नौवहन मंत्रालय
                
                
                
                
                
                
                    
                    
                        कोविड -19 मुळे जीवितहानी झाल्यास बंदर कर्मचारी / कामगारांना 50 लाख रुपये नुकसान भरपाई जाहीर
                    
                    
                        
कंत्राटी कामगारांसह सर्व बंदर कर्मचारी आणि इतर कंत्राटी कर्मचार्यांना मिळणार लाभ
                    
                
                
                    Posted On:
                28 APR 2020 4:48PM by PIB Mumbai
                
                
                
                
                
                
                नवी दिल्ली, 28 एप्रिल 2020
 
नौवहन मंत्रालयाने निर्णय घेतला आहे की कोविड -19 मुळे जीवितहानी झाल्यास बंदर कर्मचा-यांवर अवलंबून असलेल्या कुटुंबातील सदस्यांना / कायदेशीर वारसांना सर्व प्रमुख बंदरे पुढीलप्रमाणे  भरपाई / सानुग्रह अनुदान देऊ शकतातः
 
	
		
			| श्रेणी | 
			भरपाई / सानुग्रह अनुदान (रु) | 
		
		
			| 
			 बंदराकडून थेट नियुक्ती झालेल्या कंत्राटी कामगारांसह सर्व बंदर कर्मचारी  
			 | 
			
			 50.00 लाख  
			 | 
		
		
			| 
			 अन्य कंत्राटी कामगार  
			 | 
			50.00 लाख  | 
		
	
 
बंदर संबंधित कर्तव्य बजावताना कोविड-19 संसर्गामुळे जीवाला असलेल्या  धोक्यापासून संरक्षण पुरवण्यासाठी वित्तीय नुकसानभरपाई जाहीर केली आहे. . नुकसान भरपाई / सानुग्रह अनुदानाचे  दावे निकाली काढण्यासाठी / वितरणासाठी तसेच कोविड-19 मुळे मृत्यू झाल्याच्या कारणाची पडताळणी करण्याचे अधिकार बंदराच्या अध्यक्षांना असतील. ही नुकसानभरपाई केवळ कोविड-19 या साथीच्या  रोगांसाठी लागू आहे आणि  30सप्टेंबर 2020 पर्यंत लागू राहील.
* * *
B.Gokhale/S.Kane/D.Rane
 
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai   
 /PIBMumbai   
 /pibmumbai  
pibmumbai[at]gmail[dot]com
                
                
                
                
                
                (Release ID: 1618953)
                Visitor Counter : 189
                
                
                
                    
                
                
                    
                
                Read this release in: 
                
                        
                        
                            English 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Urdu 
                    
                        ,
                    
                        
                        
                            हिन्दी 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Assamese 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Manipuri 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Bengali 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Punjabi 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Gujarati 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Odia 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Tamil 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Telugu 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Kannada 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Malayalam