पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कतारचे अमीर शेख तमीम बिन हमाद अल थानी यांच्यात दूरध्वनीवरुन चर्चा
प्रविष्टि तिथि:
26 MAY 2020 10:22PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 26 मे 2020
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कतारचे अमीर शेख तमीम बिन हमाद अल थानी यांना आणि कतारच्या जनतेला ईद उल फित्रच्या दूरध्वनीवरून शुभेच्छा दिल्या. कोविड-19 महामारीच्या काळात कतारमधील भारतीय नागरिकांच्या कल्याणासाठी कतारचे अमीर स्वतः लक्ष घालत असल्याबद्दल पंतप्रधानांनी त्यांची प्रशंसा केली. त्याचेवळी कतारमध्ये भारतीय समुदाय देत असलेल्या योगदानाचे विशेषतः भारतीय आरोग्य कर्मचारी बजावत असलेल्या भूमिकेचे अमीरांनी कौतुक केले. सध्याच्या काळात भारताकडून कतारला निर्यात होणाऱ्या अत्यावश्यक सामग्रीच्या पुरवठ्यात कोणताही खंड पडू नये, यासाठी भारतीय अधिकारी विशेष लक्ष पुरवत असल्याची माहिती पंतप्रधानांनी अमीरांना दिली. अमीरांच्या आगामी 40व्या वाढदिवसाबद्दल पंतप्रधानांनी शुभेच्छा दिल्या आणि त्यांना निरोगी दीर्घायुष्य लाभो आणि यश मिळो अशी भावना व्यक्त केली.
***
B.Gokhale/S.Patil/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1627047)
आगंतुक पटल : 278
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam