गृह मंत्रालय

स्थलांतरित कामगारांच्या सुरळीत वाहतुकीसाठी अधिक गाड्या चालवण्यासाठी राज्ये आणि रेल्वे यांच्यात सक्रिय समन्वय आवश्यक, जिल्हा प्रशासनाने त्यांची आवश्यकता रेल्वेला कळवणे आवश्यक

Posted On: 19 MAY 2020 1:43PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 19 मे 2020


राज्यांना पाठवलेल्या निवेदनात केंद्रीय गृह व्यवहार मंत्रालयाने (एमएचए) नमूद केले आहे की कोविड -19 चा संसर्ग होण्याची आणि उदरनिर्वाहाचे नुकसान होण्याची भीती अडकलेल्या मजुरांना घरची वाट धरण्यामागचे मुख्य कारण आहे. स्थलांतरित कामगारांचा त्रास कमी करण्यासाठी, केंद्र सरकारच्या समन्वयाने सक्रियपणे राज्य सरकार द्वारा  अनेक उपाययोजना हाती घेण्याबाबत या निवेदनात भर देण्यात आला आहे. यामध्ये राज्ये आणि रेल्वे मंत्रालय यांच्यात सक्रिय समन्वयाने अधिक विशेष गाड्यांचे संचालन;

  • स्थलांतरितांच्या वाहतुकीसाठी बसची संख्या वाढविणे; आंतरराज्य सीमेवर प्रवासी वाहतूक करणार्‍या बसेसच्या प्रवेशाला  परवानगी;
  • रेल्वे गाड्या / बस सुटण्याच्या बाबतीत अधिक स्पष्टता दिली जाऊ शकते, कारण अफवा आणि  स्पष्टीकरणाचा अभाव यामुळे मजुरांमध्ये अशांतता पसरली आहे;
  • स्थलांतरित मजूर ज्या मार्गाने आधीच पायी प्रवास करत आहेत अशा मार्गांवर स्वच्छता, भोजन आणि आरोग्य सेवेच्या पुरेशा सुविधा असलेल्या विश्रांतीच्या जागांची व्यवस्था राज्यांनी करावी;
  • जिल्हा प्रशासन पायी जाणाऱ्या मजुरांना निर्धारित विश्रांतीच्या ठिकाणी, जवळची बस टर्मिनल्स किंवा रेल्वे स्थानकांकडे वाहतुकीची व्यवस्था करुन रवाना करावे;
  • स्थलांतरित मजुरांमधील महिला, मुले आणि वृद्धांच्या विशिष्ट गरजांकडे विशेष लक्ष दिले जावे;
  • विश्रांतीच्या ठिकाणी वगैरे बरेच दिवस विलगीकरणात राहावे लागेल ही कल्पना खोडून काढण्यासाठी जिल्हा प्रशासन स्वयंसेवी संस्थाच्या प्रतिनिधींना विश्रांतीच्या ठिकाणी सहभागी करून घेऊ शकतात, 
  • मजुरांना ते जिथे असतील तिथेच राहण्यास प्रोत्साहित केले जाऊ शकते;
  • स्थलांतरितांचे पत्ते आणि संपर्क क्रमांकासह यादी करणे. योग्य वेळी संपर्क शोध घेण्यात हे उपयुक्त ठरू शकेल.

कोणत्याही स्थलांतरित मजुराला  आपल्या गंतव्यस्थानी  जाण्यासाठी रस्ते किंवा रेल्वे रुळांवरून चालत  प्रवास करावा लागणार नाही हे जिल्हा प्रशासनाने सुनिश्चित केले पाहिजे. आवश्यकतेनुसार रेल्वेगाड्या चालविण्यासाठी ते रेल्वे मंत्रालयाकडे विनंती करू शकतात.


राज्यांना पाठवलेले निवेदन पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

* * *

B.Gokhale/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1625075) Visitor Counter : 231