संरक्षण मंत्रालय

संरक्षणविषयक अद्ययावत तंत्रज्ञान संस्था DIATने विकसित केले नॅनो तंत्रज्ञानावर आधारित निर्जंतुकीकरण फवारा

Posted On: 08 JUN 2020 2:33PM by PIB Mumbai

पुणे, 8 जून 2020

संरक्षणविषयक अद्यायावत तंत्रज्ञानावर संशोधन करणारी पुण्यातील अभिमत विद्यापीठाच्या दर्जाची संस्था, DIAT ने कोविड-19 चा मुकाबला करण्यासाठी नॅनो-तंत्रज्ञानावर आधारित निर्जंतुकीकरण फवारा तयार केला आहे, या फवारणी यंत्राने सर्व प्रकारच्या पृष्ठभागांवर फवारा मारता येतो आणि त्यांचे निर्जंतुकीकरण करता येते. या फवाऱ्याला अनन्या असे नाव देण्यात आले आहे. हा फवारा, सर्वसामान्य व्यक्तींपासून ते आरोग्य कर्मचाऱ्यापर्यंत कोणालाही वापरता येऊ शकेल. तसेच व्यक्तिगत आणि सामूहिक स्तरावरही तो उपयुक्त आहे.

मास्क,पीपीई किट्स, रुग्णालयातील वापराचे कपडे तसेच इतर कुठल्याही साधने किंवा उपकरणांवर, जिथून संसर्ग होण्याची शक्यता आहे,अशी वैद्यकीय उपकरणे, लिफ्टची बटणे, डोअरबेल, मार्गिका, खोल्या अशा कोणत्याही ठिकाणी या स्प्रेने फवारणी करता येईल. 

या नॅनो तंत्रज्ञानामुळे कोरोना विषाणूचा मानवी शरीरात होणारा शिरकाव रोखण्यास मदत तर मिळेलच,त्याशिवाय, मास्क, पीपीई च्या संरक्षक साधनांवर असलेले विषाणू देखील निष्प्रभ करण्यात त्याची मदत होईल. 

हा पाणी-आधारित फवारा असून 24 तासांपेक्षाही जास्त काळ त्याचा प्रभाव कायम असतो. फवाऱ्यातील रसायने, कापड, प्लास्टिक आणि धातू अशा सर्व पृष्ठभागांवर सारखीच प्रभावी ठरतात. तसेच याच्या विषारी द्रव्यांचा मानवावर काहीही परिणाम होत नाही. या फवारा सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ टिकू शकतो. या फवाऱ्याचे व्यावसायिक दृष्टीने उत्पादन करण्याची प्रक्रिया सुरु आहे. हा फवारा अगदी छोट्या आकारापासून ते मोठ्या आकारापर्यंत उपलब्ध असेल.

B.Gokhale/R.Aghor/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1630203) Visitor Counter : 224


Read this release in: English