आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोविड-19 सद्यस्थिती


रुग्ण बरे होण्याचा दर 50% हून अधिक

कोविड-19 चे 1,62,378 रुग्ण बरे झाले आहेत

Posted On: 14 JUN 2020 5:35PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 14 जून 2020

गेल्या 24 तासात कोविड-19 चे 8,049 रुग्ण बरे झाल्यामुळे रुग्ण बरे होण्याचा दर 50% हून अधिक झाला आहे. कोविड-19 चे आत्तापर्यंत एकूण 1,62,378 रुग्ण बरे झाले आहेत.

सध्या रुग्ण बरे होण्याचा दर 50.60% आहे. यावरून हे निदर्शनास येते कि कोविड-19 च्या एकूण रुग्णांपैकी निम्मे रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत. संक्रमित लोकांचे वेळेवर निदान आणि योग्य उपचार व्यवस्थापन हाच रुग्ण बरे होण्याचा मार्ग आहे.

सध्या 1,49,348 सक्रिय रुग्ण वैद्यकीय निरीक्षणाखाली आहेत.

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद आयसीएमआरने संक्रमित व्यक्तींमध्ये नोवेल कोरोना विषाणू शोधण्यासाठी चाचणी क्षमता वाढविली आहे. सरकारी प्रयोगशाळांची संख्या 646 पर्यंत तर खाजगी प्रयोगशाळांची संख्या 247 पर्यंत वाढविण्यात आली आहे. (एकूण 893 प्रयोगशाळा). गेल्या 24 तासांत 1,51,432 नमुन्यांची चाचणी घेण्यात आली. आतापर्यंत एकूण 56,58,614 नमुन्यांची चाचणी घेण्यात आली आहे.

दिल्लीच्या राष्ट्रीय राजधानी प्रदेशातील कोविड -19 परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्र्यांनी आज केंद्रीय आरोग्यमंत्र्यांसह दिल्लीचे नायब राज्यपाल आणि दिल्लीचे मुख्यमंत्री यांच्यासमवेत बैठक घेतली. बैठकीत नियंत्रण उपायांचे बळकटीकरण, चाचणीचा वेग वाढविणे आणि आरोग्याच्या पायाभूत सुविधांची पुरेशी तयारी यावर चर्चा झाली.

कोविड -19 शी संबंधित सर्व तांत्रिक मुद्द्यांविषयी, मार्गदर्शक तत्वांविषयी आणि सल्ल्यासंबंधी अधिकृत व अद्ययावत माहितीसाठी कृपया येथे नियमितपणे भेट द्याः https://www.mohfw.gov.in/ आणि @MOHFW_INDIA.

कोविड -19 शी संबंधित तांत्रिक प्रश्न technicalquery.covid19[at]gov[dot]in यावर तर इतर प्रश्न ncov2019[at]gov[dot]in and @CovidIndiaSeva यावर पाठवू शकता.

कोविड -19 वर काही प्रश्न असल्यास कृपया आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाशी संपर्क साधा : + 91-11-23978046 या हेल्पलाइनवर किंवा 1075 (टोल फ्री) क्रमांकावर. कोविड -19 वरील राज्ये/केंद्रशासित प्रदेशांच्या हेल्पलाइन क्रमांकाची यादी देखील https://www.mohfw.gov.in/pdf/coronvavirushelplinenumber.pdf यावर उपलब्ध आहे.

 

M.Chopade/V.Joshi/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1631527) Visitor Counter : 224