PIB Headquarters

पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित दैनंदिन बातमीपत्र

Posted On: 25 MAY 2020 8:02PM by PIB Mumbai

 

(Contains Press releases concerning Covid-19, issued in last 24 hours, inputs from PIB Field Offices and Fact checks undertaken by PIB)

दिल्ली-मुंबई, 25 मे 2020

 

आरोग्य मंत्रालयाची कोविड-19  घडामोडींवरील माहिती  

कोविड-19 च्या प्रतिबंध, नियंत्रण आणि व्यवस्थापनासाठी राज्ये / केंद्रशासित प्रदेशांच्या सोबत भारत सरकार श्रेणीबद्ध, पूर्व नियोजित आणि व्यावहारिक दृष्टिकोनातून अनेक पावले उचलत आहे. उच्च स्तरावर याविषयी नियमितपणे पुनरावलोकन आणि परीक्षण केले जात आहे.

आतापर्यंत एकूण 57,720 लोक बरे झाले आहेत. गेल्या 24 तासांत 3,280 रुग्ण बरे झाल्याचे आढळून आले आहे. रुग्ण बरे होण्याचे एकूण प्रमाण 41.57% आहे. पुष्टी झालेल्या प्रकरणांची एकूण संख्या आता 1,38,845 आहे. सक्रिय वैद्यकीय पर्यवेक्षणाखाली असलेल्या प्रकरणांची संख्या 77,103 आहे.

शरीर संपूर्ण आच्छादित करणाऱ्या वैयक्तिक संरक्षक उपकरणांच्या (पीपीई) गुणवत्तेबद्दल चिंता व्यक्त करणारे काही अहवाल माध्यमांच्या एका विभागात आले आहेत. या संदर्भातील उत्पादनांचा केंद्र सरकारकडून करण्यात आलेल्या खरेदीशी कोणताही संबंध नाही. वस्त्रोद्योग मंत्रालयाने नामनिर्देशित  केलेल्या आठ प्रयोगशाळांपैकी एका प्रयोगशाळेतून पीपीई कव्हरऑल चाचणी होऊन ती मंजूर झाल्यावरच आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाची खरेदीदार संस्था एचएलएल लाइफकेयर लिमिटेड (एचएलएल) ही उत्पादक / पुरवठादारांकडून पीपीई कव्हरऑल खरेदी करीत आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या तांत्रिक समितीने (जेएमजी) विहित केलेल्या चाचणीत त्यांची उत्पादने पात्र झाल्यानंतरच ती खरेदी केली जातात.

त्याचप्रमाणे पुरवल्या जाणाऱ्या वस्तूंचे यादृच्छिक नमुने घेण्याचे कामही एचएलएल करीत आहे, त्यासाठी चाचणी नियमावली तयार करण्यात आली आहे. काही बिघाड झाल्यास कंपनीला कोणत्याही पुरवठ्यासाठी अपात्र घोषित केले जात आहे. सर्व राज्ये / केंद्रशासित प्रदेशांना वस्त्रोद्योग मंत्रालयाने नामनिर्देशित  केलेल्या प्रयोगशाळेतून पीपीईंसाठी विहित चाचणी झाल्यानंतर त्यांच्या पातळीवर होणारी खरेदी सुनिश्चित करण्यास सांगितले गेले आहे. याव्यतिरिक्त, ज्या उत्पादकांनी या प्रयोगशाळांमधून त्यांची उत्पादने अर्हता पात्र केली आहेत त्यांना देखील शासकीय ई-मार्केटप्लेस (जीएम) पोर्टलवर दर्शविले जात आहे. पीपीई अर्हता प्राप्त केलेल्या उत्पादकांना वस्त्रोद्योग मंत्रालयाने शासकीय ई-मार्केटप्लेस (जीएम) पोर्टल वापरण्याचा सल्ला दिला आहे जेणेकरून त्यानुसार राज्ये खरेदी करू शकतील. अर्हता प्राप्त खाजगी क्षेत्रातील उत्पादकांची विस्तृत माहिती वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

भारताने पीपीई आणि एन95 मास्कची देशांतर्गत उत्पादन क्षमता लक्षणीय प्रमाणात वाढविली आहे आणि राज्ये / केंद्रशासित प्रदेशांच्या गरजा पुरेशा प्रमाणात पूर्ण केल्या जात आहेत. आज, देशात दररोज 3 लाखाहून अधिक पीपीई आणि एन95 मास्क तयार होत आहेत. राज्ये / केंद्रशासित प्रदेश तसेच मध्यवर्ती संस्थांना सुमारे 111.08 लाख एन95 मास्क आणि सुमारे 74.48 लाख वैयक्तिक संरक्षक उपकरणे (पीपीई) प्रदान करण्यात आली आहेत.

याव्यतिरिक्त, पीपीईंच्या तर्कसंगत वापरासाठी मार्गदर्शक तत्त्वे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने जारी केली आहेत आणि ती https://mohfw.gov.in वर पाहिली जाऊ शकतात.

 

इतर अपडेट्स:

  • केंद्रीय गृह मंत्रालयाने देशाबाहेर अडकलेल्या भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी तसेच भारतात अडकलेल्या व्यक्ती ज्यांना तातडीच्या कारणास्तव परदेशात जायचे आहे अशा व्यक्तींसाठीही मानक परिचालन सूचना (SOP) प्रसिद्ध केल्या आहेत. हा आदेश याचसंबंधी दिनांक 05.05.2020 रोजी गृह मंत्रालयाने जारी केलेल्या आदेशाची जागा घेईल. सीमेपलीकडून रस्त्याने येणाऱ्या प्रवाशांनाही या सूचना लागू असतील.
  • भारतीय रेल्वेच्या 2813 श्रमिक विशेष रेल्वे गाड्या 24-05-2020 रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत 37 लाखाहून अधिक प्रवाशांना घेऊन धावल्या, जवळपास 60 टक्के रेल्वे गाड्या गुजरात, महाराष्ट्र आणि पंजाब येथून निघून मुख्यतः उत्तर प्रदेश आणि बिहारसाठी  रवाना झाल्या आहेत. एकूण रेल्वे गाड्यांच्या 80 टक्के श्रमिक विशेष गाड्या उत्तर प्रदेश आणि बिहार मधील (उत्तरप्रदेशसाठी 1301 आणि बिहारसाठी 973) गन्तव्य स्थानांसाठी नियोजित करण्यात आल्या आहेत. उत्तर प्रदेशातील बरीच गन्तव्य स्थानके लखनऊ – गोरखपूर सेक्टर आणि बिहारमधील  पटणाच्या सभोवतालची  आहेत. कालपासून सुरू असलेल्या 565 रेल्वे गाड्यांपैकी 266 रेल्वे बिहार आणि 172 उत्तरप्रदेशकडे जात आहेत.

 

महाराष्ट्र अपडेट्स

राज्यात 3,041 कोविड-19 केसेस आणि 58 मृत्यू रविवारी नोंद झाले. याबरोबरच राज्यातील एकूण रुग्ण संख्या 50,231 तर एकूण मृत्यू 1,635 झाले आहेत मुंबईमध्ये 39 मृत्यू आणि 1,725 नवीन केसेस नोंद झाल्या. धारावी मधील झोपडपट्टी भागामध्ये 27 नवीन केसेस साहित एकूण रुग्ण संख्या 1541 झाली आहे. मुंबईहून आज सकाळी देशांतर्गत हवाई सेवा सावधरीत्या सुरु करण्यात आली. आज पहिल्या दिवशी 45 उड्डाणे झाली. यातील 10 उड्डाणे ही दिल्ली-मुंबई या गजबजलेल्या मार्गावर होती. 

 

 

* * *

RT/MC/SP/DR

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1626788) Visitor Counter : 285