श्रम आणि रोजगार मंत्रालय

लॉकडाऊन दरम्यान ईपीएफओ ने पीएमजीकेवाय पॅकेजअंतर्गत कोविड-19 च्या 7.40 लाख दाव्यांसह अंदाजे 13 लाख दावे निकाली काढले

Posted On: 28 APR 2020 6:16PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 28 एप्रिल 2020


लॉकडाऊन कालवधीत देखील वेगवान ईपीएफ वितरण कायम ठेवत, कामगार आणि रोजगार मंत्रालया अंतर्गत कामगार भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना (पीएमजीकेवाय) पॅकेजअंतर्गत कोविड-19 च्या 7.40 लाख दाव्यांसह एकूण 12.91 लाख दावे निकाली काढले. यामध्ये एकूण 4684.52 कोटी रुपये वितरीत केले ज्यामध्ये पीएमजीकेवाय पॅकेजअंतर्गत कोविड दाव्यांच्या 2367.65 कोटी रुपयांचा समावेश आहे. 

कोविड-19 साथीच्या आजाराच्या काळात देखील सूट दिलेल्या पीएफ ट्रस्ट देखील काम करण्यासाठी पुढे सरसावल्या आहेत ही बाब खूप समाधानकारक आहे. 27 एप्रिल 2020 पर्यंत या योजनेंतर्गत सूट दिलेल्या पीएफ ट्रस्टने कोविड-19 साठी 79,743 पीएफ सदस्यांना 875.52 कोटी रुपये आगाऊ दिले आहेत. खाजगी क्षेत्रातील 222 संस्थांनी 54641 लाभार्थ्यांना 338.23 कोटी रुपये वितरित केले आहेत. 76 सार्वजनिक क्षेत्रातील संस्थांनी 24178 लाभार्थ्यांना 524.75 कोटी रुपये तर सहकारी क्षेत्रातील 23 संस्थांनी 924 दावेदारांना 12.54 कोटी रुपये दिले आहेत.

“निकाली काढलेली दाव्यांची संख्या” आणि “वितरीत रक्कम” या दोन्ही बाबतीत मेसर्स टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस मुंबई, मेसर्स एचसीएल टेक्नॉलॉजीज लि. गुरुग्रामंद, मेसर्स एचडीएफसी बँक पवई, मुंबई ही खाजगी क्षेत्रातील तीन सवलतप्राप्त आस्थापने आघाडीवर आहेत. सार्वजनिक क्षेत्रातील मेसर्स ओएनजीसी देहरादून, मेसर्स नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशन नेवेली आणि मेसर्स भेल त्रिच्यरे या तीन सवलत प्राप्त आस्थापनांनी कोविड-19 आगाऊ दाव्यांची जास्तीत जास्त संख्या निकाली काढली आहे; तर, मेसर्स नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशन नेवेली, मेसर्स ओएनजीसी देहरादून आणि मेसर्स विशाखापट्टणम स्टील प्लांट विशाखापट्टणम हे ईपीएफ सदस्यांना वितरित केलेल्या रकमेच्या बाबतीत अव्वल तीन आस्थापने आहेत.

कोविड-19 साथीच्या आजारा विरुद्धच्या लढ्यासाठी ईपीएफ योजनेतून विशेष पैसे काढण्याची तरतूद ही सरकारने जाहीर केलेल्या पीएमजीकेवाय योजनेचा एक भाग आहे आणि  28 मार्च 2020 रोजी ईपीएफ योजनेत तत्काळ अधिसूचनेने परिच्छेद 68 L (3) सदर करण्यात आला. या तरतुदीनुसार तीन महिन्यांपर्यत मूळ वेतन आणि महागाई भत्याच्या मर्यादेपर्यंत परतफेड न करावयाची रक्कम किंवा सदस्याच्या ईपीएफ खात्यात जमा असलेल्या रकमेपैकी 75% रक्कम जी कमी असेल ती काढता येईल. 

लॉकडाऊनमुळे केवळ एक तृतीयांश कर्मचारी काम करत असूनही, ईपीएफओ या कठीण परिस्थितीत आपल्या सदस्यांची सेवा करण्यास वचनबद्ध आहे आणि या परीक्षेच्या वेळी ईपीएफओ कार्यालये त्यांच्या मदतीसाठी कार्यरत आहेत.

* * *

M.Jaitly/S.Mhatre/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1619002) Visitor Counter : 282