गृह मंत्रालय
ट्रक आणि मालवाहू गाड्यांची मुक्त वाहतूक सुनिश्चित होण्याची खबरदारी घेण्याचे गृहमंत्रालयाचे राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना निर्देश, देशात वस्तू आणि सेवांच्या पुरवठ्याची देशव्यापी साखळी अखंड राखण्यावर भर
आंतरराज्य सीमांवरून वाहतूक करताना वेगवेगळ्या परवान्यांचा आग्रह न धरण्यासंबंधी स्थानिक अधिकरणांमध्ये जागृती करण्यात यावी- गृहमंत्रालय
Posted On:
30 APR 2020 9:45PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 30 एप्रिल 2020
देशातील विविध भागांत आंतरराज्य सीमांवर ट्रकच्या वाहतुकीला अडथळे येतात, ती मुक्तपणे होऊ शकत नाही, व स्थानिक अधिकरणे वेगवेगळ्या परवान्यांचा आग्रह धरतात, अशा तक्रारी येत आहेत.
लॉकडाउनसंबंधी सुधारित एकत्रित मार्गदर्शक सूचनांनुसार, ट्रक आणि मालवाहू गाड्यांच्या प्रवासासाठी वेगवेगळ्या परवान्यांची गरज नाही, हे स्पष्ट करण्यात आले होते,असे केंद्रीय गृहमंत्रालयाने राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना आज पुन्हा सांगितले. यांत रिकाम्या ट्रक्स वगैरेंचाही समावेश होता, असेही मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
लॉकडाउन काळात अत्यावश्यक वस्तू व सेवांचा देशभर अव्याहत पुरवठा सुरु राहण्यासाठी अशी मुक्त वाहतूक आवश्यक ठरते, हे या संदेशात अधोरेखित करण्यात आले आहे.
15.04.2020 रोजी केंद्रीय गृह मंत्रालयाने कोविड-19 चा सामना करण्यासाठी घेतलेल्या लॉकडाउनविषयी एकत्रित सुधारित मार्गदर्शक सूचना जारी केल्या होत्या.
(https://www.mha.gov.in/sites/default/files/MHA%20order%20dt%2015.04.2020%2C%20with%20Revised%20Consolidated%20Guidelines_compressed%20%283%29.pdf).
या एकत्रित सूचनांमध्ये असा स्पष्ट उल्लेख आहे की, सर्व प्रकारची मालवाहतूक मुक्तपणे करण्याची परवानगी असली पाहिजे.
या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्यासाठी, जिल्हा प्राधिकरणे व क्षेत्रीय संस्था यांना या आदेशांविषयी जागृत करण्याचे निर्देश गृहमंत्रालयाने सर्व राज्यांना व केंद्रशासित प्रदेशांना दिले आहेत. प्रत्यक्ष क्षेत्रात खालच्या स्तरापर्यंत याविषयीची संपूर्ण माहिती नि:संदिग्धपणे पोहोचल्यास, मालवाहतूक कोणत्याही अडथळ्याविना करता येईल, असेही मंत्रालयाने म्हटले आहे.
राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना पाठविलेला अधिकृत संदेश पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
G.Chippalkatti/J.Waishampayan/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1619798)
Read this release in:
Punjabi
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Assamese
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam