वेळेवर, श्रेणीबद्ध पद्धतीने आणि प्रतिबंधात्मक प्रयत्न आणि असंख्य आघाडीच्या आरोग्य योद्धयांद्वारे त्याच्या अंमलबजावणीचा एक परिणाम आहे.

 शासकीय प्रयोगशाळांची संख्या 703 पर्यंत तर खाजगी प्रयोगशाळांची संख्या 257 पर्यंत वाढली आहे (एकूण 960 प्रयोगशाळा). वर्गवारी खालीलप्रमाणे:

जलद आरटी पीसीआर आधारित चाचणी प्रयोगशाळा: 541 (शासकीय: 349 + खाजगी: 192)

ट्रू नॅट आधारित चाचणी प्रयोगशाळा: 345 (शासकीय: 328 + खाजगी: 17)

सीबीएनएएटी आधारित चाचणी प्रयोगशाळा: 74 (शासकीय: 26 + खाजगी: 48)

गेल्या 24 तासात 1,76,959 नमुने तपासण्यात आले. त्यामुळे आत्तापर्यंत 64,26,627 नमुने तपासण्यात आले.

मंत्रालयाने रुग्णालयातील कोविड आणि कोविड विरहित भागात कार्यरत आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांच्या  व्यवस्थापनासाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत ज्या दिनांक 18 जून 2020 रोजी आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या आरोग्य सेवा महासंचालनालयाने (ईएमआर विभाग) जारी केलेल्या 4 पानी पुस्तिकेच्या पहिल्या पानावर तुम्ही पाहू शकता.

कोविड सुसंगत आचरणासाठी मंत्रालयाने विस्तृत मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्या तुम्ही 

https://www.mohfw.gov.in/pdf/Illustrativeguidelineupdate.pdf यावर पाहू शकता.

कोविड -19 शी संबंधित सर्व  तांत्रिक मुद्द्यांविषयी, मार्गदर्शक तत्वांविषयी आणि सल्ल्यासंबंधी अधिकृत व अद्ययावत माहितीसाठी कृपया येथे नियमितपणे भेट द्याः https://www.mohfw.gov.in/ आणि @MOHFW_INDIA.

कोविड -19 शी संबंधित तांत्रिक प्रश्न technicalquery.covid19[at]gov[dot]in यावर तर इतर प्रश्न ncov2019[at]gov[dot]in and @CovidIndiaSeva यावर पाठवू शकता.

कोविड -19 वर काही प्रश्न असल्यास कृपया आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाशी संपर्क साधा : + 91-11-23978046 या हेल्पलाइनवर किंवा 1075 (टोल फ्री) क्रमांकावर. कोविड -19 वरील राज्ये/केंद्रशासित प्रदेशांच्या हेल्पलाइन क्रमांकाची यादी देखील https://www.mohfw.gov.in/pdf/coronvavirushelplinenumber.pdf यावर उपलब्ध आहे.

 

M.Chopade/V.Joshi/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1632641) Visitor Counter : 213