आयुष मंत्रालय

आंतरराष्ट्रीय योग दिनी (आयडीवाय) प्रसारित होणार पंतप्रधानांचा संदेश


आयुष मंत्रालयाने 21 जून 2020 रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल माध्यमांचा मोठ्या प्रमाणावर केला उपयोग

Posted On: 18 JUN 2020 8:42PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 18 जून 2020

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संदेश हे आंतरराष्ट्रीय योग दिवस 2020 च्या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण असेल. पंतप्रधानांचा हा संदेश 21 जून 2020 रोजी सकाळी 6:30 वाजता प्रसारित केला जाईल. यंदा आयडीवाय मोठ्या प्रमाणात साजरा केला जात आहे. आयुष मंत्रालयातर्फे इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल मंचाद्वारे मोठ्या प्रमाणावर यावर्षीचा आंतरराष्ट्रीय योग दिवस पाळला जाईल.

पंतप्रधानांच्या या संदेशाचे प्रसारण डीडी नॅशनल, डीडी न्यूज, डीडी भारती, डीडी इंडिया, डीडी उर्दू, डीडी स्पोर्ट्स, डीडी किसान, सर्व आरएलएसएस वाहिन्या आणि सर्व प्रादेशिक केंद्रांवर केले जाईल. या आधीच्या वर्षांप्रमाणेच या संदेशानंतर मोरारजी देसाई राष्ट्रीय योग संस्थेच्या पथकाकडून (एमडीएनआयवाय) सामान्य योग क्रियांचे (सीवायपी) 45 मिनिटे थेट प्रक्षेपण केले जाईल. सामान्य योग अभ्यासक्रम हा वेगवेगळ्या वयोगटातील आणि विविध क्षेत्रातील लोकांना लक्षात ठेवून बनविला गेला आहे. जे सामान्य योग अभ्यासक्रमात प्रशिक्षण घेत आहेत त्यांना योगाबद्दल रुची निर्माण होऊन त्यानुसार दृष्टीकोन विकसित होण्याची शक्यता आहे आणि म्हणूनच ते दीर्घकाळपर्यंत तो आचरणात आणू शकतात.

मागील काही वर्षांमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन सार्वजनिक ठिकाणी हजारो लोकांच्या सामूहिक प्रात्यक्षिकाद्वारे साजरा झाला. मात्र सध्याच्या कोविड-19च्या उद्रेकामुळे निर्माण झालेल्या जागतिक आरोग्य आपत्कालीन परिस्थितीमुळे, यावर्षी अशा सामूहिक कार्यक्रमांवर भर नसून संपूर्ण कुटूंबाच्या सहभागाने आपापल्या घरी योगाभ्यास करण्याकडे जास्त कल आहे. सध्याच्या महामारीच्या काळात योगाचे विशेष महत्व आहे कारण त्याचा अभ्यास केल्याने शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्ती वाढते आणि रोगाचा सामना करण्याची व्यक्तीची क्षमता वाढते.

आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यासाठी देशभरातील नोडल मंत्रालय आयुष हे गेल्या तीन महिन्यांपासून विविध ऑनलाईन आणि मिश्र -ऑनलाईन उपक्रमाद्वारे कोविड-19 संकटाच्या वेळी घरीच योगाभ्यास करण्याला प्रोत्साहन व सुविधा देत आहे. या प्रयत्नात बर्‍याच आघाडीच्या योग संस्था मंत्रालयाबरोबर सामील झाल्या आहेत. सामान्य योग अभ्यासक्रमाच्या (सीवायपी) प्रशिक्षणाकडे अधिक भर देऊन गेल्या एक महिन्यामध्ये अशा क्रिया अधिक तीव्र झाल्या आहेत, ज्यायोगे दरवर्षीप्रमाणेच आंतरराष्ट्रीय योग दिनी योगाच्या मोठ्या प्रमाणात सादरीकरणात सुसंवाद साधला जाईल.

योग अभ्यासक्रमाचे अनुसरण करून तो शिकण्यासाठी आयुष मंत्रालयाने डीडी भारतीवर दररोज सकाळच्या सामान्य योग अभ्यासक्रमा सत्रासह विविध ऑनलाइन उपक्रम राबविले आहेत. आयुष मंत्रालयाच्या संकेतस्थळावर, योग पोर्टलवर, आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून दररोज नामांकित योग तज्ञांच्या सत्रासह अतिरिक्त संसाधने उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. शैक्षणिक संस्था, सरकारी संस्था, व्यवसाय संस्था, उद्योग आणि सांस्कृतिक संस्था यासह असंख्य व्यक्ती आणि संस्था त्यांच्या कर्मचार्‍यांच्या, सभासदांच्या किंवा इतर हितधारकांच्या फायद्यासाठी त्यांच्या घरातून, आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमात सामील होण्यासाठी वचनबद्ध आहेत. अशा प्रयत्नांच्या माध्यमातून देशातील विविध भागांतील योग बंधुत्व आता आपापल्या घरातून हजारो कुटुंबांना सामील करून आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यास सज्ज आहे.

आयुष मंत्रालय जगभरातील योग अनुयायांना 21 जून 2020 रोजी सकाळी 6:30 वाजता आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यासाठी त्यांच्या घरातून या सामान्य योग अभ्यासक्रम प्रात्यक्षिकात सहभागी होण्यासाठी आमंत्रित करत आहे.

कार्यक्रमाचे वेळापत्रक खालीलप्रमाणे आहेः

  • सकाळी 0615 ते सकाळी 0700 - उद्घाटन समारंभ. यामधे मंत्री (आयुष) यांचे स्वागतपर भाषण, पंतप्रधानांचा संदेश आणि त्यानंतर सचिव (आयुष) यांचे आभार प्रदर्शन होईल.
  • सकाळी 0700 ते सकाळी 0745 - मोरारजी देसाई राष्ट्रीय योग संस्थेच्या पथकाकडून सामान्य योग अभ्यासक्रमाचे थेट प्रात्यक्षिक
  • सकाळी 0745 -सकाळी 0800- योग तज्ञांशी चर्चा आणि आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या मुख्य कार्यक्रमाचा समारोप.

 

* * * 

B.Gokhale/V.Joshi/D.Rane
 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1632423) Visitor Counter : 258