PIB Headquarters

पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित दैनंदिन बातमीपत्र
सुमारे 1.4 लाख आरोग्यसेतू  ॲपधारकांना संसर्गित रुग्णांच्या सान्निध्यात आल्यामुळे, संभाव्य संसर्गाचा इशारा ब्लूटूथच्या माध्यमातून ॲपद्वारे देण्यात आला: अधिकारप्राप्त गट 9 अध्यक्ष श्री अजय सहानी

डिस्चार्ज धोरण' 'लक्षण-आधारित  किंवा 'कालावधी-आधारीत करण्यात आले आहे :  आरोग्य मंत्रालय

Posted On: 11 MAY 2020 7:50PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली-मुंबई 11 मे 2020

अडकून पडलेल्या स्थलांतरित मजुरांची जलदगतीने त्यांच्या घरी पाठवणी करता यावी, यासाठी आणखी जास्त संख्येने रेल्वेगाड्या विनाअडथळा चालवण्यामध्ये सहकार्य करा असे केंद्रीय गृहमंत्रालयाने राज्यांना आवाहन केले आहे.

आरोग्य मंत्रालयाची कोविड-19  घडामोडींवरील माहिती  

अधिकारप्राप्त गट 9, ज्यांच्याकडे तंत्रज्ञान आणि डेटा व्यवस्थापनाची जबाबदारी देण्यात आली आहे, त्याचे अध्यक्ष श्री अजय सहानी यांनी आज सादरीकरण केले

आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव श्री लव अगरवाल, गृह मंत्रालयाच्या प्रवक्त्या श्रीमती पुण्य सलिला श्रीवास्तव यांनी कोविड-19  घडामोडींवरील माहिती दिली.

 • INSमगर मालदीवमधून 200 भारतीयांना घेऊन काल निघाले आहे; INSजलाश्व 698 प्रवाशांसह कोच्चीला पोहोचले आहेगृह मंत्रालय
 • 10 मे पर्यंत परदेशात विविध ठिकाणी अडकलेले सुमारे 4000 भारतीय 23 वंदे भारत अभियान अंतर्गत विमानांमधून भारतात पोहोचले आहेत.
 • आतापर्यंत पाच लाखांपेक्षा जास्त कामगारांना श्रमिक स्पेशल ट्रेन्सने घरी पाठवण्यात आले आहे. आतापर्यंत 468 रेल्वेगाड्या चालवण्यात आल्या आहेत.
 • केंद्र सरकारने राज्यांना सांगितले आहे की कोणीही स्थलांतरित मजूर रेल्वे रूळ ओलांडणार नाहीत, याची काळजी घ्या आणि त्यांच्यासाठी रेल्वेगाड्या/ बसेसची व्यवस्था होईपर्यंत त्यांना अन्न आणि निवारा मिळेल याचीही व्यवस्था करा
 • केंद्रीय गृहमंत्रालय आणि रेल्वे मंत्रालयाने आज राज्यांच्या नोडल अधिकाऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्स करुन अडकलेल्या मजुरांसाठी सोडण्यात येत असलेल्या 'श्रमिक विशेष' ट्रेन्सच्या परीचालनाचा आढावा घेतला. पुढच्या आठवड्यापासून दररोज अशा 100 ट्रेन्स सोडल्या जातील.
 • रेल्वेगाडीने प्रवाशांची वाहतूक करण्याबाबत केंद्रीय गृहमंत्रालयाने आज SOP म्हणजे प्रमाणित कार्यवाही प्रोटोकॉल जारी केले. केवळ कन्फर्म ई-तिकिटे असलेल्या प्रवाशांना रेल्वे स्थानकांवर प्रवेश मिळेल. तिथे त्यांचे स्क्रिनिंग केले जाईललक्षणे नसलेल्या प्रवाशांनाच केवळ प्रवास करता येईल, फेस मास्क अनिवार्य असतील आणि शारीरिक अंतराच्या नियमांचे पालन करावे लागेल—गृहमंत्रालय
 • वैद्यकीय व्यावसायिक आणि निम-वैद्यकीय कर्मचाऱ्यांची वाहतूक सुलभतेने होईल याची काळजी घ्यावी आणि सर्व खाजगी दवाखाने व नर्सिंग होम्स आणि लॅब सुरू कराव्यात असे राज्यांना सांगण्यात आले आहे
 • आपण सर्वांनी एकत्रितपणे हा प्रयत्न केला पाहिजे की ज्या कोणामध्ये कोविड-19 ची लक्षणे दिसू लागतील, त्यांनी ती लपवता कामा नये, खरेतर त्यांनी लगेच बाहेर पडून वेळेवर उपचार घेतले पाहिजेत. आपण असे केले नाही तर केवळ आपणच आजारी पडणार नाही तर आपल्या कुटुंबाचे आरोग्य देखील संकटात टाकू
 • कोविड19 चे बरे झालेले एकूण रुग्ण- 20,917;उपचार घेत असलेलेस सक्रिय रुग्ण- 44,029; गेल्या 24  तासांत- 4,213 नवे रुग्ण; 1,559 बरे झाले; रुग्ण बरे होण्याचा दर 31.15%; एकूण रुग्णसंख्या- 67,152
 • केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने पुष्टी झालेल्या कोविड-19 रुग्णांसाठी  सुधारित डिस्चार्ज धोरण जारी केले आहे. नव्या डिस्चार्ज धोरणानुसार, अति सौम्य/ सौम्य किंवा मध्यम स्वरुपाची लक्षणे असलेल्या रुग्णांना कोविड-19 ची चाचणी न करताही डिस्चार्ज दिला जाऊ शकतो.मात्र त्याच्या वैद्यकीय स्थितीचे अवलोकन करुनच हा निर्णय घेतला जावा. कोविड-19 डिस्चार्ज धोरण बदलण्यात आले आहे कारण, अनेक देशांनी त्यांचे डिस्चार्ज निकष, 'चाचणी- आधारित धोरण' पासून बदलून 'लक्षण-आधारित धोरण' किंवा 'कालावधी-आधारीत धोरण' असे केले आहे.
 • ICMR ने केलेल्या आढाव्यानुसार, RT-PCR पॉझिटिव्ह रुग्ण 10 दिवसांनंतर निगेटिव्ह होतात. अलीकडेच केलेल्या एका अध्ययनानुसार देखील, लक्षणे असण्यापूर्वीच्या काळात(लक्षणे दिसण्याच्या 2 दिवस आधी) विषाणूचा प्रभाव सर्वाधिक असतो आणि त्यानंतर 7 दिवसांपर्यंत  तो कमी होत जातो. डिस्जार्ज धोरण रुग्णांच्या गृह विलगीकरणासंदर्भात तसेच संस्थात्मक  विलगीकरणासंदर्भात नाही हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे.
 • केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने अतिशय सौम्य/ प्री- सिम्टोमॅटिक कोविड-19 रुग्णांच्या गृह अलगीकरणासंदर्भात सुधारित मार्गदर्शक नियम जारी केले आहेत. या नियमांनुसार अति सौम्य/ प्री सिम्टोमॅटिक कोविड रुग्णांची गृह अलगीकरण कालावधीनंतर चाचणी करण्याची गरज नाही
 • अधिकारप्राप्त गट 9, ज्यांच्याकडे तंत्रज्ञान आणि डेटा व्यवस्थापनाची जबाबदारी देण्यात आली आहे, त्याच्या अध्यक्षांनी आज सादरीकरण केले. कोविड19 अधिकारप्राप्त गट 9 च्या अध्यक्षांनी आज ती मूलभूत तत्वे सांगितली ज्यावर आधारित  तंत्रज्ञान आणि डेटा वापर नागरिकांसाठी केला जातो. चाचण्यांसंदर्भात योग्य प्रकारची आरोग्य आकडेवारी तयार करण्यासाठी विशेष देखरेख प्रणाली विकसित करण्यात आली आहे. आरोग्य व्यावसायिक आणि प्रशासकांकडे आरोग्य सेतू अॅप आणि कॉन्टॅक्ट ट्रेसिंग यांचा डेटा उपलब्ध आहे. कोविड19 विरुद्धच्या लढ्यात आरोग्यसेतू अॅप अत्यंत महत्वाची भूमिका बजावत असून, पुढेही बजावत राहील. लोक संसर्गजन्य व्यक्तींच्या संपर्कात येण्यापूर्वी त्यांना धोक्याची सूचना देण्यासाठी हे अॅप विकसित करण्यात आले आहे,यावरुन स्वतःच्या प्रकृतीचे मूल्यमापन देखील करता येते-अध्यक्ष
 • लवकरच आरोग्यसेतू अँपच्या वापरकर्त्यांची संख्या 10 कोटींपर्यंत पोहोचणार आहे; या अॅपने 5 कोटी वापरकर्त्यांपर्यत सर्वाधिक जलद गतीने पोहचण्याचा विश्वविक्रम केला आहे. व्यक्तीची गोपनीयता प्रथम- या तत्वावर हे अँप विकसित करण्यात आले आहे. सुमारे 1.4 लाख आरोग्यसेतू  अॅप धारकांना संसर्गित रुग्णांच्या सान्निध्यात आल्यामुळे, संभाव्य संसर्गाचा इशारा ब्लूटूथ कॉन्टॅक्ट ट्रेसिंगच्या माध्यमातून देण्यात आला. यामुळे तुम्ही स्वतःचे आणि तुमच्या कुटुंबाचे रक्षण करू शकता- चेअरमन उच्चाधिकार गट 9    
 • जेव्हा आम्हाला ब्लुटूथ कॉन्टॅक्टस ची आणि स्वयंमूल्यांकनाची आकडेवारी/माहिती मिळते तेव्हा आम्ही त्यांना फोन करतो, त्यांच्या स्थितीची माहिती घेतो आणि गरजू रुग्णांना आरोग्य आणि जिल्हा प्रशासनाकडे पाठवतो. आम्ही पॉझिटिव्ह रुग्णांची हालचालींविषयक माहिती आणि स्वयंमूल्यांकन डेटा एकत्र करतो, ज्यामुळे जे भाग हॉट स्पॉट ठरु शकतात, अशा भागांना ओळखणे सोपे जाते आणि आम्ही प्रतिबंधात्मक उपाय करु शकतो. अशा 697 स्पॉट्सची माहिती राज्ये/ जिल्ह्यांना देण्यात आली आहे-अध्यक्ष, अधिकारप्राप्त गट 9
 • प्रत्यक्ष कार्यक्षेत्रावर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी हॉट स्पॉट्स आणि प्रतिबंधित क्षेत्र निश्चित करणारे एक ऍप विकसित करण्यात आले आहे. जेणेकरून त्या भागात आवश्यक ते मार्गदर्शक नियम लागू करता येतील. -अध्यक्ष, अधिकारप्राप्त गट 9
 • गोपनीयता हे आरोग्यसेतूचे महत्वाचे वैशिष्ट्य आहे, याचा आम्ही वारंवार पुनरुच्चार करतो आहोत.प्रत्येक नव्या वापरकर्त्याच्या उपकरणासाठी एक विशिष्ट अज्ञात ओळखक्रमांक तयार केला जातो आणि केवळ हाच क्रमांक वापरला जातो, वापरकर्त्यांचे नाव अँप वर वापरले जात नाही ज्यावेळी दोन आरोग्य सेतू अॅपधारक एकमेकांच्या संपर्कात येतात, त्यावेळी एका व्यक्तीच्या संपर्काची माहिती दुसऱ्या व्यक्तीच्या मोबाईलमध्ये सांकेतिक स्वरुपात साठवली जाते.ज्यावेळी अॅपधारक कोविड-19 पॉझिटिव्ह बनतो केवळ त्यावेळीच ही माहिती सर्वरमध्ये साठवली जाते.- अध्यक्ष, अधिकारप्राप्त गट 9
 • आरोग्यसेतू अॅप वरुन मिळालेली माहिती सरकार केवळ आरोग्यविषयक हस्तक्षेपासाठी वापरते, इतर कोणत्याही कामासाठी नाही. आरोग्यसेतू अॅप धारकाची वैयक्तिक ओळख कोणाकडेही उघड केली जात नाही.  कोविड-19 पासून ऍप धारकाचे आणि इतरांचे रक्षण करण्यासाठीच केवळ या ऍपचा वापर करण्यात येत आहे. आरोग्यसेतू वर केवळ 30 दिवसांचा डेटा संचयित केला जातो. पॉझिटिव्ह रुग्णांचा डेटाही ते बरे झाल्यानंतर 60 दिवसांनी सर्व्हर वरुन डिलीट केला जातो. वापरकर्त्यांचा लोकेशन डेटा प्रतिबंधनाच्या कार्यवाहीसाठी आणि तिथल्या समुदायाचे संरक्षण करण्यासाठी वापरला जातो - अध्यक्ष, अधिकारप्राप्त गट- 9
 • फीचर फोन आणि लँडलाईनसाठी  आरोग्यसेतू IVRS platform ची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. 1921 या क्रमांकावर मिस्ड कॉल दिल्यावर, कॉल करणाऱ्याकडे पुन्हा फोन येतो आणि संबंधित व्यक्तीला आवश्यक असलेली मदत दिली जाते. - अध्यक्ष, अधिकारप्राप्त गट 9
 • लहान भागातील लोकांना कोविड-19 सावधानच्या माध्यमातून सावधगिरीचा इशारा देण्यात येतो. क्वारंटाईन एलर्ट सिस्टम विलगीकरणावरील देखरेखीत मदत करते  मायग्रेशन सिस्टमची एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित होणाऱ्या लोकांना मदत होते-अध्यक्ष, अधिकारप्राप्त गट 9
 • आयुष संजीवनी अॅप आयुष वैद्यकीय उपचारांचा प्रभाव जाणण्यासाठी सुरु करण्यात आले आहे- अध्यक्ष, अधिकारप्राप्त गट, 9

वरील पत्रकार परिषदेचे @PIBMumbai ने केलेले लाइव ट्वीट पाहण्यासाठी इथे क्लिक करा

इतर अपडेट्स :

 • रेल्वे मंत्रालयाने आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय आणि गृह मंत्रालय यांच्याशी सल्लामसलत करून निर्णय घेतला आहे की भारतीय रेल्वेची रेल्वे सेवा 12 मे 2020 पासून श्रेणीबद्ध पद्धतीने सुरु करण्यात येईल. जोडपत्रात नमूद केलेल्या तपशीलांनुसार विशेष गाड्यांच्या  पंधरा जोड्या  (तीस गाड्या) चालवल्या जातील.
 • कॅबिनेट सचिवांच्या अध्यक्षतेखाली 10 मे 2020 रोजी व्हिडीओ कॉन्फरन्सिंग च्या माध्यमातून झालेल्या बैठकीत काही राज्ये/केंद्रशासित प्रदेशांनी वैद्यकीय व्यावसायिक आणि निमवैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या वाहतुकीवर लावलेल्या निर्बंधांबाबतचा मुद्दा प्राधान्याने चर्चिला गेला. याच बैठकीचा पाठपुरवा करत, केंद्रीय गृहमंत्रालयाने सर्व राजे/केंद्रशासित प्रदेशांना पत्र पाठवले असून सर्व वैद्यकीय व्यावसायिक आणि सार्वजनिक आरोग्य सुविधांशी संबंधित लोकांची वाहतूक सध्या मानवाचा जीव वाचवण्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. त्यांचा प्रवास आणि वाहतूक काहीही अडथळे न येता होऊ द्यावी, असे त्यात लिहिले आहे.
 • देशभरात विविध ठिकाणी अडकलेल्या स्थलांतरित कामगार, यात्रेकरू, पर्यटक, विद्यार्थी आणि अन्य लोकांना आपल्या राज्यात घरी पोहोचता यावे यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाने दिलेल्या आदेशानुसार भारतीय  रेल्वेने  विशेष श्रमिक गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला होता. 11 मे 2020 पर्यंत देशभरातील विविध राज्यांमधून एकूण 468 “श्रमिक विशेषगाड्या सोडण्यात आल्या  असून यापैकी 363 गाड्या आपल्या गंतव्य स्थानी  पोहोचल्या असून 105  गाड्या पोहचण्याच्या  मार्गावर आहेत.
 • लॉकडाऊन कालावधीनंतर कंपन्यांतील  उत्पादन  सुरु करण्याविषयी केंद्रीय गृहमंत्रालयाने आपत्ती व्यवस्थापन कायदा, 2005 अन्वये सविस्तर मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.  लॉकडाऊन अनेक आठवडे चालल्यामुळे आणि या काळात औद्योगिक उत्पादन केंद्रे बंद असल्यामुळे, ह्या काळात कारखान्याच्या संचालकांनी प्रस्थापित SOP म्हणजे प्रमाणित कार्यवाही प्रक्रियेचे पालन केले नसल्याचे  शक्य आहे.
 • पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वेने सर्व स्थलांतरित कामगार आणि इतर नागरिकांना त्यांच्या स्वतःच्या सुरक्षेसाठी रेल्वे रुळावरून चालू नये असे आवाहन केले आहे. भारतीय रेल्वेने सर्व स्थलांतरित कामगारांना संयम राखण्याचे तसेच रेल्वे रुळावरून न चालण्याचे किंवा रेल्वे रुळावर आराम करू नये असे आवाहन केले आहे कारण हे अत्यंत धोकादायक तर आहेच तसेच रेल्वे कायद्यांतर्गत हे प्रतिबंधित देखील आहे.
 • समुद्र सेतू" अभियानासाठी तैनात असलेली आयएनएस जलाश्व ही युद्धनौका 10 मे रोजी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास मालदीव येथे अडकलेल्या महिला, वृद्ध आणि मुले अशा एकूण 698 भारतीय नागरिकांसह कोची बंदरात दाखल झाली. प्रवासाची सर्व औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर हे जहाज 08 मे रोजी संध्याकाळी मालदीवहून निघाले होते.
 • देहरादून स्मार्ट सिटीने कोविड–19 चा सामना करण्यासाठी एकात्मिक सूचना आणि नियंत्रण कक्ष, सीसीटिव्ही आणि लॉकडाऊन पास यासह केल्या उपाययोजना
 • केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी नवी  दिल्लीतल्या  मंडोली कारागृह परिसरातल्या कोविड केअर सेंटरला भेट देऊन कोविड-19 व्यवस्थापन स्थितीचा आढावा घेतला.रुग्णालय सज्जतेची  लागणारी आवश्यकता लक्षात घेऊन मंडोली कोविड केअर सेंटर  इथे सौम्य आणि अति सौम्य लक्षणे असणाऱ्या कोविड-19 च्या रुग्णांसाठी पुरेशा खोल्या आणि खाटांची व्यवस्था  करण्यात आली आहे. 
 • भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर)-पुणे येथील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने (एनआयव्ही) कोविड-19 साठी अँटीबॉडी शोधण्यासाठी स्वदेशी आयजीजी एलिसा चाचणी कोविड कवच एलिसाविकसित आणि प्रमाणित केली आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) - राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था (एनआयव्ही), पुणे ही देशातील सर्वोच्च प्रयोगशाळा असून अत्याधुनिक पायाभूत सुविधा आणि विषाणू विज्ञानाच्या संशोधनाचा अनुभव त्यांच्याकडे आहे. एनआयव्हीच्या सक्षम वैज्ञानिक चमूने प्रयोगशाळेतून पुष्टी झालेल्या रूग्णांमधून सार्स -सीओव्ही --2 विषाणू यशस्वीरित्या वेगळे केले. यामुळे सार्स -सीओव्ही --2 साठी स्वदेशी निदान विकसित करण्याचा  मार्ग मोकळा झाला आहे.
 • मालदीवमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी आणि सुरळीत व सुरक्षितपणे भारतात परत आणण्यासाठी भारतीय नौदलाच्या समुद्र सेतु अभियानांर्गत दुसरे नाविक जहाज 'आयएनएस मगर' 10 मे 20 रोजी सकाळी 'माले' बंदरात दाखल झाले. आयएनएस मगर, हे किनाऱ्यावर किंवा जमिनीवर थांबा घेण्यासाठी विकसित केलेले असून नागरिकांचा प्रवास सुखकारक व्हावा म्हणून, मालदीवच्या दिशेने प्रवास करण्यापूर्वी कोची बंदरात त्यात आवश्यक ती वाहतूकविषयक ,वैद्यकीय आणि प्रशासकीय तयारी करण्यात आली होती.
 • हैदराबादस्थित संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेची (डीआरडीओ) प्रमुख प्रयोगशाळा  रिसर्च सेंटर इमरात (आरसीआय) यांनी डिफेन्स रिसर्च अल्ट्राव्हायोलेट सॅनिटायझर (डीआरयूव्हीएस)ही स्वयंचलित कॉन्टॅक्टलेस यूव्हीसी सॅनिटायझेशन कॅबिनेट विकसित केली आहे. मोबाइल फोन, आयपॅड, लॅपटॉप, चलनी नोटा, चेक, चलान, पासबुक, कागद, लिफाफे इत्यादी स्वच्छ करण्यासाठी याची रचना करण्यात आली आहे.
 • लॉकडाऊन कालावधीत शेतकरी आणि शेतीच्या कामांना सुविधा पुरविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली भारत सरकारचा, कृषी, सहकार आणि शेतकरी कल्याण विभाग अनेक उपाययोजना राबवीत आहे. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर नियमितपणे परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहेत.
 • केंद्रीय विधी मंत्री रवी शंकर प्रसाद यांनी आज अटर्नी जनरल यांच्या नेतृत्वाखालील विधी अधिकाऱ्यांच्या पथकाशी  व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. अटर्नी जनरल के के वेणुगोपाल, सॉलीसिटर जनरल तुषार मेहता,सर्व अतिरिक्त  सॉलीसिटर जनरल आणि सहाय्यक सॉलीसिटर जनरल, विधी तसेच न्याय विभागाचे सचिव या बैठकीला उपस्थित होते.कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळात अशा प्रकारे आयोजित केलेली ही पहिलीच व्हर्च्युअल बैठक आहे.

महाराष्ट्र अपडेट्स

रविवारी महाराष्ट्राने 1,278 नवीन कोविड-19 केसेसची नोंद केली त्यामुळे एकूण संख्या 22,171 वर पोचली आहे. गेल्या 24 तासात राज्यामध्ये 53 मृत्यू झाले आणि एकूण मृत्यूसंख्या 832 झाली आहे मुंबई या राज्याच्या राजधानीने काल 875 नवीन केसेसची नोंद केली आणि एकूण रुग्ण संख्या 13,564 वर पोचली. तर 19 मृत्यू सहित मुंबईची एकूण मृत्युसंख्या 508 झाली. महाराष्ट्राचे उद्योग मंत्री श्री सुभाष देसाई यांनी सांगितले की ग्रीन आणि ऑरेंज झोनमधील जवळपास 25,000 उद्योगांनी काम सुरू केले आहे यामध्ये सहा लाख कामगार काम करतात. मुंबई-ठाणे-पिंपरी-चिंचवड-पुणे या मोठ्या प्रमाणावर औद्योगिकरण झालेल्या पट्ट्यामध्ये मात्र रेड झोन अंतर्गत येत असल्याने अजुन कारखाने सुरू नाहीत

 

FACT CHECK

 

***

DJM/RT/MC/SP/PM

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai@gmail.com(Release ID: 1623083) Visitor Counter : 66