PIB Headquarters

पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित दैनंदिन बातमीपत्र

Posted On: 08 JUN 2020 7:15PM by PIB Mumbai

Delhi-Mumbai, June 8, 2020

(Contains Press releases concerning Covid-19, issued in last 24 hours, inputs from PIB Field Offices and Fact checks undertaken by PIB)

 

आरोग्य मंत्रालयाची कोविड-19  घडामोडींवरील माहिती  

काल 5,137 लोक बरे झाले आणि बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या  1,24,430 झाली आहे तर रुग्ण बरे होण्याचा दर 48.49 टक्के झाला आहे एकूण सक्रिय रुग्णांची संख्या आता 1,24,981 आहे. कोविड-19 च्या रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ होत असलेल्या निवडक जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त आणि मुख्य आरोग्य अधिकाऱ्यांशी आरोग्य सचिवांची चर्चा : केंद्रीय आरोग्य सचिव, प्रीती सुदान आणि आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयाचे विशेष अधिकारी, राजेश भूषण यांच्यासह आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंग च्या माध्यमातून, कोविडविषयक उच्चस्तरीय आढावा बैठक घेतली. देशातील 10 राज्यांमधील, 38 जिल्हे आणि 45 महापालिका क्षेत्रात कोविड-19 च्या रुग्णांचे लक्षणीय प्रमाण आहे. महाराष्ट्र, तेलंगणा, तामिळनाडू, राजस्थान, हरियाणा, गुजरात, जम्मू-काश्मीर, कर्नाटक, उत्तराखंड आणि मध्यप्रदेश या राज्यांतले हे सर्व जिल्हे आहेत.

राष्ट्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान संपर्क परिषद (एनसीएसटीसी) आणि केंद्र सरकारचा विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग (डीएसटी) यांनी अलिकडेच आरोग्य आणि कोरोना रोगाच्या धोक्याविषयी माहिती देणारी 'इयर ऑफ अवेअरनेस ऑन सायन्स अँड हेल्थ (YASH) विथ फोकस ऑन कोविड-19’, कोविड-19 वर लक्ष केंद्रित करताना विज्ञान आणि आरोग्य याविषयी जाणीव जागृती करणारे वर्ष` पुस्तिका प्रसिद्ध केली आहे. माहिती पुस्तिकेमध्ये विशेषः कोविड-19 साथीमुळे उद्‌भवलेल्या जोखमी, संकटे, आपत्ती आणि अनिश्चिततेच्या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी देशातील अशा प्रकारच्या मोठ्या कार्यक्रमाची उत्पत्ती आणि त्यांची आवश्यकता याबात माहिती देण्यात आली आहे.

इतर अपडेट्स:

  • संपूर्ण जगभरामध्ये कोविड-19 महामारीचा उद्रेक झाला आहे, हे लक्षात घेऊन भारत सरकारने आपल्या मित्र देशांना मदतीचा हात पुढे केला आहे. यासाठी भारताने 'मिशन सागर' अभियान सुरू केले आहे. या मोहिमेअंतर्गत भारतीय नौसेनेचे 'आयएनएस केसरी' हे जहाज आज सेशेल्सच्या व्हिक्टोरिया बंदरावर पोहोचले. कोविड-19च्या काळात सेशेल्सच्या लोकांना सहाय्यक ठरतील, अशा औषधांचा साठा या जहाजामार्फत पाठवण्यात आला आहे.
  • 24 मार्च 2020 रोजी टाळेबंदी जाहीर झाल्यापासून 3965 रेल्वे रॅक्सद्वारे सुमारे 111.02 लाख मेट्रिक टन अन्नधान्याची वाहतूक केली गेली आहे. रेल्वे मार्गाशिवाय रस्ते व जलमार्गांमार्फतही वाहतूक केली जात होती. एकूण 234.51 लाख मेट्रिक टन वाहतूक झाली आहे. 13 जहाजांमधून 15,500 मेट्रिक टन धान्याची वाहतूक करण्यात आली. एकूण 11.30 लाख मेट्रिक टन धान्य ईशान्येकडील राज्यांत आणले गेले आहे.
  • संरक्षणविषयक अद्यायावत तंत्रज्ञानावर संशोधन करणारी पुण्यातील अभिमत विद्यापीठाच्या दर्जाची संस्था, DIAT ने कोविड-19 चा मुकाबला करण्यासाठी नॅनो-तंत्रज्ञानावर आधारित निर्जंतुकीकरण फवारा तयार केला आहे, या फवारणी यंत्राने सर्व प्रकारच्या पृष्ठभागांवर फवारा मारता येतो आणि त्यांचे निर्जंतुकीकरण करता येते. या फवाऱ्यालाअनन्याअसे नाव देण्यात आले आहे. हा फवारा, सर्वसामान्य व्यक्तींपासून ते आरोग्य कर्मचाऱ्यापर्यंत कोणालाही वापरता येऊ शकेल. तसेच व्यक्तिगत आणि सामूहिक स्तरावरही तो उपयुक्त आहे.
  • भारतात ऑनलाईन तंटा निवारणाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने नीती आयोगाने 6 जून 2020 रोजी आगामी आणि ओमीदयार नेटवर्क इंडियाच्या सहकार्याने एका आभासी बैठकीच्या माध्यमातून महत्त्वाच्या भागधारकांना एकत्र आणले. ओडीआर अर्थात ऑनलाईन तंटा निवारण म्हणजे तंत्रज्ञान आणि डिजीटल तंत्रज्ञानाचा वापर करून वाटाघाटी, मध्यस्थी आणि लवाद अशा पर्यायांच्या माध्यमातून तंट्यांचे, विशेषत: लहान आणि मध्यम स्वरूपाच्या प्रकरणांचे निवारण करणे.
  • भारतीय नौदलाद्वारेऑपरेशन समुद्र सेतूसाठी तैनात आयएनएस जलाश्व 700 भारतीय नागरिकांना माले, मालदीववरून घेऊन 7 जून 2020 रोजी तुतीकोरीन येथे पोहोचले. वंदे भारत मोहिमेअंतर्गत आयएनएस जलाश्वने मालदीव आणि श्रीलंकेहून आतापर्यंत 2672 भारतीय नागरिकांना भारतात परत आणले आहे.
  • भारतीय नौदलाने 08 मे 2020 पासून भारतीय नागरिकांना मायदेशी परत आणण्यासाठी 'ऑपरेशन समुद्र सेतू' सुरू केले आहे. भारतीय नौदलाच्या 'जलाश्व' 'मगर' या जहाजांनी मालदीव तसेच श्रीलंका येथून आतापर्यन्त 2874 लोकांना कोची व तूतीकोरिन बंदरात आणले आहे. समुद्र सेतूच्या पुढच्या टप्प्यात, भारतीय नौदलाचे 'शार्दुल' हे जहाज 08 जून 2020 रोजी इराणच्या 'अब्बास' बंदरातून भारतीय नागरिकांना गुजरातच्या पोरबंदरला घेऊन येईल. इराणमधील भारतीय मिशन, भारतीय नागरिकांना मायदेशी परत पाठवण्यासाठी यादी तयार करीत आहे व आवश्यक वैद्यकीय तपासणीनंतर त्यांना जहाजात बसवले जाईल.
  • डॉ. जितेंद्र सिंह यांनी नवी दिल्ली येथे सांगितले की, जागरूकता आणि चिंता न करणे हीच कोविड-19 विरुद्धच्या लढाईतील गुरुकिल्ली आहे. कोविड-19 रुग्णांसाठी भारतातील पहिली स्वदेशी, प्रभावी, वायरलेस शरीरक्रियात्मक (फिजिओलॉजिकल) मापदंड निरीक्षण प्रणाली, कोविड बिप (सतत ऑक्सिजनेशन व महत्त्वपूर्ण माहिती शोध बायोमेड ईसीआयएल ईएसआयसी पॉड) सुरु करताना त्यांनी, प्रभावीपणे आणि जवळपास दोन महिन्यांपासून सुरु असलेल्या लॉकडाउननंतर आता अनलॉकची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने सुरू झाल्याने या साथीच्या रोगाचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी प्रतिबंध आणि जनजागृतीच्या महत्वावर भर दिला.
  • कोविड-19 चा प्रादुर्भाव रोखण्यात आणि व्यवस्थापनात सरकारच्या प्रयत्नात तंत्रज्ञानविषयक तज्ज्ञांच्या विद्वत्तेचा उपयोग मोठ्या प्रमाणावर न केल्याविषयी चिंता व्यक्त करणारे काही अहवाल काही माध्यमांच्या भागात आहेत. या शंका आणि आरोप तथ्यहीन आणि निराधार आहेत असे केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने म्हणले आहे.

महाराष्ट्र अपडेट्स

3,007 नवीन केसेस नोंद झाल्यानंतर महाराष्ट्रातील रुग्णसंख्या 85,975 झाली आहे. त्यामधील 43,591 सक्रिय केसेस आहेत. हॉटस्पॉट असलेल्या मुंबईमध्ये 1,421 नवीन रुग्ण नोंदवले गेले. त्यामुळे शहरातील रुग्णसंख्या 48,549 झाली आहे. महाराष्ट्रातील खाजगी कार्यालये 10 टक्के कर्मचारी संख्येसह सुरू झाली. उर्वरित कर्मचारी घरातून काम करतील. लॉकडाऊन 5.0 मधून राज्य सरकारने प्रतिबंधित क्षेत्र व विना-प्रतिबंधित क्षेत्र यानुसार  टप्प्याटप्प्याने लॉकडाऊनमधून शिथिलता आणण्याचे घोषित केले आहे.

***

RT/MC/SP/PM

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai@gmail.com(Release ID: 1630277) Visitor Counter : 33