गृह मंत्रालय

अडकलेल्या कामगारांना जलद त्यांच्या गावी पोहोचविण्यासाठी सुरु केलेल्या ‘श्रमिक विशेष’ रेल्वेगाड्यांच्या परीचालानाचा आढावा घेण्यासाठी एमएचए आणि रेल्वेचे राज्याच्या नोडल अधिकाऱ्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सचे आयोजन


लाखो प्रवाशांना घेऊन 450 हून अधिक रेल्वे गाड्या चालविण्यात आल्या; घरी जाण्याची इच्छा असणाऱ्या प्रत्येक स्थलांतरीताला घेऊन जाण्यासाठी दररोज 100 हून अधिक रेल्वे गाड्या चालविल्या जातील

Posted On: 11 MAY 2020 3:37PM by PIB Mumbai

 

“श्रमिक विशेष” रेल्वे गाडीने जाणाऱ्या स्थलांतरित कामगारांच्या हालचालीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालय (एमएचए) आणि रेल्वे मंत्रालयाच्या वतीने आज व्हिडीओ कॉन्फरन्स आयोजित करण्यात आली होती. राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांचे नोडल अधिकारी यावेळी उपस्थित होते.

कालच्या 101 रेल्वे गाड्यांसह 450 हून अधिक रेल्वे गाड्या लाखो कामगारांना घेऊन निघाल्याची यावेळी प्रशंसा करण्यात आली.

व्हिडिओ कॉन्फरन्स मध्ये अनेक मुद्यांवर चर्चा करण्यात आली आणि त्याचे निराकरण करण्यात आले आणि घरी जाण्यास इच्छुक असणाऱ्या स्थलांतरित कामगारांसाठी पुरेशा रेल्वे गाड्या चालविण्यात येणार आहेत याची खात्री कामगारांना करून देण्यावर जोर देण्यात आला. अडकलेल्या कामगारांना त्याच्या मूळ गावी लवकरात लवकर पोहोचता यावे यासाठी आगामी काही आठवड्यात दररोज 100 हून अधिक रेल्वे गाड्या चालविण्यात येतील अशी अपेक्षा आहे. 

*****

B.Gokhale/S.Mhatre/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1622938) Visitor Counter : 170