आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोविड-19 संदर्भातील ताजी स्थिती


आतापर्यंत 14,183 रुग्ण कोरोनामुक्त

Posted On: 06 MAY 2020 7:26PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 6  मे 2020

कोविड-19 च्या प्रसाराला आळा घालणे, प्रतिबंध आणि व्यवस्थापन यासाठी केंद्र सरकार राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मदतीने सातत्याने वर्गीकृत, पूर्वदक्षता घेऊन सक्रीय उपाययोजना करत आहे. या सर्व उपाययोजना आणि व्यवस्थापनावर सर्वोच्च पातळीवर नियमित देखरेख ठेवली जात आहे.

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्री डॉ हर्षवर्धन यांनी आज महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि गुजरातचे आरोग्य आणि उपमुख्यमंत्री नितीनभाई पटेल यांच्यासोबत व्हिडीओ कॉन्फरन्स च्या माध्यमातून चर्चा केली. यावेळी केंद्रीय आरोग्य राज्य मंत्री अश्विनीकुमार चौबे आणि केंद्र तसेच राज्य सरकारच्या आरोग्य विभागाचे ज्येष्ठ अधिकारी उपस्थित होते. दोन्ही राज्यांत कोविड-19 ची परिस्थिती, करण्यात येणाऱ्या उपाययोजना आणि व्यवस्थापन यावर या बैठकीत चर्चा झाली.

बिगर कोविड रुग्णालयांमध्ये अत्यावश्यक आरोग्यसेवांकडे दुर्लक्ष केले जाऊ नये, यावर डॉ हर्षवर्धन यांनी भर दिला. तसेच SARI आणि ILI च्या सर्व संशयित रुग्णांचे स्क्रीनिंग आणि तपासणी केली जाईलच, याची विशेष दक्षता घ्यावी, जेणेकरुन काही नवे हॉटस्पॉट असतील, तर त्यांचा वेळेत शोध लागून निश्चित वेळेत धोरण आखता येईल आणि योग्य व्यवस्थापन करता येईल, असे हर्षवर्धन यांनी सांगितले. कोविड-19 च्या रुग्णांबाबत असलेला भयगंड आणि त्यांना दिली जाणारी वेगळी वर्तणूक थांबवण्यासाठी आपल्याला संवादाच्या पद्धतीत महत्वाचे बदल करावे लागतील, असे ते म्हणाले. असे झाले तरच, रुग्णांचा तपास आणि नोंद योग्य वेळी होऊन वैद्यकीय व्यवस्थापनामुळे आजाराला बळी पडण्याचे प्रमाण कमी करता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

आतापर्यंत देशभरातील 14,183 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. गेल्या 24 तासात, 1457 रुग्ण बरे झाले असून रुग्ण बरे होण्याचा दर 28.72% टक्के इतका आहे. देशात कोरोनाच्या 

एकूण रुग्णांची संख्या  49,391 वर पोहोचली आहे.कालपासून देशभरात 2958 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.

कोविड19 संदर्भात कुठलीही अधिकृत आणि ताजी आकडेवारी/माहिती हवी असल्यास, तसेच काही मार्गदर्शक तत्वे अथवा सूचना बघायच्या असल्यास, कृपया खालील संकेतस्थळाला भेट द्यावी  : https://www.mohfw.gov.in/.

तांत्रिक गोष्टींच्या माहितीसाठी संपर्क साधायचा असल्यास, या ईमेल आय डी वर साधावा: technicalquery.covid19[at]gov[dot]inआणि इतर शंका/समस्यांसाठी ईमेल आयडी- ncov2019[at]gov[dot]in .

कोविड19 संदर्भात इतर माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक (हेल्पलाईन): +91-11-23978046 or 1075 (Toll-free). सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या हेल्पलाईन्सची यादी सोबत जोडली आहे.

           https://www.mohfw.gov.in/pdf/coronvavirushelplinenumber.pdf .

 

G.Chippalkatti/R.Aghor/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1621548) Visitor Counter : 183