आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोविड-19 संदर्भातली ताजी स्थिती
आतापर्यंत देशातील 11,706 रुग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त
प्रविष्टि तिथि:
04 MAY 2020 7:40PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 4 मे 2020
कोविड-19 च्या प्रसाराला आळा घालणे, प्रतिबंध आणि व्यवस्थापन यासाठी केंद्र सरकार राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मदतीने सातत्याने वर्गीकृत, पूर्वलक्ष्यी दक्षता घेऊन सक्रीय उपाययोजना करत आहे. या सर्व उपाययोजना आणि व्यवस्थापनावर सर्वोच्च पातळीवर नियमित देखरेख ठेवली जात आहे.
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ हर्षवर्धन यांनी आज मध्यप्रदेशचे आरोग्यमंत्री नरोत्तम मिश्रा यांच्यासोबत बैठक घेतली. या बैठकीत केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबे आणि केंद्र तसेच मध्यप्रदेशातील वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते. मध्यप्रदेशातील कोविड-19 चे व्यवस्थापन आणि प्रतिबंधन याबाबत या बैठकीत विस्तृत चर्चा झाली. कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, निरीक्षण, घरोघरी जाऊन सर्वेक्षण करुन रुग्णांचा शोध बिगर-कोविड रुग्णांच्या आजार-उपचारांविषयी व्यवस्थापन इत्यादी मुद्यांवर या बैठकीत भर देण्यात आला.
कोविड-19 आजारातून बरे झालेले रुग्ण आणि या आजाराला बळी पडलेल्यांचे प्रमाण, जे रुग्णालयांच्या वैद्यकीय व्यवस्थापन स्थितीचे निदर्शक आहे, अशा गुणोत्तराचे (प्रमाण) विश्लेषण 17 एप्रिल पासून केले जात आहे. त्यावरुन असे आढळले की, 17 एप्रिल 2020 च्या आधी हे गुणोत्तर 80:20 इतके होते मात्र आता हे गुणोत्तर 90:10 इतके आहे.
आतापर्यंत देशभरात 11,706 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत, यामुळे, सध्या रुग्ण बरे होण्याचा दर 27.52%. इतका झाला आहे. सध्या देशात कोविड-19 च्या एकूण रुग्णांची संख्या 42,533 इतकी झाली आहे. कालपासून 2,553 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.
सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी आपापल्या राज्यात प्रतिबंधक भागात कठोर उपाययोजना राबवायच्या आहेत, जेणेकरुन रुग्णसंख्या आटोक्यात राहील. त्यांनी रुग्णांच्या प्रभावी वैद्यकीय व्यवस्थापनाकडे लक्ष देतानाच, संसर्ग प्रतिबंध आणि नियंत्रणावरही भर द्यायचा आहे.
लॉकडाऊनमध्ये शिथिलता आल्यानंतर, आपण शारीरिक अंतराविषयीचे प्रोटोकॉल आणि मार्गदर्शक सूचना यांचे काटेकोर पालन करणे, हातांची स्वच्छता, परिसराची स्वच्छता आणि कोविडचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन काळजीपूर्वक वागणे, सजग आणि दक्ष राहणे अत्यंत गरजेचे आहे. सार्वजनिक ठिकाणी कायम मास्क वापरणे/चेहरा झाकणे याची सवय करुन घ्यायची आहे. अगदी प्रतिबंधित क्षेत्रांच्या बाहेरही, सरकारने जारी केलेल्या सर्व सूचनांचे काटेकोर पालन करायचे आहे. अत्यावश्यक वस्तूंची खरेदी करतांना किंवा सार्वजनिक ठिकाणी एकत्र आल्यास, गर्दी करणे टाळायचे आहे.
कोविड19 संदर्भात कुठलीही अधिकृत आणि ताजी आकडेवारी/माहिती हवी असल्यास, तसेच काही मार्गदर्शक तत्वे अथवा सूचना बघायच्या असल्यास, कृपया खालील संकेतस्थळाला भेट द्यावी : https://www.mohfw.gov.in/.
तांत्रिक गोष्टींच्या माहितीसाठी संपर्क साधायचा असल्यास, या ईमेल आय डी वर साधावा: technicalquery.covid19[at]gov[dot]in आणि इतर शंका/समस्यांसाठी ईमेल आयडी- ncov2019[at]gov[dot]in .
कोविड19 संदर्भात इतर माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक (हेल्पलाईन): +91-11-23978046 or 1075 (Toll-free). सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या हेल्पलाईन्सची यादी सोबत जोडली आहे. https://www.mohfw.gov.in/pdf/coronvavirushelplinenumber.pdf
* * *
G.Chippalkatti/R.Aghor/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1620999)
आगंतुक पटल : 240
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam